Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यातील सर्व प्रश्नध्यापक सोमवारी सामूहिक रजेवर
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग आणि प्रश्नध्यापकांच्या अन्य मागण्यांसाठी येत्या सोमवारी राज्यातील सर्व

 

प्रश्नध्यापक सामूहिक रजेवर जाणार आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्रश्नध्यापकांनी बामुक्टाच्या आदेशानुसार ६ जुलैला एक दिवसाची किरकोळ सामूहिक रजा घेऊन शासनाचे लक्ष वेधणार आहेत.
राज्यशासनाने इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे. परंतु महाविद्यालयीन प्रश्नध्यापकांना केंद्रीय विद्यापीठ आयोगाने सहाव्या वेतन आयोगाची ८० टक्के रक्कम मंजूर केलेली असतानासुद्धा राज्यशासन सहाव्या वेतन आयोग लागू करण्यास चालढकल करत आहेत. या व अन्य मागण्यांसाठी राज्यातील महाविद्यालयीन प्रश्नध्यापक एक दिवसाच्या सामूहिक किरकोळ रजेवर जाणार आहेत.
गेल्या २० एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने प्रश्नध्यापकांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व सहसंचालक (उच्च शिक्षण) व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याचा कोणताही परिणाम राज्यशासनावर झाला नाही. या रजा आंदोलनाकडे राज्यशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या १४ जुलैपासून सर्व प्रश्नध्यापक बेमुदत संपावर जातील, असा इशारा एम फुक्टो आणि बामुक्टा या संघटनांनी दिला आहे. सोमवारच्या आंदोलनात सर्व प्रश्नध्यापकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बामुक्टाचे प्रश्न. अशोक तेजनकर, प्रश्न. सुजात कादरी, प्रश्न. चामर गोरे यांनी केले आहे.