Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पाने गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फाईलचा पंचनामा
लोहा, ४ जुलै/वार्ताहर

या न त्या कारणास्तव सतत चर्चेत असलेल्या लोहा नगरपालिकेत सुवर्ण जयंती शहरी योजनेअंतर्गत

 

विभागाचे काम पाहणाऱ्या लिपिकांनी नगरसेवकास माहितीच्या अधिकाराखाली माहिती देताना काही पेज लपवून ठेवले. त्या फाईलचा आज मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षा त्रिशलाबाई कांबळे व नगरसेवकांच्या साक्षीने पंचनामा केला.
नगरसेवक शरद पवार यांनी सुवर्ण जयंती शहर योजनेतंर्गत नागरी रोजगार बांधकाम २००८-०९ च्या फाईलची माहिती अधिकाराखाली मागितली. माहिती देताना पेज क्र. १०४ आणि १०४१ ही दोन पाने काढून घेतली व उर्वरित माहिती दिली अशी तक्रार नव्यानेच पदभार घेतलेले मुख्याधिकारी एन. जी. झंपलवाड यांच्याकडे शरद पवार यांनी केली. त्या वादग्रस्त संचिकेत नव्याने कोणतेही कागदपत्र समाविष्ट होऊ नये म्हणून मुख्याधिकारी श्री. झंपलवाड यांनी नगराध्यक्षा त्रिशलाबाई कांबळे, तक्रारकर्ते नगरसेवक शरद पवार, नगरसेवक शेख करीम, अरुण टोळगे, कार्यालयीन निरीक्षक यांच्या साक्षीने संबंधित विभागाचे लिपिक सुधाकर कांबळे यांच्याकडे ‘तो’ वादग्रस्त संचिकेचा पंचनामा करून मुख्याधिकाऱ्यांनी सील ठोकले. या विभागातील कामाच्या व महिला बचत गटाच्या अनेक तक्रारी आहेत. यावरही संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.