Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वरिष्ठ प्रश्नध्यापकांचा उद्या लाक्षणिक संप
नांदेड, ४ जुलै/वार्ताहर

आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रश्नध्यापक ६ जुलैला एक दिवसाच्या

 

सामूहिक रजेवर जात आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी व वेतन निश्चितीबाबत राज्य शासनाने काढलेल्या १४ जूनच्या अन्यायकारक परिपत्रकाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. प्रश्नध्यापक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने आेदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात एक बैठक पार पडली.
यावेळी प्रश्न. उत्तमराव सूर्यवंशी, मुक्टा संघटनेचे डॉ. ए. टी. सूर्यवंशी, डॉ. पंचशील एकंबेकर, डॉ. अंबादास कांबळे, डॉ. शेखर थुंगरवार आदींसह अनेक प्रश्नध्यापक उपस्थित होते. कोणत्याही अफवांना बळी न पडता ६ जुलैच्या संपात प्रश्नध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी
केले.