Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रोटरॅक्टच्या अध्यक्षपदी प्रशांत पवार
बीड, ४ जुलै/वार्ताहर

रोटरॅक्ट क्लब ऑफ बीडच्या अध्यक्षपदी प्रशांत पवार तर सचिवपदी गोटू संचेती यांची एकमताने

 

निवड करण्यात आली आहे. युवा शक्तीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात रोटरॅक्ट आपले जास्तीचे योगदान देईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
बीड येथे विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी यांच्या उपस्थितीत रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा झाला. यावेळी रोटरी परिवारातीलच रोटरॅक्ट क्लब ऑफ बीड या युवा संघटनेच्या सेंट्रल अध्यक्षपदी प्रशांत पवार आणि सचिवपदी गोटू संचेती यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गुजराथी यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. पवार यांनी, रोटरॅक्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि सामाजिक उपक्रमात जास्तीचे योगदान देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, उपप्रश्नंतपाल हरिश मोटवाणी आदींसह प्रमुख पदाधिकारी व रोटरॅक्ट क्लबचे जनसंपर्क अधिकारी दीपेश दगडे उपस्थित होते.