Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

व्यसनमुक्त समाजातच चांगल्या मूल्यांची निर्मिती -धुमाळ
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

आरोग्यसंपन्न व व्यसनमुक्त समाजात चांगल्या मानवी मूल्यांची आणि संस्कृतीची निर्मिती होऊ

 

शकते, असे प्रतिपादन जि.प.चे उपाध्यक्ष पंडितराव धुमाळ यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधीदिनानिमित्त येथील जीवनरेखा प्रतिष्ठानच्या व्यसनमुक्ती केंद्रात आयोजित कार्यक्रमात धुमाळ बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सभापती अ‍ॅड. टी. एन. कांबळे होते. आरोग्य सभापती अमरसिंह भोसले, डॉ. व्ही. आर. यादव, माहिती अधिकारी दिलीप कुलकर्णी, आर. के. देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी बोलताना धुमाळ म्हणाले, व्यसनामुळे माणसाच्या शरीरावर मोठय़ा प्रमाणात दुष्परिणाम होऊन त्याच्या वैयक्तिक हानीबरोबरच त्यांच्या कुटुंबाचेही आर्थिक व मानसिक नुकसान होते. अंमली पदार्थाचे सेवन हे अनैसर्गिक व अनैतिक असल्याने त्याचा समाजावर वाईट परिणाम होतो. म्हणून समाज रक्षणासाठी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या हिताचे आहे. चांगल्या मानवी मूल्यांची व संस्कृतीची निर्मिती व जोपासना व्यसनमुक्त समाजातच होऊ शकते, असे ते म्हणाले.
प्रश्नरंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. समाज कल्याण अधिकारी एल. आय. वाघमारे यांनी प्रश्नस्ताविक केले. स्वामी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जीवनरेखा प्रतिष्ठानच्या महिला, बीसीए महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, प्रक्षेपक एस. ए. पठाण, प्रश्नध्यापक, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.