Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शैला रॉय जिल्हाधिकारीपदी मंगळवारी रु जू होणार
हिंगोली, ४ जुलै/वार्ताहर

येथील जिल्हाधिकारी विनिता सिंगल यांची नागपूर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर येणाऱ्या

 

शैला रॉय मंगळवारी हिंगोलीत रुजू होणार आहेत.
केरळ राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या शैला रॉय २००३ बॅचच्या असून त्यांची प्रथम नियुक्ती १५ सप्टेंबर २००३ ला झाली. हिंगोलीला बदली होण्यापूर्वी त्यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असताना श्रीमती रॉय यांची बदली सांस्कृतिक व पर्यटन विकास मंत्रालयात उपसहसचिवपदी झाली होती. परंतु तेव्हापासून त्या रजेवर गेल्या होत्या. नव्याने त्यांची नियुक्ती हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी झाल्याने त्या आता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी रुजू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
शैला रॉय यांची धुळे येथील कारकीर्द स्वच्छ प्रशासन व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात, तर त्यांनी धुळे येथे सर्वाना शिक्षण मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली संगणक पुस्तिका राज्यात रॉय पॅटर्न म्हणून मान्यता पावली होती. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना कामातील राजकीय हस्तक्षेपास पायबंद घातला होता.
त्यांनी आदिवासी शाळांच्या वारंवार स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेऊन वस्तीशाळेत आदिवासी मुलांना शिक्षण मिळण्यासाठी वस्तीशाळेचा कार्यक्रम राबवून सुमारे दोन हजार आदिवासी मुलांच्या शिक्षणाची सोय केली. इतकेच नाही तर मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष घालून शासनाकडून मुलींना शिक्षणासाठी उपलब्ध सुविधा मिळवून देण्यावर भर दिला. ज्ञानयोगिनी मोहिमेंतर्गत शाळाबाह्य़ मुलींना शाळेत घालण्याच्या कामावर विशेष परिश्रम शैला रॉय यांनी घेतले. त्या हिंगोलीला जिल्हाधिकारीपदी मंगळवारी रु जू होणार आहेत.