Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करावेत’
मुरुम, ४ जुलै/वार्ताहर

विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केल्यानेच ध्येय साध्य होऊ शकते. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी चांगले ध्येय

 

ठेवून प्रयत्नांची शिकस्त करावी व समाज, देश, गावाचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले.
श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते दहावी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या आदर्श विद्यालयाच्या शिल्पा बसवराज हिचा शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय मुरुम येथील सीईटीमध्ये यश संपादन केलेल्या व इयत्ता दहावीमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात
आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्णपंत खरोसेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील, संस्थेचे सचिव शेळके गुरुजी, संचालक मालपाणी, विठ्ठलसाईचे उपाध्यक्ष सादिक मियाँ काझी, आदर्श महाविद्यालयाचे प्रश्नचार्य शिवानंद दळगडे यांची उपस्थिती होती.
श्री. पाटील म्हणाले की, शिल्पा हिरेमठ हिने आपल्या शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल केले असून तिला विठ्ठलसाई कारखाना व नगर शिक्षण विकास मंडळ मुरुम व श्रमजिवी शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा यांच्या वतीने शिक्षणासाठी शिल्पास सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.
सर्व गुणवंतांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे सचिव शेळके गुरुजी यांनीही मार्गदर्शन व विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक प्रश्नचार्य डॉ. अक्कुसकर यांनी केले. कार्यक्रमास उपप्रश्नचार्य अशोक सपाटे, राजपूत, दलाल, श्री. वाकडे आदींसह प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व माधवराव पाटील महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रश्न. बावगे यांनी केले तर मुख्याध्यापक कांत हुलसुरे यांनी आभार मानले.