Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दारू व्यसनमुक्तीचा संकल्प सोडलेल्या नागरिकांचा सत्कार
वसमत, ४ जुलै/वार्ताहर

हिंगोली जिल्हा प. पू. श्री शेषराव महाराज प्रेरित व्यसनमुक्ती संघटना यांच्या वतीने दारू

 

व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यातआला.
सध्या समाजात सर्व स्तरात दारूचे प्रमाण वाढत चालले असून त्याचा त्रास समाजाला भोगावा लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे विशेषत: युवा पिढी दिशाहीन बनत चालली आहे. ही बाब व्यसनमुक्ती संघटना जाणत असल्याने अनेक वर्षापासून व्यसनमुक्तीचे हे काम हिंगोली जिल्ह्य़ात व्यसनमुक्तीचे जिल्हाध्यक्ष दासराव कातोरे यांच्या नेतृत्वाखाली अखंड चालू आहे. याच प्रयत्नामुळे २ जुलैला सातेफळ व सातेगाव येथील नागरिकांनी दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा संकल्प केला. यात सहभागी असलेले श्री प्रल्हाद मल्लिकार्जुन नलवार (माजी उपसरपंच, सातेफळ), किसन नामाजी पवार (सातेफळ), संतोष रामा वाघमारे (सातेफळ), बाबुराव सीताराम नरवाडे यांचा शाल, श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दासराव कातोरे आणि कार्यकर्ते सुरेश खराटे, भगवान खराटे, हिरालाल नागेश्वर आदींची उपस्थिती होती.
सहा जुलैला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शिरपूर (जि. बुलढाणा) येथे गुरुवर्य प. पू. श्री शेषराव महाराज यांच्या समाधीस्थळी भव्य सोहळा होणार आहे. तरी परिसरातील व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.