Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मराठा आरक्षण प्रश्नावर तीव्र आंदोलन करणार - पवार
हिंगोली, ४ जुलै/वार्ताहर

इतरांच्या आरक्षणाला विरोध न करता मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षण प्रश्नावर राज्यभर मराठा

 

महासंघ तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी मराठा महासंघाची आरक्षण प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मराठा महासंघाचे सचिव राजेंद्र कोंढरे, युवा अध्यक्ष संतोष नानवटे, विनायक पवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पवार यांनी सांगितले की, बापट अहवालाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. अहवालावर शासनाने काय तो विचार करावा. आमचा संघर्ष राज्यशासनाविरुद्ध आहे. समाजाच्या नावावर मोठे झालेले नेते समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त करून त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. खासदार गोपीनाथ मुंडे, माजी खासदार रामदास आठवले हे इतर समाजाचे नेते मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.