Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

प्रादेशिक

सर्वाचे सहकार्य लाभल्यास मुंबईचा कायाकल्प सहजशक्य
एमएमआरडीएचा विश्वास
मुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी
मुंबईतील सध्याची परिस्थिती हलाखीची आहे. युरोपातील शहरांच्या तुलनेत ही परिस्थिती पाहिल्यास, नाउमेद व्हायला होते. मात्र या परिस्थितीतही बदल होऊन, मुंबईचा पूर्णत: कायाकल्प होऊ शकतो. त्यासाठी निदान १५-२० वर्षांचा कालावधी व अंदाजे ५०० अब्ज डॉलर इतकी मोठी किंमत मोजवी लागेल. मात्र सर्वाची साथ लाभल्यास, काहीच अशक्य नाही. अल्पवधीतच मुंबई शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल,

इतरांच्या वेळेला किंमत द्यायला शिकलो - सैफ अली खान
मुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी

काही वेळा चित्रीकरणासाठी पोहोचण्यास काही कलाकारांना उशीर होतो. पण त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यापुढे काही समस्या उभ्या राहू शकतात. स्वत: चित्रपटाचा निर्माता असल्यावर ही जाणीव प्रकर्षांने होते. आपल्या वेळेप्रमाणे इतरांच्या वेळेलाही तेवढीच किंमत असते आणि त्याचा योग्य तो आदर केला पाहिजे, हे मी शिकलो. ‘इल्युमिनाटी फिल्म्स’ची निर्मिती असलेला ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान प्रथमच चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरला आहे.

ठाणे कारागृहात कैद्यांचे उपोषण
ठाणे, ४ जुलै/प्रतिनिधी

मानसिक आणि शारीरिक त्रासासह कपडे आणि खाण्यापिण्याबाबत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील प्रशासनाकडून हालगर्जीपणा होत असल्याचा आरोप करीत काही कैद्यांनी काल दुपारपासून उपोषण सुरू केले आहे. तसेच कारागृहात कैद्यांना मिळाणारी वागणूक आणि सुविधांबाबतची लेखी तक्रार ठाणे सत्र न्यायालय आणि राज्य मानव अधिकार आयोगाकडे केली आहे.

नवी मुंबईतील अतिक्रमण घोटाळा प्रकरण
राष्ट्रवादीचा नगरसेवक एम. के. मढवी पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई, ४ जुलै/प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेत गाजत असलेल्या अतिक्रमण घोटाळ्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली असून, या प्रकरणी राष्ट्रवादीचा ऐरोली येथील ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मढवी याची चौकशी सुरू असून त्यास अद्याप या प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश मोहिते यांनी ‘लोकसत्ते’ला दिली.

वाहतूक शाखेची ६३५ मद्यपी चालकांवर कारवाई
ठाणे, ४ जुलै / प्रतिनिधी

मदय पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६३५ मदयपी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडू सहा लाख आठ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. ठाणे हद्दीत वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करून हेल्मेट न घालणाऱ्या साडेसहा हजार दुचाकीधारकांविरूध्द, सिटबेल्ट न लावणाऱ्या दोन हजार ११६ वाहन चालकांविरूध्द कारवाई करण्यात आली.

मॉलसाठी ठाण्यात शाळा बंद करण्याचा घाट!
१८०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
ठाणे, ४ जुलै/प्रतिनिधी
मॉल बांधण्यासाठी कोपरीतील मंगला हायस्कूल बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातल्याने १८०० विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या शेकडो पालकांनी आज शाळा व्यवस्थापनेला जाब विचारला. ठाण्यातील सर्वात जुनी व मोठी म्हणून हिंदी माध्यमाची मंगला हायस्कूल प्रसिद्ध आहे. शाळेत १८०० विद्यार्थी शिकत असून २० तुकडय़ा आहेत. पूर्वी त्या २८ होत्या. काही वर्षांपूर्वी अकरावी आणि बारावीचे वर्ग बंद करण्यात आले.

नियामत खाँ-सदारंग यांचा सांगीतिक वारसा जपण्याची गरज
मुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी

नियामत खाँ उर्फ सदारंग यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. असे असतानाही त्यांच्याविषयी आणि त्यांनी लोकप्रिय केलेल्या ख्याल बंदिशीविषयी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न आहे. संगीतप्रेमींनी त्याचे स्वागत करावे, अशा शब्दांत संगीतज्ज्ञ, रुद्रवीणावादक आणि गायक पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बिल्डर चतुर्वेदी प्रकरणाचा अहवाल फेटाळला
मुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी

बिल्डर राजेंद्र चतुर्वेदी प्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने सादर केलेला अहवाल स्थानिक न्यायालयाने फेटाळल्याने निलंबित अतिरिक्त पोलीस आयुक्त बिपीन बिहारी यांच्यासह आठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये गुन्हा अन्वेषण विभागाने अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात संबंधित प्रकरण खोटे असून त्याचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल सादर केला होता. पोलिसांनी चतुर्वेदीविरुद्ध २००७ मध्ये नोंदविलेल्या तक्रारीत त्याने अन्य बिल्डर रश्मीकान्त शहा याच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप होता. मात्र सदर तक्रार असत्य आणि पुरेशा पुराव्याअभावी नोंदविण्यात आली असल्यामुळे या प्रकरणाचा तपास ‘बी समरी’ करण्याचा अहवाल सादर केला होता. हा अहवाल न्यायालयाने नाकारला आणि नमूद केले की, गुन्हा अन्वेषण विभागाने समाधानकारक वस्तुस्थिती सादर केलेली नाही त्यामुळे न्यायालय ती वस्तुस्थिती स्वीकारू शकत नाही. गुन्हा अन्वेषण विभागाने वस्तुस्थितीची खातरजमा करावी आणि पुन्हा चौकशी करून नवा अहवाल सादर करावा, असे आदेश दंडाधिकारी के. डी. चौधरी यांनी दिले आहेत.

पालिका शाळांतील खिचडी कंत्राटाची चौकशी
ठाणे, ४ जुलै / प्रतिनिधी

ठाणे महापालिकेच्या शाळांमधे खिचडी पुरवणाऱ्या महिला बचत गटांच्या कंत्राटाची चौकशी करण्यात येणार असून यापुढे शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार फुड कंत्राट असणाऱ्या महिला मंडळ तसेच बचत गटांना हे काम देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी दिली. ठाण्यातील १२७ प्राथमिक शाळांतून शिक्षण घेणाऱ्या ४४ हजार मुलांना रोजच्या आहारात खिचडी देण्यात येते. खिचडी बनवण्याचे काम काही संस्थांना दोन शाळेत मिळाले, काहींनी काम मिळाले नसतानाही लेटरहेडवर खोटी झेरॉक्स लाऊन आपल्याला काम मिळाले असे दाखवले असे प्रकार लक्षात आले असून नवीन आलेले शिक्षणाधिकारी सुरेश पवार हे त्याची चौकशी करणार असल्याचे गडा यांनी स्पष्ट केले. शिक्षण मंडळ सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या महिला मंडळाना काम देताना इतरही महिला मंडळ, बचत गट यांना काम देण्यात आले असल्याचे गडा यांनी सांगितले. खिचडीचे काम कोणाला द्यावे याबाबतचा शासनाचा अध्यादेश नुकताच आला असून त्यानुसारच महिला मंडळाना हे काम देण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळ सभापतींनी स्पष्ट केले. त्यानुसार सोमवारपासून महिला मंडळ, बचत गटांच्या कागदपत्रांची तपासणी करून नियमात बसणाऱ्या मंडळांनाच हे काम यापुढे करता येणार आहे.

पोलीस दलासाठी विशेष ‘वेब पोर्टल’
मुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी

पोलीस दलामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने खास वेब पोर्टल तयार करण्याचे ठरविले असून ते येत्या चार महिन्यांत कार्यान्वित होईल, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक नोंदी या पोर्टलमध्ये असतील आणि कोणताही कर्मचारी त्याला हवी असलेली सुट्टी, बदली आणि वैद्यकीय मदतीसाठी या पोर्टलचा वापर करू शकेल. नियुक्त्या आणि बदल्यांच्या मागण्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे हा उद्देश आहे, असे पाटील म्हणाले.