Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

कोकणावर वर्षांव...
नवी मुंबईकरांना ठेंगा

जयेश सामंत

मागील आठवडय़ात सिडकोच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे निमित्त साधून नवी मुंबईत दिवसभर तळ ठोकून बसलेले राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नवी मुंबईकरांची तशी निराशाच केली. मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईच्या दौऱ्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गात बैठक घेऊन कोकणसाठी हजारो कोटींचे पॅकेज जाहीर केले. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना राजा अखेर कोकणवासीयांवर उदार झाला.

खारफुटीच्या कत्तलींमुळे पर्यावरण धोक्यात!
मधुकर ठाकूर

खारफुटी, कांदळवने, समुद्र वनस्पती यांचे मानवी जीवन व पर्यावरणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सागरी किनारपट्टीची होणारी प्रचंड धूप थांबविण्याचे व माशांच्या निवाऱ्यासाठी व प्रजनन काळात अंडी घालण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या खारफुटी, कांदळवनांचे संरक्षण व जतन करण्यासाठी पर्यावरणवादी संघटना पुढे सरसावल्या आहेत. न्यायालयानेही या दुर्मिळ झाडांचे संवर्धन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही खारफुटी, कांदळवनांची कत्तल थांबली नाही. उलट न्यायालयाने दिलेले आदेश धाब्यावर बसवून नवी मुंबई परिसरात खारफुटी व कांदळवनांची खुलेआम मोठय़ा प्रमाणात कत्तल करण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

सर्व‘शिक्षा’ अभियान!
अनिरुद्ध भातखंडे

अमुक शाळेविरोधात पालकांचा मोर्चा, तमुक शाळेची जबर एकतर्फी फी वाढ, अमुक शाळेच्या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची फरफट.. या प्रकारच्या अनेक बातम्या गेल्या काही वर्षांंपासून ठराविक कालावधीनंतर कानी पडत आहेत, वाचनात येत आहेत. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र नाही, असे आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार मानले जाते; परंतु बदलत्या काळात सर्व संकल्पना बदलत असल्याने हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ज्ञानाचे दान (?) करण्याच्या मोबदल्यात हजारो विद्यार्थ्यांकडून देणगीपोटी लाखो, कोटय़वधी रुपये गोळा करायचे आणि स्वत:ला शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट म्हणवून घ्यायचे, अशी सर्वार्थाने अनिष्ट प्रथा रूढ झाली आहे. शिक्षणाचा बाजार आणि व्यापारीकरण झाल्याने शाळांसंबंधी नकारात्मक घटनाच अधिक घडू लागल्या आहेत.