Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
अगदी अलीकडच्या काळात इराणमध्ये निवडणुका झाल्या. गेली वीस वर्षे नियंत्रण गाजवणाऱ्या कडव्या धर्मगुरुंच्या पसंतीला न उतरणारा असा त्यांचा निकाल लागला असावा. कदाचित त्यामुळे त्या निकालांची अंमलबजावणी झाली नाही. त्याविरुद्ध लक्षावधी लोक तेहरानच्या रस्त्यावर उतरले. अलीकडच्या काळातील इराणचा सामाजिक, राजकीय इतिहास बघितला तर हे अभूतपूर्व आहे. या निवडणुकांचा नक्की विजेता कोण आणि त्याची अधिकृत घोषणा कधी होणार याबाबत इतके संभ्रमाचे वातावरण आहे की कैरो इथे ऐतिहासिक भाषण देणारे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही याबाबत थेट भाष्य करण्याचे सध्या टाळत आहेत.

‘विनित योजना विकास आराखडा’
सोमवारी, ६ जुलै रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर होईल. अर्थसंकल्पावर उलटसुलट चर्चाही होईल. सर्वसामान्य माणसे म्हणतात, की त्यांना अर्थसंकल्पाची किचकट आकडेवारी आणि आवाक्यात न मावणारी आश्वासने समजत नाहीत; परंतु कोणताही अर्थसंकल्पीय विचार काही निश्चित गोष्टींवर आधारलेला असतो. त्या आधारेच विकासाचा आराखडा ठरतो. असाच एक आराखडा विनित जोगळेकर यांनी तयार केला आहे. सोयीसाठी त्यांनी त्याचे नाव ‘विनित योजना विकास आराखडा’ असे दिले आहे. त्यांनी अगदी मूलभूत गोष्टींचा विचार करून जी मांडणी केली आहे, त्याचे काही साधे-सोपे निकष या पहिल्या भागात दिले आहेत..


‘भारतरत्न’ सुनील!
जेव्हा जागतिक क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यातील काही पाने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातील. या गौरवगाथेमध्ये ज्या दोन मुंबईकरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते आहेत विक्रमादित्य लिटिल मास्टर सुनील गावसकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. याचे कारण हेच की केवळ भारतीयच नाही तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासातदेखील या दोन्ही मानाच्या शिलेदारांनी आज आपल्या कर्तृत्वाचे मानदंड उभे केले आहेत.सुनील गावसकर आज ‘विक्रमादित्य’ म्हणून क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. दहा हजारांहून अधिक धावा, ३४ शतके अशा रुक्ष आकडेवारीच्या पलीकडे जाऊन सुनील एक माणूस म्हणून, एक खेळाडू म्हणून आणि एक वलयांकित ‘तारा’ म्हणून कसा आहे हे पाहणे जास्त मनोरंजक असेल.


लादेनचा सहकारी खालिद ख्वाजा
गुप्तचर खात्याच्या प्रशिक्षणाशिवायच आय.एस.आय.मध्ये नियुक्त झालेला खालिद तेथे अधिकाऱ्यांचे रिपोर्टस् तयार करीत असे. एकदा ज. झिया यांच्याशी निगडित एका रिपोर्टात प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन त्याने सत्य लिहिले. सदर रिपोर्ट बदलण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालिद यांच्यावर दबाव आणला. पण खालिद याने रिपोर्ट न बदलता संधी मिळाल्यावर झियांना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला पत्रवजा रिपोर्ट समक्ष दिला याचेच परिणाम खालिदला भोगावे लागले.

दलितांचा दलदलित पराभव का होतो!
प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते फक्त त्या त्या खेळापुरतेच लागू असतात. ते नियम इतर खेळांना लागू करता येत नसतात, म्हणून करावयाचेही नसतात. तसा प्रयत्न केलाच तर संबंधित खेळ आणि खेळकरी दोघेही खलास होतात आणि राजकारणात हा भारतातील सनातन खेळ आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये कुठे ना कुठे विषमता संपवून समता आणली गेली. पण भारतात विविध पातळ्यांवर विषमता कळत नकळत राबविली जाण्याचेच राजकारण असल्याने भारतीय राजकारणाच्या खेळाचे नियमही सतत नवनवोन्मेषशालिनी राहिले आहेत. ही परंपरा वैदिक कालापासून असून महाभारत हे त्याचे ठळक उदाहरण आहे.

आधुनिक चित्रकलेतील ‘तय्यब’पर्व
आधुनिक भारतीय चित्रकला खऱ्या अर्थाने बहराला आली ती पन्नासच्या दशकात आणि त्यानंतर. प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे आणि या ग्रुप भोवतालचे अशा काही चित्रकारांनी आपली कारकिर्द याच काळात सुरू केली. नंतर भारतीय कलेत अनेक परिवर्तने झाली, पण या काळातल्या किमान सहा ते सात चित्रकारांनी भारतीय चित्रकलेतील आपलं अग्रस्थान कायम राखलं. तय्यब मेहता हे त्यापैकी एक महत्त्वाचे चित्रकार, तय्यब यांच्या निधनाने आधुनिक चित्रकलेतील एक पर्व आता संपलं आहे.