Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

नियोजनाअभावी समस्यांचा जन्म!
सोपान बोंगाणे

ठाणे शहरातील काही ठराविक भागात केंद्रित होणारी वाहनांची व माणसांची गर्दी, मनमानी पद्धतीने होणारी बांधकामे आणि रस्त्यावरील अतिक्रमणे यावर ठाणे महापालिकेचे सध्या कोणतेही नियंत्रण नाही. गर्दीला विकेंद्रित करणारे तर्कशुद्ध नियोजन नाही आणि शहर विकास आराखडय़ातील सार्वजनिक वापराची आरक्षणे विकसित करण्याचे कोणतेही दूरगामी धोरण नाही. त्यामुळे शहराची संपूर्ण ‘इको सिस्टीमच’ धोक्यात आली आहे.

शैक्षणिक भूखंडाचे श्रीखंड कोणाला?
संजय बापट

ठाणे तिथे काय उणे असे म्हणत बदलत्या ठाण्याला आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यावर सध्या भर दिला जात आहे. या शहराने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला असला तरी शैक्षणिक क्षेत्रातील ठाण्याचे मागासलेपण लपून राहिलेले नाही. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळांचा बोलबाला असला तरी महाविद्यालयीन व उच्च आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचा जिल्ह्यातील दुष्काळ अद्याप संपलेला नाही.

आदिवासींसाठी चार दशके अविरत झटणारे समाजसेवक
राजाराम पांडुरंग मुकणे हे ठाणे जिल्ह्याच्या सामाजिक व कायदा क्षेत्रातील एक सुपरिचित नाव. स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी व उपेक्षितांच्या सेवेसाठी १९७० साली त्यांनी जव्हार, वाडा, मोखाडा, डहाणू, पालघर, वसई, शहापूर, ठाणे व मुंबई या भागात वकिलीचा व्यवसाय सुरू केला. जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले वकील. ४० वर्षांत अ‍ॅडव्होकेट मुकणे यांनी असंख्य फौजदारी, दिवाणी, महसूल व इतर विषयांशी संबंधित प्रकरणे विविध न्यायालयात यशस्वीपणे चालवून या क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविला.

‘टोल माफ केला तरच बेस्ट धावणार’
संदीप आचार्य

तब्बल ४५ लाख प्रवाशांना प्रभावी सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाला मदतीचा ‘हात’ देणे तर दूरच परंतु वांद्रे-वरळी सेतुवरून बेस्टची बस चालवायची असल्यास टोल भरावाच लागेल असा फतवा राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काढण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाने या विरोधात दंड थोपटले असून टोल माफ न केल्यास बेस्टची एकही बस या पुलावरून धावणार नाही, असा पवित्रा बेस्टचे अध्यक्ष दिलीप पटेल यांनी घेतला आहे.

दो ‘नयना’ एक कहानी..
पापण्यांची ‘उघडमिट’ ही एक अगदी सहज होणारी क्रिया, परंतु कळत-नकळत होणारी ही हालचाल जेव्हा भगिरथ प्रयत्न करूनही जमेना, तेव्हा मला गीतरामायणातील ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..’ या शब्दांचा अर्थ पुरेपूर उमगला. साधारण एक वर्षांपूर्वी या गोष्टीची सुरुवात झाली. आमच्या घरी नातवाच्या मुंजीनिमित्ताने केळवणाचा बेत ठरला होता. घरात आम्ही दोघंच, म्हणून आठवडाभर आधीच तयारीला सुरुवात केली.

गोरखचिंचेचा नजराणा
‘अगं ते गडकरी रंगायतनच्या समोर गोरखचिंचेचं झाड आहे ना, ते पाऊस यायच्या सुमारास फुलतं बरं का!’ ‘जे जे आपणासी ठावे, ते ते सकळांसि सांगावे’ हे कृतीत आणणाऱ्या माझ्या मैत्रिणीचे, वैदेही गानूचे, हे बोल मी अगदी जाणीवपूर्वक लक्षात ठेवले. ‘गोरखचिंच’ अशी पाटीच आपल्या गळ्यात अडकवून ते झाड ठाण मांडून बसले होते. त्यामुळे हे की ते, कोणते झाड गोरखचिंचेचे अशी शंका घ्यायला जागाच नव्हती. वैदेहीने फुलण्याचा मुहूर्त सांगितल्यामुळे मी त्या झाडाच्या अगदी पाळतीवरच होते म्हणा ना! दर दोन-चार दिवसांनी न चुकता मी झाडाकडे बघून येत होते.

डोंबिवलीची वेधशाळा - लक्ष्मीकांत चिमोटे
भगवान मंडलिक

वर्षांनुवर्षे वेधशाळा पावसाचा अंदाज सांगते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे मागे-पुढे पाऊस पडत असतो. त्यामुळे वेधशाळेला आपण पावसासाठी प्रमाण मानत असतो. पण, एक माणूस स्थानिक पातळीवरची निरीक्षणे घेऊन पावसाचा अचूक अंदाज वर्तवितो. तो अंदाज गणिते, निरीक्षणे आणि दीड हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या बृहतसंहिता, जैन मुनींनी लिहिलेले मेघमाला, भद्रबाहू या प्राचीन ग्रंथांचा आधार घेऊन काढला जातो.

कोकणचे नाव केवळ नावापुरतेच; ही तर दक्षिण रेल्वे!
ठाणे/प्रतिनिधी

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची उमेद बाळगून धावू लागलेल्या कोकण रेल्वेने मूळ कोकणवासीयांची घोर निराशा केली असून या रेल्वेचे कोकण नाव केवळ नावापुरते असून, प्रत्यक्षात ती दक्षिण रेल्वेच असल्याची प्रचीती प्रवाशांना येत आहे. महाराष्ट्राला कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर दादर-रत्नागिरी या एकमेव पॅसेंजर गाडीव्यतिरिक्त एकही अतिरिक्त गाडी पदरात पाडून घेता आली नाही. रोज सकाळी धावणारी दिवा-सावंतवाडी गाडी सावंतवाडीला टर्मिनल नसल्याने मडगांवपर्यंत न्यावी लागते.

एमएमआरडीएच्या प्रकल्पामुळे ठाण्याचे होणार डम्पिंग ग्राऊंड
ठाणे/प्रतिनिधी : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सात महापालिका आणि १३ नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या हजारो टन घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबतचे सर्व प्रयत्न असफल ठरल्यानंतर आता या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे जिल्ह्याचेच डम्पिंग ग्राऊंड करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.