Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९


नाटकाचं अर्थकारण : किती खरं, किती खोटं?
मराठी रंगभूमीच्या सद्य:स्थितीचा धांडोळा घेणारे नाटय़-दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते संतोष पवार आणि समांतर रंगभूमीवरील नाटय़कर्मी गिरीश पतके यांचे लेख ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ (२१ जून) पुरवणीत आम्ही जाणीवपूर्वक प्रसिद्ध केले होते; जेणेकरून नाटय़क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीबद्दल लोकांमध्ये- किमान नाटय़कर्मीमध्ये तरी- या विषयासंबंधी साधकबाधक चर्चा व्हावी आणि त्यातून काही सकारात्मक निष्पन्न व्हावं!

तंत्रज्ञान
उंदराच्या मिशा शोधणार मानवी मेंदूचे रहस्य!

रोबोटिक्समध्ये झालेल्या संशोधनामुळे आता मानवी मेंदू आणि चेतनाक्षमता यांना जोडणाऱ्या प्रक्रियेचे रहस्य उंदराच्या मिशा उलगडणार आहेत. वैद्यक क्षेत्रात मानवी शरीराचा अभ्यास करण्यापूर्वी त्यातील काही प्राथमिक बाबी समजून घेण्यासाठी उंदीर आणि बेडूक यांचा वापर करण्यात येतो. तसाच काहीचा प्रकार तंत्रज्ञानामध्येही करण्यात आला आहे. उंदराशी साध्यर्म असणारा एक रोबो तयार करण्यात आला असून हा रोबो मानवी मेंदू आणि चेतनाक्षमता यांना जोडणाऱ्या प्रक्रियेचे रहस्य उलगडणार असून तो मानवाला विविध कामांमध्ये मदतही करणार आहे.