Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

काँग्रेस इच्छुकांची कोल्हापुरात भाऊगर्दी
कोल्हापूर, ७ जुलै / प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्य़ातील सर्वच्या सर्व म्हणजे दहा विधानसभा मतदारसंघांमधील संभाव्य उमेदवारांची चाचणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या आलेल्या समितीमुळे आज स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या आवारात इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची जत्राच भरली होती. जिल्ह्य़ातून आलेल्या इच्छुक व त्यांच्या समर्थकांच्या वाहनांमुळे स्टेशन रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. सायंकाळी साडे पाच वाजल्यानंतर समितीचे पदाधिकारी निघून गेले. त्यानंतरच वाहतुकीची कोंडी फुटली.

आषाढी यात्रेसाठी अतिरिक्त केरोसिन पंढरीत आलेच नाही
पंढरपूर, ७ जुलै/नंदकुमार देशपांडे

आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीकरिता सोलापूर, पुणे व सातारा या जिल्ह्य़ांसाठी केरोसिन कोटाच मंजूर केला नसून या जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्य़ातील तालुक्यास येणाऱ्या कोटय़ातून रॉकेल पुरवठा करून वारकऱ्यांची गैरसोय दूर केली, असे एका जबाबदार अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सोलापूर जिल्हय़ात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी

पावसाअभावी सोलापूर जिल्ह्य़ात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी पत्रकारांना दिली. जिल्ह्य़ात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ८५ टक्के (८६.०३ मिमी) पाऊस झाला असून, जुलै महिन्यात अद्यापि पाऊस झाला नाही. या दुष्काळसदृश स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने टंचाई निवारणाचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोयना पाणलोटात संततधार सुरु
सातारा, ७ जुलै/प्रतिनिधी

कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाली असून मंगळवारी दिवसभरात महाबळेश्वरात ६६, नवजा येथे ४९ व कोयनेत ३७ मिलिमीटर एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टीएमसीच्या धरणातील पाणीसाठा ३४.०८ टीएमसी इतका असून पाणी पातळी २०८३.११ फूट एवढी आहे.मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासात कोयनेत ११०, नवजात ९४ व महाबळेश्वरात ६७ मिलिमीटर पाऊस झाला आहे, धोम धरण परिसरात-१८, कण्हेर धरण परिसरात-१४, तर उरमोडी धरण परिसरात २५ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.धोम धरणातील पाण्याची पातळी ७३१.३२ मीटर, कण्हेरची ६६७.३६ तर उरमोडीची ६६६.०३ मीटर एवढी आहे. जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात पावसाने दडी मारली आहे. पश्चिम भागात पाऊस सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्या उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. काही भागात आधीच पाऊस झाल्यानंतर आता भातलावण्या सुरु झाल्या आहेत. उगवलेल्या पिकांच्या कोळपण्याही काही भागात उरकल्या असल्याचे सांगण्यात आले.

तीन लाखांची चांदी असलेली बॅग लंपास
सातारा, ७ जुलै/प्रतिनिधी

बाबासाहेब अप्पासाहेब पाटील (रा. रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या चांदीच्या व्यापाऱ्यास १४ किलो ८९८ ग्रॅम चांदी असलेली बॅग लंपास करून गंडा घातला गेला आहे.बाबासाहेब पाटील खासगी आराम बसने कोल्हापूरहून पुणे येथे जात होते. त्यांनी तीन लाख रुपये किमतीच्या चांदीची बॅग असलेल्या सीटखाली ठेवली होती. बस भुईंजजवळील रुची हॉटेल येथे थांबल्यानंतर नाश्ता करण्यासाठी ते गेले असल्याचे पाहून अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरून पलायन केले असल्याची फिर्याद भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

सांगलीत डुकरे, कुत्री पकडण्याची मोहीम
सांगली, ७ जुलै / प्रतिनिधी
सांगली महापालिकेच्या डुक्कर व कुत्री प्रतिबंधक पथकाने आज ९० डुकरे व २५ कुत्री पकडली. या कारवाईदरम्यान, डुक्करमालकांनी कारवाईत अडथळा आणत महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावल्याने पुढील अनर्थ टळला. महापालिका क्षेत्रात नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तसेच बालकांवर कुत्र्यांनी सामूहिक हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यासाठी उपाययोजना म्हणून आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोदाजी व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी शहरातील डुकरे व कुत्री पकडण्याची मोहीम युध्द पातळीवर हाती घेतली आहे. आज स्फूर्ती चौकात डुकरे पकडत असताना डुक्करमालक संपत मोहिते यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली व डुकरे पकडण्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी ऐकत नाहीत, म्हटल्यावर त्यांनी आपली दुचाकी कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांशी संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी संपत मोहिते याला ताब्यात घेतले आहे.

भूमि अभिलेख शिरस्तेदाराला लाच घेताना पकडले
कराड, ७ जुलै/वार्ताहर
शेतजमिनीच्या अतितातडीच्या मोजणीकरिता तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कराड तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार सलीम बापूलाल शिकलगार (वय ४३) हे आज दुपारी साडेबारा वाजता कार्यालयातच रंगेहाथ पकडले गेले. लाचलुचपत विभागाचे फौजदार लक्ष्मण बोराटे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून ही कारवाई यशस्वी करण्यात आली.सागर रामराव कणसे (रा. शेणोली, ता. कराड) यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीच्या तातडीच्या मोजणीसाठी २५ फेब्रुवारी २००८ रोजी अर्ज केला होता. याच दिवशी मोजणीचे शासकीय शुल्क साडेचार हजार रुपयेही त्याच दिवशी भरले होते. मात्र, मोजणीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती. या अतितातडीच्या मोजणीसाठी शिकलगार यांनी सागर कणसे यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यावर सागर कणसे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार सलीम शिकलगार आज लाच स्वीकारताना पकडण्यात आले. शिकलगार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

‘बहुजनांना शिक्षणाची संधी देणारे कर्मवीर भाऊराव रयतेचे महागुरू’
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील दांभिकतेवर प्रहार करून बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. ते खऱ्या अर्थाने रयतेचे महागुरू होते, असे प्रतिपादन प्रश्न. प्रशांत नलवडे यांनी केले. सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या गुरुपौणिर्मेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. उपप्रश्नचार्य उत्तमराव हुंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींकडून गुरुवंदना देण्यात आली. प्रश्न. मोहन चव्हाण यांनी प्रश्नस्ताविक केले.पिढय़ान्पिढय़ा शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजातील मुला-मुलींना कर्मवीरांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यातूनच पुढे महाराष्ट्राचे पुरोगामीत्व सिद्ध झाले, असे सांगून प्रश्न. नलवडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वकर्तृत्वामुळे समाजात खऱ्या अर्थाने गुरूची महती वाढविली, असे उद्गार काढले.या वेळी उपप्रश्नचार्य हुंडेकर यांच्यासह प्रश्न. रावसाहेब ढवण, प्रश्न. डॉ. बाळासाहेब अवघडे, प्रश्न. महादेव कोरी, प्रश्न. मल्लिनाथ अंजुनगीकर, कु. रोहिणी चव्हाण, कु. सपना मारकड, कु. स्वाती भूमकर आदींची भाषणे झाली. कु. लक्ष्मी चव्हाण हिने आभार मानले.

केंद्रीय अर्थसंकल्पावर आज साताऱ्यात चर्चा
सातारा, ७ जुलै / प्रतिनिधी
येथे नव्याने स्थापन झालेल्या बँकर्स क्लब व कै. अण्णासाहेब चिरमुले ट्रस्टच्या वतीने बुधवारी ८ जुलै रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात एन. एस. डी. एल. मुंबईचे कार्यकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांच्या ‘गुंतवणूक पंचायतन’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीराम नानल यांनी दिली.पी. एन. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात प्रश्नरंभी बँकर्स फोरमचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास नागरिक, उद्योजक, अर्थशास्त्राचे अध्यापक, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बँकर्स क्लबचे अध्यक्ष व बँक ऑफ महाराष्ट्रचे सातारा जिल्ह्य़ाचे सहायक महाप्रबंधक रघोत्तम देवळे, कै. आण्णासाहेब चिरमुले ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले यांनी केले आहे.

सांगलीत मतदार याद्यांची पुनर्परीक्षण विशेष मोहीम
सांगली, ७ जुलै / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्य़ात आजपासून मतदार याद्यांची विशेष पुनर्परीक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून जिल्ह्य़ातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यांची प्रत आज जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांच्या हस्ते देण्यात आली. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जनजागरण करून अधिकाधिक मतदार नोंदवतील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. १ जानेवारी २००९ या अर्हता दिनांकावर म्हणजेच १ जानेवारी २००९ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेले भारतीय नागरिक मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमुना सहामध्ये अर्ज करू शकतील. उपरोक्त कालावधीत म्हणजेच ७ ते २२ जुलै या दरम्यान मतदान कंेद्रस्तरीय अधिकारी मतदान कंेद्रावर उपस्थित राहणार आहेत. या अधिकाऱ्यांकडे नमुना सहा, नमुना सात, नमुना आठ व नमुना आठ अ चे अर्ज उपलब्ध होतील. सध्या अस्तित्वात असणाऱ्या मतदार याद्यांमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी नमुना सातमध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्या तपशिलातील दुरुस्ती करण्यासाठी तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत आहे परंतु फोटो छापलेला नाही अशा मतदारांनी नमुना आठचा अर्ज फोटो लावून सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

भिकमचंद गुलेच्छा यांचे निधन
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी

येथील श्वेतांबर जैन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कापडाचे व्यापारी भिकमचंद रायचंद गुलेच्छा (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रस्त्यावरील मारवाडी गुजराती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुलेच्छा हे धार्मिक वृत्तीचे होते. स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत खुमचंद बाफना, भैरुलाल लुंकड, रमेश जैन, पद्मचंद रांका आदींनी गुलेच्छा यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. यावेळी प्रदीप शिंगवी, तिलोकचंद मुनोत, राजेंद्र कांसवा, कांतिलाल कांकरिया, हर्षल कोठारी, भागचंद कोचर आदी उपस्थित होते.

‘शिक्षणामधील बदलांबाबत शिक्षकांमध्ये चर्चा आवश्यक’
कराड, ७ जुलै/वार्ताहर
शिक्षणामध्ये विलक्षण बदल होवू लागले आहेत. हे बदल योग्य की अयोग्य याबाबत शिक्षकांनी परस्परांमध्ये चर्चा करून आपले मत मांडले पाहिजे, असे मत महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष प्रश्न. रमेश पानसे यांनी केले.येथील शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुगौरव समारंभ व विविध पुरस्कारांच्या वितरण समारंभात ते बोलत होते. वाई येथील जनता शिक्षणसंस्थेचे कार्यवाह अनिल जोशी अध्यक्षस्थानी होते तर शिक्षण मंडळाचे चेअरमन मुकुंद कुलकर्णी, सचिव डॉ. रा. गो. प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांचे कार्य वर्गाच्या चार भिंतीपुरतेच मर्यादित राहते, पण त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारांमुळे त्यांचे कार्य समाजापुढे येत असते, असे सांगून, पुरस्कारांमुळे निश्चितच प्रत्येकाला प्रेरणा मिळत असते, असे प्रश्न. रमेश पानसे म्हणाले की, दहावीच्या परीक्षेला अनाठायी महत्त्व दिले जात असल्याची बाब गैर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मोहोळ जायंट्स ग्रुप शाखाध्यक्षपदी बब्रुवाहन गुंड-पाटील
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी
मानव सेवेचे ब्रीद अंगीकारून गेली २५ वर्षे सामाजिक सेवा करणाऱ्या जायंट्स ग्रुप इंटरनॅशनल संस्थेने मोहोळसारख्या ग्रामीण भागात जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण करता आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बब्रुवाहन गुंड-पाटील यांनी समाधान व्यक्त केले.जायंट्स ग्रुपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोहोळ येथे नुकताच पार पडला. त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सलग तिसऱ्यांदा सांभाळण्याची संधी श्री. गुंड-पाटील यांना मिळाली. नूतन पदाधिकाऱ्यांना टूबी फेडरेशनचे सदस्य डी. व्ही. गायकवाड यांनी पदाची शपथ दिली. यावेळी केशव गायकवाड प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे सचिव जे. आर. आराध्ये यांनी प्रश्नस्ताविक केले. मुख्याध्यापक सुधीर गायकवाड यांनी आभार मानले.

वीज उपकेंद्रांसाठी सांगलीत पाच जागा देण्याचा निर्णय
सांगली, ७ जुलै / प्रतिनिधी

बालगंधर्व नाटय़गृहाची वीजजोडणी तत्काळ जोडण्यात येईल, रस्त्यावरचे वीज खांब बाजूला केले जातील. तसेच नवीन सब स्टेशनसाठी महावितरणला पाच ठिकाणी जागा देण्याचा निर्णय महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मिरज येथील बालगंधर्व नाटय़गृहाची वीज जोडणी बराच काळ तोडण्यात आली होती. ती तत्काळ जोडण्यात येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यांची रुंदी वाढविल्यानंतर रस्त्यावरच असणारे विजेचे खांब एक महिन्यात बाजूला रोवण्यात येतील. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाला आहे. विशेषत शंभर फुटी रस्त्यावर असणारे पोल ताबडतोब बाजूला करण्याचा निर्णय झाला. सात एक्स्प्रेस फिडरपैकी सहा पूर्ण झाले आहेत, तर वंटमुरे कॉर्नरच्या फिडरचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. महावितरणला पाच नवे सब स्टेशन सुरू करण्यासाठी जागा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस आयुक्त दत्तात्रय मेतके, उपायुक्त विजय कुलकर्णी, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. डी. चव्हाण, उप कार्यकारी अभियंता प्रमोद सावंत, बांधकाम अभियंता साळुंखे, महापालिकेचे अभियंता सुनील पाटील, अमर चव्हाण, मालमत्ता अधिकारी शिवाजी रसाळे उपस्थित होते.

लक्ष्मी-विष्णू कामगारांना देय रकमांच्या वाटपास प्रश्नरंभ
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी

पंधरा वर्षापूर्वी बंद पडलेल्या लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या कामगारांना देय रकमेवरील व्याज व तडजोडीतील शिल्लक रकमांचे वाटपास प्रश्नरंभ झाला असून, यात पहिल्या टप्प्यात ४२१ कामगारांच्या खात्यावर सुमारे २० लाखांची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती इंटकप्रणीत राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत सुरवसे यांनी सांगितली.सहायक कामगार आयुक्त बी. डी. देशमुख यांच्याकडून सुरू असलेल्या कार्यवाहीनुसार पहिल्या टप्प्यात बँक ऑफ इंडिया (रेल्वे लाईन्स शाखा), ब्रह्मदेव माने सहकारी बँक (दमाणीनगर), स्टेट बँक ऑफ इंडिया (स्टेशन रोज), बँक ऑफ महाराष्ट्र (स्टेशन रोड), बँक ऑफ इंडिया (सुभाष चौक), स्टेट बँक ऑफ इंडिया (ट्रेझरी शाखा, स्टेशन रोड व बाळीवेस शाखा) आदी बँकांमध्ये कामगारांच्या खात्यावर रकमा जमा करण्यात येत आहेत. १५ जुलैनंतर कामगारांनी आपापल्या खात्यावर या रकमा जमा झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन सुरवसे यांनी केले.गेल्या २० जूनपासून कामगारांकडून संबंधित कागदपत्रे स्वीकारण्यात आली आहेत. सुरुवातीला ४२१ कामगारांना त्याचा लाभ मिळणार असून, उर्वरित कामगारांना टप्प्याटप्प्याने देय रकमांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

इंटरस्टिशीयल बॉडी स्कॅन मशिन सोलापुरात प्रथमच उपलब्ध
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी
चेन्नई, कोलकाता व नवी दिल्लीनंतर देशात प्रथमच सोलापुरात विनित हॉस्पिटलमध्ये इंटरस्टिशीयल बॉडी स्कॅन मशिन उपलब्ध झाली आहे. त्याचे उद््घाटन उद्या मंगळवारी गुरुपौणिमेला होत असल्याची माहिती डॉ. विद्याधर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.या नव्या अद्ययावत मशिनमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये शरीरातील सर्व अवयवांचे स्कॅनिंग होते. ह्रदय, मेंदू, मान व पाठीचे मणके, लहान व मोठे आतडे, किडनी, यकृत, प्रश्नेस्टेट, सांधे या अवयवांमध्ये कोणत्या प्रकारची विकृती आहे हे त्वरित समजते. शरीरातील हर्मोन्सचे प्रमाण, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम या खनिजांचे प्रमाण, सोडिअम, पोटॅशिअम आदी क्षारांचे प्रमाणही समजते. ह्रदयविकार, पक्षाघात, संधिवात यांसाठी कारणीभूत घटकांचेही प्रमाण या मशिनीवरुन समजते. त्यासाठी दोन हजार शुल्क आकारले जाणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. शिवाजी चौकातील मनोज लॉजशेजारी सुरु झालेल्या या हॉस्पिटलमधील या उपकरणाचे उद््घाटन बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक बंगारतळे यांच्या हस्ते होणार असून यावेळी बँकेच्या लष्कर शाखेचे व्यवस्थापक दत्तात्रेय कोरे, डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. सुधीर फत्तेपूरकर, नगरसेवक अमोल शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

बँकिंगमध्ये कुटुंबीयांना सामावून घ्यावे - चव्हाण
पेठवडगाव, ७ जुलै / वार्ताहर
बँकिंग क्षेत्रात आर्थिक व्यवस्थापन नियोजनाबरोबरीने आर्थिक सुरक्षितता, योग्य गुंतवणूक महत्वाची असून या बँकिंग व्यवहारात आपल्या कुटुंबीयांनाही सामावून घ्या असे आवाहन वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक वसंतराव चव्हाण यांनी वारणानगर येथे केले.भारतीय स्टेट बँकेच्या वारणानगर शाखेच्या ग्राहक मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळून तो चर्चा व प्रश्नोत्तराने चांगलाच रंगला. या ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून श्री.चव्हाण बोलत होते. जगातील आर्थिक स्थिती बँकिंग क्षेत्र भारतावरचा परिणाम यावर त्यांनी सविस्तर विवेचन करून गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा त्याची सुरक्षितता पाहा असे त्यांनी सांगितले.
स्टेट बँकेच्या वारणानगर शाखेचे व्यवस्थापक प्रदीप मोरे यांनी सर्वाचे स्वागत करून ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विविध योजनांविषयी माहिती दिली आणि येथील पी.पी.एफचे धनादेश कोल्हापूरला पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगितले. यावेळी प्रश्न.नंदकुमार चिखलकर यांनी तीनच दिवसात गृहकर्ज मिळाल्याचा विशेष उल्लेख करताना त्यांच्यासह प्रश्न.एस.एस.पाटील, एस.ए.कुलकर्णी, जे.एस.पाटील, प्रताप पाटील आदींनी आदराच्या ग्राहकसेवेचा विशेष उल्लेख केला. प्रदीप रांगणेकर यांनी आभार मानले.

बँक लेखनिकाच्या मृत्यूच्या गुप्तचर चौकशीची मागणी
सांगली, ७ जुलै / प्रतिनिधी
सांगली अर्बन को-ऑप. बँकेच्या मानवत शाखेतील लेखनिक जयंत मन्नूर यांनी बँकेतील काही जणांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असून याची सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी केली आहे. मन्नूर हे सांगलीत राहात होते. दहा वर्षांपूर्वी त्यांची मराठवाडय़ात बदली करण्यात आली होती. त्यांनी सांगली परिसरात बदलीसाठी वारंवार विनवणी केली होती. परंतु त्यांची बीडहून सांगलीला बदली न करता मानवतला केली. एखाद्या कर्मचाऱ्याला इतकी वर्षे कुटुंबापासून दूर ठेवण्याचे धोरण संबंधितांनी का ठेवले, याची सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी बर्वे यांनी केली आहे.

शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण
सांगली, ७ जुलै / प्रतिनिधी
मारूती चौकात असणाऱ्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व परिसराची सुशोभिकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी दिले. आज आयुक्तांनी शिवाजी पुतळ्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. शिवाजीराजांच्या हातातील लगाम खराब झाले असून तसेच पंचधातूचे नवे लगाम, शिडी बसविणे, चबुतऱ्याला पॉलिश करणे, परिसरात विद्युत रोषणाई करणे यासंबंधी आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शिवप्रतिष्ठानच्या सूचनेनुसार या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येईल. यावेळी नगरसेवक पृथ्वीराज पवार, युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.

‘यंत्रमाग कामगार कल्याण अहवालावरील टीकेचे स्वागत’
इचलकरंजी, ७ जुलै / वार्ताहर

यंत्रमाग कामगार कल्याणचा प्रकाश आवाडे अहवाल हा आज महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आहे. काही मंडळी त्यावर टीका करतात. पण जेवढी टीका होईल तेवढी चर्चा होईल आणि त्यातून अधिक फायदा होईल ही माझी धारणा आहे, असे मत आमदार प्रकाश आवाडे यांनी यंत्रमाग कामगारांचे शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना काँग्रेस भवनमध्ये काढले. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक आरगे हे होते. आमदार आवाडे म्हणाले की, किमान वेतन हे निराळे सूत्र असून कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमाने कामगारांना कायद्याचा फायदा व्हावा आणि या व्यवसायातील त्रुटी दूर व्हाव्यात हे लक्षात घेवून सर्व घटकांना लाभ हे त्याचे सूत्र ठेवले आहे. शासनाने पैसे घालून उभी केलेली पहिली योजना आहे. अहवालात काही त्रुटी निश्चित दूर केल्या जातील.महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी यांनी त्रिस्तरीय समितीकडून एकमुखाने सादर होणारा आवाडे यंत्रमाग कामगार अहवाल असून या योजनेमुळे या व्यवसायात कामगार स्थिर होईल, असे सांगितले.

सारस्वत बँकेसमोर स्वयंनिवृत्तांचे धरणे
सांगली, ७ जुलै / प्रतिनिधी

सारस्वत बँक व्ही आर एस कर्मचाऱ्यांनी आपल्या आर्थिक मागण्यांसाठी बँकेच्या सांगली येथील विभागीय कार्यालयासोर धरणे आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी मुरघाराजेंद्र बँक व्यवस्थापन कर्मचारी यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे व सप्टेंबर २००६ मधील संचालक मंडळ ठरावाप्रमाणे १ ऑक्टोबर २००६ पासून २५ टक्के पगारवाढ मिळावी. व्ही आर एस कर्मचाऱ्यांना राहिलेल्या नोकरीच्या कालावधीचा संपूर्ण पगार मिळावा. तसेच त्यांना, ३१ जानेवारी, २००९ अखेर मेडिकल, क्लोजिंग अलाउंस, शिल्लक आजारी रजेचा पगार व बोनस मिळावा. सी आर एस कर्मचाऱ्यांना व्ही आर एस मध्ये समाविष्ट करावे. व्हिजनल दोषी असलेले कर्मचारी सध्या बँकेत काम करीत असून त्यांच्यावर कारवाई करावी. या मागण्या केल्या आहेत. अण्णा हजारेप्रणित, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास जिल्हाध्यक्ष प्रश्न. बाळासाहेब हाके, वीरेंद्र राजमाने यांच्या बसवेश्वर जमखंडे, संजय व्हनखडे यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

विश्वचरित्रकोशकार कामत यांचा रविवारी अमृतमहोत्सवी सत्कार
सातारा, ७ जुलै/प्रतिनिधी

अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिटय़ूटचे मानद सदस्य, विश्वचरित्रकोशाच्या सहा खंडांचे कार्य पूर्णत्वाकडे नेणारे साहित्य विशारद श्रीराम पांडुरंग कामत (पर्वरी गोवा) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये येत्या रविवारी सायंकाळी ६ वाजता सत्कार आयोजित केला असल्याची माहिती विद्यादीप फाऊंडेशनचे संस्थापक कार्यवाह प्रश्न. दीपक ताटपुजे यांनी दिली.मराठी विश्वकोश, वाई येथील मानव्य विद्याशाखेचे संपादक डॉ. सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यादीप फाऊंडेशनचे अध्यक्ष बी. टी. वाडकर यांच्या हस्ते श्रीराम कामत यांचा सत्कार होणार आहे. जागतिक स्तरावर विश्वचरित्रकोश अन्य कोणत्याही भाषांमधून अद्याप झालेला नाही. या प्रकल्पाबाबत श्रीराम कामत यांची प्रश्न. दीपक ताटपुजे प्रकट मुलाखत घेणार असून, विश्वचरित्रकोशाच्या पाच खंडांचे प्रदर्शन लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.श्रीराम कामत यांना नुकताच महाकवी कुलगुरू कालिदास पुरस्कार प्रश्नप्त झाला आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रश्न. दीपक ताटपुजे यांनी केले आहे.

‘प्रणीती शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी सोलापुरातून मिळावी’
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी
केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या तथा जाई-जुई विचार मंचच्या संस्थापिका कु. प्रणीती शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोलापूर शहर मध्य किंवा मोहोळ (राखीव) मधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष, नगरसेवक सुनील खटके यांनी केली.यासंदर्भात पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना खटके म्हणाले की, जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्य़ात सामाजिक कार्य करीत असताना कु. शिंदे यांनी सामान्य गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. विशेषत महिला व युवकांच्या कल्याणासाठी त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले कार्य काँग्रेसला बळकटी देणारे आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या म्हणून नव्हे तर युवा नेत्या म्हणून त्यांना विधानसभेची संधी मिळावी, असे नगरसेवक खटके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस युवक काँग्रेसचे पदाधिकारी रमेश जाधव, बिट्टूभाई कुरेशी, राजीव क्षीरसागर, जनार्दन येमुल, राहुल गोयल, जितेंद्र वाडेकर आदी उपस्थित होते.