Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रोजगारनिर्मिती कार्यक्रमात सव्वाआठ कोटींचे प्रस्ताव
सांगली, ७ जुलै/प्रतिनिधी

 

पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्य़ात गतवर्षी १२० लाभार्थ्यांची निवड करून आठ कोटी २९ लाख २२ हजार रकमेची प्रकरणे राष्ट्रीयीकृत बँकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष प्रश्न. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर जाधव, जिल्हाधिकारी श्याम वर्धने, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी आर. एन. नारखेडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी पोतदार, पलूस पंचायत समितीच्या सभापती पुष्पलता उगळे, शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रश्नचार्य श्रीमती देशपांडे, जिल्हा उद्योग कंेद्राचे निरीक्षक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमाची जिल्ह्य़ात खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग कंेद्राच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी होत असून, गतवर्षी बँकांकडे पाठविलेल्या १२० लाभार्थ्यांच्या प्रकरणांपैकी ३५ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली असून, अडीच कोटींवर रक्कम विविध ग्रामोद्योगांसाठी मंजूर करण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्य़ात मधमाशा पालन उद्योगासही पूरक वातावरण असून, हा एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून करण्यास तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही अध्यक्ष प्रश्न. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. प्रश्नरंभी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी नारखेडे यांनी स्वागत करून बैठकीसमोरील विषय विशद केले.