Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

प्रादेशिक


गुरूपौर्णिमेनिमित्त विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या शिक्षकांना फुले देऊन गुरूपूजन केले. छाया : प्रदीप कोचरेकर

‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’चा नियम कागदावरच!
मुंबईकर वाया घालवतात हजारो लिटर पाणी!

मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी
पाणी म्हणजे जीवन.. ते जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासन नेहमीच करीत असते. मात्र पाणी वाचविण्यासाठी पालिकेने केलेल्या नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे मुंबईकरांवरील पाणी संकट अधिक तीव्र झाले आहे. आताच्या संकटाच्या काळात तरी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने पुन्हा एकदा केले आहे.

सावरकरांच्या ‘त्या’ ऐतिहासिक उडीच्या शताब्दीनिमित्त
नियोजित स्मारकासाठी आज दिल्लीत सभा

मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी मारून पोहत जाऊन फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवला. या ऐतिहासिक घटनेला पुढील वर्षी ८ जुलै २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. मार्सेलिस येथे सावरकर यांचे भव्य स्मारक उभे राहावे, त्यासाठी विलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रातर्फे उद्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

माथाडींच्या धर्तीवर राज्यात स्थापणार बॉलीवूडचे कामगार कल्याण मंडळ
समर खडस
मुंबई, ७ जुलै

माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या मंडळाच्या धर्तीवरच बॉलीवूड तसेच विविध दूरचित्रवाहिन्यांवरील बडय़ा अभिनेत्यांपासून ते अगदी स्पॉटबॉय व लाइटमनपर्यंतच्या लाखो कलावंत व कामगारांच्या कल्याणासाठी राज्यात एका मंडळाची निर्मिती होणार आहे. कामगार मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत आज सांगितले की, याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाने तत्त्वत: मान्यता दिली असून या मंडळाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

राणेंच्या माजी सचिवाच्या घरी ९६ लाखांची चोरी
मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे माजी स्वीय सचिव रवी कामत (४१) यांच्या घरातून आज त्यांच्या नोकरानेच ९६ लाख रुपये चोरून पोबारा केला. आपल्या साथीदारासह सफाईदारपणे चोरी करणाऱ्या नोकराचा पोलीस शोध घेत आहेत.

१७ व्या मजल्यावरून उडी मारून व्यापाऱ्याची आत्महत्या
मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी

पेडर रोड येथील एका गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून मुकेश ठक्कर (४६) या व्यापाऱ्याने उडी घेऊन आज आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप कलेले नाही. ठक्कर हे विमानतळावर क्लिअरिंग आणि फॉरवर्डिगचे काम करीत होते. जसलोक रुग्णालयासमोरील ‘शेठ मिनार’ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावर ठक्कर राहतात. सकाळी सातच्या सुमारास इमारतीच्या पहारेकऱ्याला गॅरेजच्या छतावर ठक्कर पडलेले आढळले.

वांद्रे-वरळी सेतूवर चित्रिकरणास विरोध
मुंबई, ७ जुलै / खास प्रतिनिधी

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी विचारणा होऊ लागली आहे. मात्र सुरक्षा आणि वाहतुकीचा मुद्दा लक्षात घेता या पुलावर चित्रीकरणास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ‘नागरिक’ या स्वयंसेवी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.चित्रपटाचे कोठेही चित्रीकरण सुरू असल्यास तेथे आपसूकच गर्दी होते. सागरी सेतूवर चित्रीकरणाला परवानगी दिल्यास वाहतुकीची कोंडी होईल, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. यामुळेच चित्रीकरणास परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य शासन व राज्य रस्ते विकास मंडळाकडे केल्याचे संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांनी सांगितले.
सेतुच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.

दोन घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू
मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी

कांदिवली येथे आज दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने बापलेकासह तीनजण मृत्यू पावले.कांदिवली येथील गणेशनगर आणि संजयनगर झोपडपट्टीत या दोन्ही घटना घडल्या. गौतम (९) आणि नथुराम भोळे (३०) या बापलेकासह ओमप्रकाश वर्मा (४०) अशा तिघांचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला, तर शंभूनाथ झा (३८) हा जखमी झाला. गौतम झोपडीतील लोखंडी शिडीवरून खाली उतरत असताना शेजारीच असलेल्या विजेच्या वायरचा त्याला स्पर्श झाला आणि तो त्याला चिकटला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले नथुराम यांनाही त्यामुळे विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्या दोघांना वाचविण्यासाठी गेलेला झा यालाही विजेचा झटका बसला. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत वीजपुरवठा खंडित केला व तिघांनाही भगवती रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत, संजयनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या वर्मा यांचा मृतदेह घरात एकाकी अवस्थेत आढळून आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या घरातील टेबलफॅन सुरू असल्याचे आणि त्याचा पुढील भाग तुटल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्यांचाही मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

व्यापाऱ्याची आत्महत्या
मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी

पेडर रोड येथील एका गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून मुकेश ठक्कर (४६) या व्यापाऱ्याने उडी घेऊन आज आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप कलेले नाही. ठक्कर हे विमानतळावर क्लिअरिंग आणि फॉरवर्डिगचे काम करीत होते. जसलोक रुग्णालयासमोरील ‘शेठ मिनार’ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावर ठक्कर राहतात. इमारतीच्या पहारेकऱ्याला गॅरेजच्या छतावर ठक्कर पडलेले आढळले.