Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

सेव्ह राणी बाग
बोटॅनिकल गार्डनचे भवितव्य टांगणीला?

प्रसाद रावकर, रेश्मा जठार

मुंबईची एक ओळख बनलेले ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणीसंग्रहालय’ म्हणजेच राणीच्या बागेचा कायापालट करण्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेला घाई लागली आहे. परंतु उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नेमके कोणते बदल करणार, वृक्षसंपदेची जपणूक कशी करणार, सर्वसामान्य जनतेला भविष्यात या उद्यानात फेरफटका मारण्याचे प्रवेश शुल्क परवडणार का, आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले असून त्यांची स्पष्ट उत्तरे पालिकेने अद्याप दिलेली नाहीत.

कचऱ्यातून फुलविला मळा
डायमंड गार्डन भागातील रहिवाशांच्या कष्टांचे चीज

सुनील डिंगणकर

तुडुंब भरलेली कचराकुंडी, कचराकुंडीच्या आजूबाजूला पसरलेली कचरा हे दृश्य मुंबईकरांना नित्याचेच आहे. कचराकुंडी असूनही कित्येक भाग अस्वच्छच दिसतात. चेंबूरमधील डायमंड गार्डन परिसरात एकही कचराकुंडी नाही. असे असूनही हा भाग ‘स्वच्छ आणि हरित’ दिसतो. एवढेच नव्हे तर जवळपास प्रत्येक इमारतीचा परिसर फुलांनी आणि शोभेच्या झाडांनी सजलेला आहे.

टॅक्सी, रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणासाठी तडजोड फी आकारणी रद्द
प्रतिनिधी

मुदत संपलेल्या टॅक्सी आणि रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी आणि चालू असलेल्या परवान्यावर नोंदलेल्या वाहनाऐवजी दुसरे वाहन नोंदण्यासाठी ‘तडजोड शुल्क’ (कम्पाउंिडग चार्जेस) म्हणून लठ्ठ रक्कम आकारण्याचा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा (आरटीए) निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

इंग्रजी ग्रंथमहोत्सव
प्रतिनिधी : फोर्ट बुक डिस्ट्रीब्युटर्सतर्फे कांदिवली पश्चिम येथील लोहाना महाजनवाडी इंग्रजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ जुलैपर्यंत ग्रंथप्रदर्शन सुरू राहणार असून तब्बल ५० हजारहूनही अधिक ग्रंथ यात उपलब्ध आहेत. लहान मुलांना आवडतील अशी पुस्तकेही सवल्तीच्या किमतीत उपलब्ध आहेत, अशी माहिती युनिस शिकारी यांनी दिली.