Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ‘येस् मेगा उत्साह’ कार्यशाळा
नाशिक / प्रतिनिधी

 

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे शहरात पहिल्यांदाच १३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खास ‘यस् मेगा उत्साह’ कार्यशाळा आठ ते ११ जुलै या कालावधीत सायंकाळी साडेपाच ते साडेनऊ या कालावधीत गंगापूररोड येथील अथर्व मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती प्रशिक्षक सचिन म्हसणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी समन्वयक आरती बारपांडे उपस्थित होत्या. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध क्रिया, प्राणायाम, खेळ आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून सकारात्मक दृष्टीकोन कसा महत्वाचा आहे, याबाबत माहिती दिली जाणार आहे. मानसिक, आर्थिक ताणतणावाखाली विद्यार्थी वावरत असतांना मनावरील ताण कमी होऊन एकाग्रता वाढविण्याच्या दृष्टीने कार्यशाळा महत्वाची असल्याचे म्हसणे यांनी सांगितले. याच कालावधीत विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण जाणून घेण्यासाठी यंदा पालकांसाठीही सकाळी अकरा ते दुपारी एक, सायंकाळी चार ते सात या कालावधीत दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ वर्षांखालील मुलांच्या पाल्यांसाठी ‘नो युअर चाइल्ड’, अठरा वर्ष वयोगटासाठी ‘नो युअर टीम’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९३७१८२८८३४, ०२५३-२३७०२०२० या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय सर्व स्तरातील विद्यार्थी व पालकांसाठी २१ ते २६ जुलै या कालावधीत ‘जीवन’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.