Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ जुलै २००९
  बांधकाम क्षेत्रातील 'मेहनताना'
  बांधकाम क्षेत्र: रोजगाराचे प्रकार
  करिअर नामा
फायनान्शियल प्लॅनर
  करिअर सल्ला
पाणी व्यवस्थापन अर्थात जीवन संवर्धन
  स्पर्धा परीक्षा- वस्तुनिष्ठ सामान्यज्ञान
  अशक्याचे शक्य
  व्यावसायिक शिक्षण की शैक्षणिक व्यवसाय
  स्पर्धा परिक्षांचे जग
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
  डिफरंट एमबीए
फ्लोरिकल्चर अ‍ॅण्ड हॉर्टिकल्चर मॅनेजमेंट

बांधकाम क्षेत्रातील 'मेहनताना'
जगातील प्रगत राष्ट्रांची ओळख ही त्या राष्ट्राच्या सुधारणा व विकास घडामोडींवर जास्त अवलंबून असते. पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात अस्तित्वात येतात त्या ठिकाणचे जीवनमान उच्च प्रतीचे समजले जाते. तर हे सर्व ज्यामुळे शक्य आहे ते म्हणजे तेथील बांधकाम क्षेत्र व जागतिक सुधारण्याच्या श्रेणीत मोडणारे हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
स्थापत्य अभियांत्रिकीच्या अधिपत्याखाली येणारे रस्ते, रेल्वे, पूल, इमारती, धरणे, कारखाने, शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर इ.ची निर्मिती होत असते. या सर्वाचा समावेश हा बांधकाम क्षेत्रात होत असतो. म्हणूनच आज या क्षेत्रास संपूर्ण जगात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये सर्वात जास्त करांचा भरणासुद्धा याच बांधकाम क्षेत्रापासून
 

होत असतो. सर्वात जास्त लागणारी मेहनत व त्या मेहनतीमधून मिळणारा चांगला पैसा हे सुद्धा या क्षेत्राचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. वरील सर्वच वैशिष्टय़ांपेक्षा अजून एक आगळेवेगळे विशेषण म्हणजे शिक्षण असले तरी किंवा नसले तरीसुद्धा या बांधकाम क्षेत्रात प्रत्येकजण काम करू शकतो. शिक्षणाशिवाय रोजी-रोटी देणारे हे एकमेव क्षेत्र आहे. प्रचित व प्रचलित असल्यानेच या क्षेत्राकडे लोकांचा ओढा व स्थलांतरांचे लोण हे नेहमी आकर्षिले जातात. इतर क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी त्याचे शिक्षण व त्यात पात्रता मिळविण्यासाठी पैशाची गरज सर्वात प्रथम लागत असते.
अशिक्षित असून व स्वत:चा नया पैसा खर्च न करतासुद्धा या बांधकाम क्षेत्रात सर्वसामान्य व गोरगरिबांना काम मिळत असते. रोजगाराच्या अनेक संधी या क्षेत्रात असून आपल्या आवडीनिवडीप्रमाणेसुद्धा आपण काम करून आपली कुशलता दाखविता येऊ शकते. बांधकाम क्षेत्रातील रोजगार उपलब्ध संधी याविषयी चर्चा करण्यासाठी हा लेखप्रपंच.
बांधकाम क्षेत्रांमध्ये सुशिक्षित व अशिक्षित लोकांना स्थान असल्याने सर्वानाच आपल्या गुणांमुळे यशस्वी होऊन जीवनातील इच्छा व मनातील गोष्ट साध्य करता येऊ शकते. अशिक्षित माणूस म्हणजे शाळेत न गेलेला, लिहिता- वाचता न येणारा व औपचारिक शिक्षण न घेतलेला पण चांगल्या व्यावहारिक ज्ञानामुळे आपले शहाणपण सिद्ध करणारा तसेच आपले दु:ख, दारिद्रय़ संपवण्यासाठी झटणारा.
सुशिक्षित माणूस म्हणजे शाळेत गेलेला, लिहिता- वाचता येणारा, दररोजच्या परिस्थितीचा समर्थपणे सामना करणारा, व्यावहारिक ज्ञान जास्त असणारा तसेच त्या कामाचे शिक्षण घेतले असल्याने त्यात आपली कुशलता दाखविणारा.
वरील प्रत्येकाला आपल्या शिक्षणाप्रमाणे, आवडीनिवडीप्रमाणे, एखाद्या गोष्टीच्या किंवा कामाच्या आकर्षणाने तसेच शिक्षण नसलेल्या व पोटाची खळगी भरणाऱ्या अनेक या क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध आहेत.
बांधकाम क्षेत्र व परप्रांतीयांचे वर्चस्व
साधारणत: आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश व बिहार या सहा राज्यांतून आलेल्या लोकांचा भरणा हा बांधकाम क्षेत्रात आज पाहावयास मिळतो. मेहनतीचे काम म्हणजे बिगारी काम करणाऱ्यात ओरिसा व प. बंगाल या राज्यांतील लोक जास्त तर इमारतीचे सुतारकाम करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश व बिहारींचा सहभाग जास्त आहे. बांधकाम व प्लॅस्टर मिस्त्री (कडिया) काम करणारे हे आंध्र प्रदेश व कर्नाटकातून फार मोठय़ा प्रमाणावर येत असतात.
लोखंडी सळ्यांचे फिटर काम करणारे हे प. बंगाल व बिहार या राज्यांतील जास्त प्रमाणात या क्षेत्रात आहेत. एकंदरीत आपण बघितल्यास तर या मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर परप्रांतीयांचेच वर्चस्व जास्त प्रमाणात आहेत व हे काम करण्यासाठी लोक खूप मोठय़ा संख्येने मुंबईला येत आहे. हमखास रोजी रोटी व कमावला तर खूप पैसा अशी सुवर्णसंधी फक्त याच बांधकाम क्षेत्रातून मिळू शकते. याच क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी येणारे लोंढेसुद्धा कमी नाहीत. या स्थलांतरित लोकांमुळे मुंबईच्या नागरी सेवा म्हणजे वीज, पाणी, ड्रेनेज, रस्ते यांवर कमालीचा ताण सतत पडत आहे व मूळ लोकसंख्येच्या दुपटीपेक्षा जास्त लोकांचा भार या महानगरवर दररोज व सतत पडत असल्याने मूलभूत सेवांचा बोजवारा उडाला आहे.
बांधकाम क्षेत्र व मराठी माणूस
बांधकाम क्षेत्रात काम करणारा मराठी माणूस फक्त नावापुरताच उरला आहे. जेमतेम काही टक्के एवढीच या क्षेत्रात त्यांची हजेरी आहे. कामे करताना वाटणारी लाज, कमीपणा यामुळे या बांधकाम क्षेत्रातील कामे ही इतर राज्यातील लोकांनी घेतली व वेळच्या वेळी ती पूर्ण करून द्यायची हमी असल्याने आपसूकच हे क्षेत्र परप्रांतियांचे जीव की प्राण बनले व याच कारणांनी या क्षेत्रातून मराठी माणूस हद्दपार झाला आहे.
मराठी माणसांच्या यशस्वी होण्यातसुद्धा हे बांधकाम क्षेत्र काही कामाचे नाही असा बऱ्याच लोकांचा समज आहे, पण तो चुकीचाच आहे. तात्काळ इच्छापूर्ती एका रात्रीत करोडपती होण्याची इच्छा, चिकाटीचा अभाव यशस्वी व पैसा कमविण्याचा सोपा व झटपट मार्ग शोधणे, कामाची लाज, संधी ओळखण्याची क्षमता नसणे, दैववादी मनोवृत्ती, मनाची तयारी नसणे, हाव, स्वार्थीपणा ही मनुष्याच्या अपयशाची कारणे आहेत. ही कारणे जेव्हा मानवाच्या आयुष्यातून जातील तेव्हाच यश मिळवता येऊ शकेल, विजयी होणे शक्य होऊ शकेल व प्रयत्नांनी कठोर परिश्रमांनीच तो विजयपथ तयार होऊ शकेल.
सुधीर मुकणे
९८२१३८६६१४