Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

मार्डचा संप; आरोग्य सेवा कोलमडली
* शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या * अत्यवस्थ रुग्णांचीच सेवा * मेयोत आजपासून संप
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे विद्यावेतनात वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी मेडिकलमधील निवासी डॉक्टर्सनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली. रुग्णालयातील आंतरवासी विद्यार्थ्यांनीही आजपासूनच आंदोलन सुरू केल्याने गोंधळात अधिकच भर पडला. त्यामुळे मेडिकलमध्ये नेहमी दिसून येणारी रुग्णांची गर्दी आज नजरेत आली नाही. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची घोषणा मार्डने केल्याने मेडिकलमधील आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठवणुकीला अखेर मुहूर्त गवसला
* १४ गावे पाण्याखाली येणार
* शेती न करण्याचे आवाहन
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
गोसीखुर्द धरणात पाणी साठय़ाचा मुहूर्त निघाला आहे. येत्या आठवडय़ात त्यात पाणी साठवण्यात येणार असून परिसरातील तब्बल १४ गावे पाण्याखाली येणार आहेत. मात्र, गावकऱ्यांचा त्यास विरोध असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने गोसीखुर्द धरणात गेल्या दीड वर्षांपासून पाणी साठा करण्याची तयारी केली आहे.

खैरलांजी हत्याकांड; सीबीआयचे अपील दाखल
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेत वाढ करावी, तसेच त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली लावलेले आरोप कायम राखावे, या मागणीसाठी सी.बी.आय.ने केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल करून घेतले आहे.

‘नॉनस्टॉप’ रुळावर धावणार कशी?
रेल्वे अधिकाऱ्यांपुढेच प्रश्नचिन्ह
राजेश्वर ठाकरे
नागपूर, ८ जुलै

गाडय़ांची संख्या आणि त्यामुळे दिवसभर व्यस्त असलेले रेल्वे मार्ग या पाश्र्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट ‘नॉनस्टॉप’ गाडय़ा सुरू करण्याची रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा प्रत्यक्षात कशी उतरणार याबाबत रेल्वेचे अधिकारीच साशंक आहेत. नोकरदार आणि व्यावसायिकांकरिता ऐतिहासिक ‘नॉनस्टॉप ट्रेन’ सुरू करण्याचा संकल्प रेल्वेमंत्र्यांनी सोडला आहे.

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे, पाणीपुरवठा योजना
राजेंद्र वाडेकर

मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा जो ग्रामीण भाग बारमाही रस्त्यापासून उपेक्षित व दुर्लक्षित होता त्याकडे लक्ष देऊन सर्व खेडी पक्क्या रस्त्यांनी मलकापूर व नांदुरा शहराला जोडण्यासाठी आमदार म्हणून चैनसुख संचेती यांनी पुढाकार घेतला. आमदार संचेती यांनी ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात पक्के रस्ते केले व ग्रामीण जीवन दळणवळणाच्या सुविधेने परिपूर्ण केले.

नागपूर जिल्ह्य़ातील शाळांचे २० लाख विद्यार्थी देणार एकाचवेळी परीक्षा
शैक्षणिक उपक्रमांच्या नियोजनाचे वेळापत्रक
नागपूर ८, जुलै/ प्रतिनिधी

गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी आगामी शैक्षणिक वर्षात होणाऱ्या विविध घटक चाचण्या व दोन सत्र परीक्षा सर्व शाळांमधून एकाचवेळी घेण्यात येणार असून त्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. परीक्षांचे हे वेळापत्रक शाळांना मोफत देण्यात येणार असून ते प्रत्येक शाळेने आपआपल्या केंद्र प्रमुखाकडून घ्यावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांनी केले.
परीक्षा हा शालेय मूल्यमापनाचा अविभाज्य घटक आहे.

अदानी कंपनीची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्य़ातील लोहारा राखीव जंगलाच्या परिसरात अदानी कंपनीला कोळसा खाणीसाठी केंद्र सरकारने दिलेली परवानगी रद्द करावी, या मागणीसाठी २० जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येत असल्याची माहिती ईको-प्रश्ने या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अदाणी कंपनीला देण्यात आलेले लोहारा राखीव जंगल (पूर्व) यापूर्वी निप्पान डेन्रो कंपनीला व लोहारा राखीव जंगल (पश्चिम) एसीसी कंपनीला देण्यात आले होते.

ऋषिकेश, मधुरा आणि अमृताने रसिकांना जिंकले
डॉ. सुलभा पंडित

‘झी’ टी.व्ही. मराठी आणि ‘स्वरवेध’ नागपूर, प्रस्तुत झालेल्या ‘महाराष्ट्राचा आजचा आवाज’ या कार्यक्रमात, या स्पर्धेतील तीनही कलावंतांनी आपली कला मन:पूर्वक सादर केली. त्यांच्या चाहत्यांनी भरगच्च उपस्थितीने त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रम सुरू होण्यास हॉल उशिरा मिळाल्यामुळे विलंब झाला होता. तरीही श्रोत्यांचा उत्साह मात्र शेवटपर्यंत टिकून होता.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही रुग्ण तपासणीवर बहिष्कार
* वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याची मागणी
* आंदोलन ७५ टक्के यशस्वी झाल्याचा दावा

नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्या यासह अन्य प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांतर्गत जिल्ह्य़ातील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज बाह्य़ रुग्ण तपासणीवर बहिष्कार घातला. या आंदोलनाला जिल्ह्य़ात ७५ टक्के प्रतिसाद लाभल्याचा दावा आरोग्य अधिकारी महासंघाच्या नागपूर शाखेने केला आहे. जिल्ह्य़ात एकूण ४९ प्रश्नथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांवर आरोग्य सेवेतील गट (अ) राजपत्रित वैद्यकीय अधिकारी सेवा देतात.

‘दिंडी चालली पंढरी’चा बहारदार नृत्याविष्कार
वातावरण पंढरपूरमय
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
महाराष्ट्राची लोककला व संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या शंभर कलावंतांच्या बहारदार व आगळ्यावेगळ्या नृष्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. संतकवी कमलासूत अमृत महोत्सव स्वागत समिती व श्रीरंग विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृहात नृत्य आणि संगीताने नटलेला ‘दिंडी चालली पंढरी’ हा कार्यक्रम पार पडला. पाश्चात्य संस्कृतीमुळे लोककला लोप पावत असताना श्रीरंग संगीत विद्या मंदिराच्या शंभर कलावंतंनी रंगारंग कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

मधुकर खिस्ती यांचा संशयास्पद मृत्यू
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी

नागपुरातील एका जाहिरात एजन्सीचे मालक मधुकर पांडुरंग खिस्ती (रा. बजाज नगर) यांचा बुधवारी पहाटे संशयास्पद मृत्यू झाला. प्रताप नगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बेशुद्धावस्थेत असलेल्या एकाला उपचारासाठी आणले असल्याची सूचना मध्यरात्रीनंतर मेडिकल रुग्णालयातून प्रताप नगर पोलिसांना मिळाली. हे समजताच प्रताप नगर पोलीस रुग्णालयात गेले.

लोकेशचंद्र व आभा शुक्लांना संपत्तीचे विवरण मागितले
केंद्रीय माहिती आयुक्तांचे आदेश
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
शासकीय सेवेत असताना मिळवलेल्या संपत्तीचे विवरण जाहीर करावे लागू नये म्हणून सनदी अधिकारी लोकेशचंद्र व आभा शुक्ला यांची धडपड पुन्हा अयशस्वी झाली आहे. या संपत्तीची माहिती अर्जदार सुनील मिश्रा यांना २० दिवसात द्यावी, असा आदेश केंद्रीय माहिती आयुक्तांनी दिला आहे. या मुद्यावर यापूर्वी उच्च न्यायालयात लोकेशचंद्र यांच्या बाजूने निकाल झाल्यामुळे या परस्परविरोधी निकालांपैकी कोणता निकाल वरचढ ठरतो, हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

बचत गटांचा महासंघ स्थापन करणार
कामकाजात सुसूत्रता आणण्याचा उद्देश
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
स्वर्णजंयती ग्राम स्वयंरोजगार योजनेला अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने जिल्ह्य़ातील गावपातळीपासून तर, शहरापर्यंत असलेल्या सर्व बचत गटांना एकोसुत्रात बांधण्यासाठी बचत गटांचा महासंघ स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. ग्रामविकास खात्याचे उपसचिव अविनाश सुभेदार यांनी ६ जुलैला सर्व विभागीय आयुक्तांना याबाबत पत्र पाठवले आहे.

एमएडीसी, बीपीसीएलमध्ये सामंजस्य करार
विमान कंपन्यांच्या इंधनाचा प्रश्न सुटणार
नागपूर, ८ जुलै/प्रतिनिधी

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार बीपीसीएल कंपनीला विमान इंधन पुरवठा केंद्राची उभारणी करण्यासाठी १०.३५ एकर जमीन ९९ वर्षासाठी लीजवर देण्यत आली आहे. अशा प्रकारचा मिहानमधील हा पहिलाच प्रकल्प आहे. मिहान प्रकल्पात विमानांची निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी बोईंग कंपनीचे देखभाल व दुरुस्ती केंद्र उभारण्यात येणार असल्याने जगभरातील अनेक मोठय़ा कंपन्यांची विमाने येथे दाखल होणार आहेत. या विमानांना लागणाऱ्या इंधनासाठी एखाद्या इंधन पुरवठा केंद्राची आवश्यक्ता होती. बीपीसीएलने या प्रकल्पात केंद्र उभारणीची इच्छा व्यक्त केल्यानंतर एमएडीसी आणि बीपीसीएल यांच्यात हा करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विमान कंपन्यांच्या इंधनाचा प्रश्न सुटणार आहे. या जमिनीवर भारत पेट्रोलियम कंपनी विमान इंधन पुरवठा केंद्र स्थापन करणार आहे. या करारावर एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर.सी.सिन्हा तर, बीपीसीएलतर्फे विमानन विभागाचे कार्यकारी संचालक एस.पी. माथूर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी बीपीसीएलचे व्ही.जेकोब, गवई तर, एमएडीसीतर्फे व्ही.के. अग्रवाल, व्ही.व्ही. नलावडे, जे.आर. ओझा उपस्थित होते.

अकरावीच्या ५०० विद्यार्थ्यांची अ‍ॅड‘मिशन’
नागपूर, ८ जुलै/ प्रतिनिधी
द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश समितीने आज अकरावीच्या ५०० जागांसाठी प्रवेश दिले. सकाळी ८ वाजल्यापासूनच पालक आणि विद्यार्थ्यांनी धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या सभागृहात गर्दी केली होती. प्रवेश प्रकियेत सकाळच्या पहिल्या टप्प्यात २५० प्रवेश आणि दुपारी दुसऱ्या टप्प्यात २५० प्रवेश देण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया समाप्त करून ५०० प्रवेश देण्याचे समितीने ठरवले होते. मात्र ५ वाजेपर्यंत ४२५ प्रवेश देणे शक्य झाले. त्यानंतरही ७ वाजेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरूच होती. उद्या १,००० पर्यंत प्रवेश दिले जाणार असून १४ जुलैपर्यंत द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जाणार आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या एकूण २५०० जागा असून त्यासाठी ५६६६ अर्ज समितीला प्रश्नप्त झाले आहेत. विज्ञान आणि वाणिज्यसाठी अनुक्रमे १६,१७५ आणि १३,९०० अर्ज केंद्रीय प्रवेश समितीला प्रश्नप्त झाले आहेत. विज्ञान आणि वाणिज्यसाठी अनुक्रमे १४,९६० आणि १३,०८० एवढय़ा जागा उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी जनरल सायन्सच्या प्रवेशासाठी प्रथम हक्क राहील. प्रवेश देण्याचे काम सुरळीत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार न घडल्याचा निर्वाळा प्रवेश समितीचे सचिव राजेंद्र गोधणे यांनी दिला.

कोल्हे दाम्पत्याला संरक्षण देण्याची जनमंचची मागणी
नागपूर, ८ जुलै/ प्रतिनिधी

बैरागड येथे काम करणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हे यांच्यावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा जनमंचतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. कोल्हे यांच्यावर हल्ला केल्यानंतरही हल्लेखोरांना पोलिसांनी अद्यापही अटक केली नाही, याकडे जनमंचने लक्ष वेधले आहे. अशा कृत्यामुळे नि:स्वार्थपणे सामाजिक कार्यात काम करणाऱ्यांचा आत्मविश्वास डळमळू शकतो, याकडे लक्ष वेधून शासनाने कोल्हे दाम्पत्याला संरक्षण देणे गरजेचे आहे, असे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भारत स्वाभिमान मोहिमेत सामील होण्याचे आवाहन
नागपूर, ८ जुलै/प्रतिनिधी
या युगातील सर्वात मोठय़ा सामाजिक, आध्यात्मिक व राष्ट्रीय क्रांतीत सहभागी होऊन एका स्वस्थ व समृद्ध भारताच्या निर्मितीकरता व विस्मृतीत गेलेली अस्मिता पुन्हा प्रश्नप्त करण्याकरता भारत स्वाभिमान मोहिमेत सामील होण्याचे आवाहन पतंजली योग समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नामदेव फटींग यांनी केले. ते महालक्ष्मीनगर प्रश्नेसेस सव्‍‌र्हर ले आऊट येथील श्री हनुमान सेवा संस्थान येथे आयोजित सात दिवसीय नि:शुल्क योग प्रश्नणायाम शिबीराच्या समारोपाप्रसंगी बोलत होते. यावेळी पूर्व विभाग संयोजक महेंद्र चिलबुले, प्रभाकर सावळकर, छाजूराम शर्मा, गुलाब उमाठे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरसेवक भारतभूषण गायधने, अनिता दारव्हेकर, चंद्रशेखर गणोरकर, डॉ. चंदा फुलझेले उपस्थित होते.

हवालदार हलबे व शिपाई देशमुख जून महिन्याचे मानकरी
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
जून महिन्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या एक पोलीस हवालदार व एका शिपायाला मंगळवारी गुन्हे आढावा बैठकीत पारितोषिके प्रदान करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील हवालदार रामकृष्ण हलबे यांनी जून महिन्यात विश्वसनीय गुप्त माहितीद्वारे सहकाऱ्यांच्या मदतीने ६३ आरोपींना अटक केली. दरोडा, खून, सात घरफोडी, सात चोरी, आठ दुखापत तसेच जबरी चोरी, फसवणूक आदी एकूण ४२ गुन्हे उघडकीस आणले. एकूण १० लाख १८ हजार ६८५ रुपयांचा ऐवज हस्तगत केला़ सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांच्या हस्ते त्यांना एक हजार रुपये व प्रशंसापत्र प्रदान करण्यात आल़ेनंदनवन पोलीस ठाण्यातील शिपाई गोपाल देशमुख यांनी जून महिन्यात विश्वसनीय गुप्त माहितीद्वारे सहकाऱ्यांसह मदतीने ५४ आरोपींना अटक केली. सात घरफोडी, आठ दुखापत, २ घरफोडी आदी एकूण ३८ गुन्हे उघडकीस आणले. एकूण ४ लाख ३९ हजार २६५ रुपयांचा ऐवज हस्तगत केला़ सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांच्या हस्ते त्यांना ७५० रुपये व प्रशंसापत्र प्रदान करण्यात आल़े

स्पर्धा परीक्षेतील यशाशाठी विद्यार्थ्यांना झपाटण्याचा सल्ला
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारा उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतो म्हणून अनेक उमेदवार अर्ज भरतात. मात्र, सर्वच उमेदवार परीक्षेचा काळजीपूर्वक अभ्यास करतात असे नाही. स्पध्रेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांने झपाटून जाणे आवश्यक असते, असे प्रतिपादन नाथे करिअर अकादमीचे संचालक प्रश्न. संजय नाथे यांनी केले. ते ग्लोबल ट्रस्टद्वारे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेला संबोधित करताना बोलत होते. स्पध्रेत जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांने सातत्याने स्पध्रेत राहणे आवश्यक असते. म्हणून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा निवड मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचीही तयारी करावी.
यावेळी प्रश्न. नाथे यांनी विद्यार्थ्यांना विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे टप्पे, त्याचा अभ्यासक्रम, त्यासाठी लागणारी पुस्तके, अभ्यासाचे नियोजन आदींविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संजय गाडेकर यांनी केले. रमेश पळसकर यांनी आभार मानले.

गावठी बॉम्ब प्रकरणी आरोपीला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणारे गावठी बॉम्ब आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजभवनाच्या पश्चिमेकडील रस्त्यावर सोमवारी मध्यरात्रीनंतर मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन दोघे जखमी झाले. सुनील सदाशिव सोनावणे व निलेश रमेश तायडे (दोघेही रा. काटोल) ही त्यांची नावे आहेत. निलेशवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असून सुनील सोनावणे याला काल सदर पोलिसांनी अटक केली. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या दोघांना खंडाळा (काटोल) येथील दिलीप सरोदे याने त्याच्या भावाच्या घरावर बॉम्ब फेकण्याची सुपारी दिली होती. दिलीप सरोदे फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. दिलीपला सहा भाऊ असून त्या सातही भावांचे आपसात पटत नसल्याचे पोलिसांना समजले.

अमोल गायकवाडचा सत्कार
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
दहावीत ९१.८० गुण संपादन करणाऱ्या नवेगाव खैरी येथील नवोदय विद्यालयातील अमोल अशोक गायकवाड याचा नुकताच बजरंगनगर चौकातील मानेवाडा मार्गावरील अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टीचे संस्थापक शंकर सोनेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल, राजाराम गायकवाड, गुजाराम गायधने यावेळी उपस्थित होते. अतुल चहांदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे संचालन एकता चव्हाण यांनी केले. श्रावण मोजे यांनी आभार मानले. राजेंद्र माहोरे, नामदेव गायकवाड, सुरेश तेलंग, जगदीप ढोणे, ओमप्रकाश पोटपोसे, मधुकर वासनकर, गणेश सोनेकर आदी यावेळी उपस्थित होते.

विद्यापीठाचा ९६ वा पदवीप्रदान समारंभ २५ जुलैला
नागपूर, ८ जुलै/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९६ वा पदवीप्रदान समारंभ २५ जुलैला आयोजित करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत उपरोक्त विषय चर्चेला होता. कुलपतींनी पदवीप्रदान समारंभाला मान्यता दिल्याने येत्या २५ जुलैला हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.

प्रश्न. अंजली पारनंदीवार यांना पीएच.डी.
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी

रविनगरातील सी.पी.अ‍ॅन्ड बेरार ज्युनियर कॉलेजमधील प्रश्न. अंजली पारनंदीवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयात आचार्य (पीएच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. अंजली पारनंदीवार यांनी ‘टीचिंग ऑफ इंग्लिश अ‍ॅट ज्युनियर कॉलेज लेव्हल’ विषयात डॉ. एम.एम. मेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला.
प्रश्न. दीपाली भावे यांना पीएच.डी.
नवीन नंदनवनमधिल वुमेन्स कॉलेज ऑफ आर्टस व कॉमर्समधील प्रश्न. दीपाली भावे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे इतिहास विषयात आचार्य (पीएच.डी.) पदवी बहाल करण्यात आली आहे.
प्रश्न. भावे यांनी ‘श्रीमती मृणाल गोरे यांचे सामाजिक कार्य; एक ऐतिहासिक विश्लेषण’ या विषयात शोधप्रबंध सादर केला. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय वडील दिपचंद्र भावे, मुलगा तमेश, मार्गदर्शक डॉ. के.ए. शेटय़े, प्रश्नचार्य डॉ. एन.आर. दीक्षित यांना दिले आहे.

धरमपेठ शिक्षण संस्थेचे तंत्रनिकेतन सुरू
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे यंदापासून तंत्रनिकेतनाचा आरंभ करण्यात येत असून हा प्रकल्प यशस्वी होईल, असा विश्वास संस्थेच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
धरमपेठ शिक्षण संस्थेच्या अंबाझरी उद्यानाजवळील निसर्गरम्य परिसरात हे तंत्रनिकेतन साकारले असून येथे सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संस्थेतर्फे मनोरमाबाई मुंडले प्रश्नथमिक शाळा, तारकुंडे धरमपेठ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, मीराबाई संचेती धरमपेठ माध्यमिक कन्या शाळा, शिशू विकास मंदिर, धरमपेठ म.पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, आर.एस. मुंडले कला वाणिज्य महाविद्यालय, आर.एस. मुंडले इंग्रजी माध्यम शाळा, इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड इंजिनियरिंग हे उपक्रम चालवण्यात येत आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर सहस्रभोजनी यांनी दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष प्रकाश कुळकर्णी, सहसचिव कमलाकर वेलणकर, सदस्य विश्राम जामदार उपस्थित होते.

भाऊ दांदडे यांच्या चित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी

सिस्फा की छोटी गॅलरी येथे सुरू असलेल्या मान्सून बोनांझा चित्रप्रदर्शनाच्या मालिकेत उद्या, गुरुवारी सिस्फाच्या उपयोजित कला विभागाचे अध्यापक भाऊ दांदडे यांच्या ‘एक्झिस्टंट’ या शीर्षकाखालील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे प्रमुख डॉ. विनोद इंदुरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दैनंदिन जीवनात माणसाला अस्वस्थ करणाऱ्या घटना हा दांदडे यांच्या चित्रांचा गाभा आहे. साधे व सोपे विषय, सहज मांडणी, मनाचा ठाव घेणारी मांडणी ही त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े आहेत. ११ जुलैपर्यंत हे प्रदर्शन दुपारी ४.३० ते रात्री ८.३० पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा कलाप्रेमींनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकांत चन्न्ो यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
अल्पसंख्याक समाजाच्या इयत्ता ५ वी ते ७ वी च्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी वर्गातील ७० टक्के उपस्थितीबद्दल येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रतिवर्षी २ हजार रुपये प्रश्नेत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकास व वस्त्रोद्योग मंत्री अनिस अहमद यांनी मोमीनपुऱ्यातील इस्लामिया हायस्कूल येथे केली. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी २०० रुपये तर, इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २२० रुपये प्रश्नेत्साहनपर उपस्थिती भत्त्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वत:बरोबर समाजाचीही प्रगती साधावी, असे आवाहन करतानाच त्यांच्या उच्च शैक्षणिक खर्चाचा ५० टक्के भार राज्य सरकार सहन करील असे सांगितले. याप्रसंगी शम्स, इस्लामिया, रशिदिया, कमर व मजिदिया हायस्कूलमधील ३२ विद्यार्थ्यांना अहमद यांच्या हस्ते उपस्थिती भत्त्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी इस्लामिया हायस्कूलचे अध्यक्ष युनूस अनिस, पाटील, जफर अहमद खान, निसार अहमद, मुख्याध्यापक हसन भाटी, दस्तगीर अहमद इफ्तेखार अहमद आदी उपस्थित होते.

अंबाझरी उद्यानात सात युगल पकडले
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाझरी उद्यानात बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास छापा मारून झुडपाआड लज्जास्पद चाळे करणाऱ्या सात प्रेमी युगुलांना पकडले. त्यांना ताकीद देऊन सोडून देण्यात आले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

सी पी अ‍ॅन्ड बेरार शाळेत कीर्तनाचा कार्यक्रम
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
सी पी अ‍ॅन्ड बेरार शाळेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हरिभक्त पारायण न.चि. अपामार्जने यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम शाळेच्या प्रश्नंगणात पार पडला. गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून अपामार्जने यांनी राष्ट्रधर्मजागृती हा विषय घेऊन कीर्तन केले. पूर्वरंगातूनही त्यांनी विद्यार्थी धर्म, शिक्षक धर्म, कर्तव्य धर्म यासाठी समाजाने जागृत असण्यावर भर दिला. याप्रसंगी मुख्याध्यापक गोखले यांनी अपामार्जने व त्यांच्या साथीदार तसेच, सी पी अ‍ॅन्ड बेरार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, बाळासाहेब महाजन व अन्य पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक खरे व पाहुण्यांची ओळख क्षीरसागर यांनी करून दिली. सर्व विद्यार्थ्यांनी या कीर्तन प्रकारास उत्तम प्रतिसाद दिला. कीर्तनाच्या प्रश्नरंभी शिक्षिका लुले यांच्या नेतृत्वाखाली हरिनामाचा गजर करून वातावरण निर्मिती केली.

अपत्यहीन जोडप्यांसाठी रविवारी नि:शुल्क शिबीर
नागपूर, ८ जुलै/ प्रतिनिधी
सृष्टी संस्थेतर्फे अपत्यहीन जोडप्यांसाठी १२ जुलैला, रविवारी सकाळी ९ ते १२ वाजतादरम्यान, मोफत निदान व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. काँग्रेसनगरमधील मुंजे मार्गावरील वंशधारा टेस्ट टय़ुब बेबी सेंटरमध्ये रुग्णांचे निदान करून त्यांना मार्गदर्शन केले जाईल. डॉ. मीना चिमोटे, डॉ. नरेंद्र मोहता, डॉ. अंजली भांडारकर, डॉ. रोहिणी द्रविड, डॉ. नटचंद्र चिमोटे, डॉ. गीता पेंडगावकर, नंदनी जोशी आणि मनश्री कुळकर्णी या शिबिरासाठी सहकार्य करणार आहेत. अधिक माहितीसाठी वसंत गंधे- ९३७३१९५२९६ व २२८६८२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ग्रीष्मकालीन शिबिरात ४० विद्यार्थी सहभागी
नागपूर, ८ जुलै/ प्रतिनिधी
शताब्दी नगरातील मानव कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे ग्रीष्मकालीन शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातील उत्कृष्ट विद्याथ्यार्ंचा नुकताच सत्कार करण्यात आला. चित्रकला व मुर्तीकलेमध्ये वैशाली जांगडेकर, सुविचार म्हैस्कर, नाटय़भिनयात यशवंत सोनुने, कुणाल वागदे, भीमगीत गायन- तक्षशीला वागदे, नीकिता थुलकर, भाषणकला- काजल शेंडे, प्रतीक्षा वाळके, कथाकथन संघर्ष म्हैस्कर, एकपात्री प्रयोग- नीकिता थुलकर, प्रश्नप्ती डोंगरे, वादविवाद- कोमल शेंडे आणि सामान्य ज्ञान विषयात अभिषेक शेंडे याने चुणूक दाखवली. शिवराजनगरात एक दिवसाचे नाटय़ शिबीरही यादरम्यान घेण्यात आले. गौतम ढेंगरे, संजय सायरे यांनी त्यावेळी माहिती दिली.

गुणवंतांना अर्ज पाठवण्याचे आवाहन
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी
हलबा समाज महासंघातर्फे दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात येतो. यासाठी दहावी व बारावीत अनुक्रमे ८५ व ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी महासचिव, हलबा समाज महासंघ, दिनदयालनगर, नागपूर - ४४००२२, दूरध्वनी क्र. २२८९७२७ यांच्याकडे साध्या कागदावर अर्ज करावा. सोबत साक्षांकित गुणपत्रिका जोडावी. विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज व गुणपत्रिका कार्यालयात १६ ऑगस्टपर्यंत सादर करावेत.

मराठा परिवार सेवासंघातर्फे शालेय साहित्याचे वाटप
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी

मराठा परिवार सेवासंघाच्यावतीने दिवं. मारोतराव कोरके स्मृतिप्रित्यर्थ मनोहर पवार यांच्यातर्फे राजदरबार सभागृहात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले. विजय रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात देवदत्त नवले, देविदास कीरपाने, प्रभाकर भोसले, सुरेश कदम, सुरेश दलदले, दीपक पवार, हरीणचंद्र धर्मे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र चवळे यांनी केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.

प्रश्नथमिक शिक्षक संघटनेचा १४ जुलैला लाक्षणिक संप
नागपूर, ८ जुलै / प्रतिनिधी

राज्यातील प्रश्नथमिक शिक्षकांना केंद्र सरकारप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांकरता महाराष्ट्र राज्य प्रश्नथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने १४ जुलैला राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षण सेवक योजना पूर्णपणे रद्द करण्यात यावी, सध्या शिक्षण सेवक म्हणून असणाऱ्यांना तसेच, वसतिशाळा स्वयंसेवकांना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, केंद्रप्रमुखांना स्वतंत्र वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी व शाळा इमारतीची बांधकामे स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी, शिक्षकांकडील सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी, उन्हाळ्याच्या सुटीतील प्रशिक्षण रद्द करावे, आदी मागण्या संपाच्या माध्यमातून करण्यात येणार असून संपाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येईल.
या आंदोलनात जिल्हय़ातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षणसेवक, वसतिशाळा शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी, सरचिअणीस लिलाधर ठाकरे, कार्याध्यक्ष राजकुमार वैद्य आदींनी केले आहे.