Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९


नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात आता सर्वत्र एवढे दिवस खोळंबलेल्या पेरण्यांच्या कामाने वेग घेतला आहे.

विविध मागण्यांसाठी संकल्पित रिपाइंचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी / नाशिक

सेतू कार्यालयाच्या अनागोंदी कारभारास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई व शिधापत्रिका वाटपातील गोंधळाची खाते निहाय चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य पालक, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

सुसह्य़ रिक्षा प्रवासाच्या दिशेने..
नाशिक शहराला वर्षांनुवर्षे भेडसावत असलेला रिक्षा वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. शहराची वाढ झपाटय़ाने होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक असणारी रिक्षा वाहतूक सुसह्य़ व्हावी, या उद्देशाने आता एक नवे पाऊल उचलले जात आहे. त्या अनुषंगाने सुजाण रिक्षाचालक-प्रवासी अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात पुढाकार घेतलेले डॉ. गिरीधर पाटील यांनी ‘वृत्तान्त’च्या व्यासपीठावरून उभय घटकांना केलेले आवाहन..

अधिक माहितीसाठी संपर्क : सुजाण रिक्षाचालक-प्रवासी अभियान, ए-४, पूर्णम सेंटर, गायकवाड क्लास समोर, नाशिक ४२२ ००१, फो. ०२५३-२५०८९३३, ९४२२२६३६८९.

सर!
लौकिकार्थाने स्वत: ‘नॉन मॅट्रीक’ असताना हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांना दहावी, बारावी आणि थेट पदवीपर्यंतचा क्रमिक अभ्यासक्रम शिकविण्याची किमया करणारे रामनाथ गायकवाड ऊर्फ बाबा ऊर्फ सर नाशिकच्या पंचक्रोशीतल्या शेकडो शिक्षकांचेही मार्गदर्शक आहेत ! गायकवाड सरांचे मोठेपण अधोरेखीत होण्यासाठी याहून वेगळे परिमाण ते कोणते असणार? पण, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी सामुदायिक विवाहाची चळवळ नुसती रुजवलीच नाही, तर स्वत:सह इतर मान्यवरांच्या मुलामुलींची लग्नेही आग्रहपूर्वक याच उपक्रमाद्वारे पार पाडून सामुदायिक विवाहांना प्रतिष्ठा देखील मिळवून दिली.

प्रभाकर कोठावदे यांचा सत्कार
नाशिक / प्रतिनिधी

येथील स्टेट बँक शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रभाकर कोठावदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सहायक महाव्यवस्थापक विजय भावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य व्यवस्थापक निळकंठ पिसोळकर, आयएमसी बँकेचे कार्यकारी अध्यक्ष अनिल कोठावदे, बँक अधिकारी संघटनेचे शिवाजी पाटील, विपणन व्यवस्थापक राजेंद्र कोठावदे उपस्थित होते. नाशिक शाखेच्या व्यावसायिक विस्तारात कोठावदे यांचे बहुमूल्य योगदान असल्याचा गौरवपर उल्लेख भावे यांनी केला. आई-वडिलांनी केलेले संस्कार आणि बँकेतील सहकाऱ्यांचे सहकार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार यामुळे आपल्याला प्रगतीचा हा टप्पा पार पाडता आला, असे सत्काराला उत्तरादाखल कोठावदे यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात दळवट येथून केली. स्टेट बँकेच्या प्रधान कार्यालयापर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केले.


नाशिक येथे मविप्र शिक्षण संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुची महती सांगणाऱ्या नाटिका सादर करण्यात आल्या. गुरू व शिष्य यांच्या जोडय़ा तयार करण्यात येऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग.