Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

मानसिक आरोग्य
डॉ. आशिश देशपांडे
इच्छेची दोरी नि स्वप्नांचे बाण!

आपल्या कामाचं नियोजन अपेक्षापूर्तीसाठी खूप आवश्यक असतं, जसे अपेक्षापूर्तीसाठी लागणारे प्रयत्न वाढायला लागतात तसे कामातली शिस्त, नियोजन नि तत्परता महत्त्वाची व्हायला लागते. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब..’चा नियम आजही उपयुक्त ठरतो. बऱ्याच वेळा कामाच्या नियोजनात कामाचं महत्त्व लक्षात घेऊन कामांची यादी करायला लागते. सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून कामाचं विभाजन करायला लागतं, काम दुसऱ्याकडे सोपवायला लागतं, कधीकधी कामाची पद्धत, दिशा बदलायला लागते. स्वत:च्या कामाचा आढावा घ्यायला लागतो; आणि हे सतत करण्यासाठी जिद्द लागते नि तात्पुरती अपयश पचवायची ताकदही!

सांस्कृतिक कट्टा
साहित्यातून समाजप्रबोधन

वाचनाने मानवाचे जीवन समृद्ध होत जाते, त्याच्या विचारांची पातळी उंचावते, याविषयी निरनिराळ्या समाजातील धुरिणांचे एकमत आहे. तरीही साहित्याचे समाजजीवनातील नेमके प्रयोजन काय याविषयी चर्चा नेहमी होत असते. ठाण्यातील राजमाता जिजाबाई ट्रस्टच्या शारदा वाचनालयाने अलीकडेच आयोजित वाचकमेळाव्यात ‘आजच्या साहित्यातून समाजप्रबोधन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी या वाचक मेळाव्याचे उद्घाटन केले, तर प्रा. प्रवीण दवणे यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रवीण दवणेंसह विनया खडपेकर, डॉ. विद्या देवघर, मोनिका गजेंद्रगडकर या प्रथितयश लेखकांनी अनुक्रमे काव्य, चरित्र, कादंबरी आणि कथा या साहित्य प्रकारांविषयी विचार व्यक्त केले.

घडामोडी
औरंगाबाद
मानसी हत्येनंतरचा जनक्षोभ

१२ जूनला औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण मराठवाडय़ाला हादरवून टाकणाऱ्या मानसी देशपांडे या तरुणीच्या निर्दयी हत्येची गंभीर घटना घडली. औरंगाबाद शहरवासीयांच्या मनात या घटनेने असुरक्षितता निर्माण तर केलीच; परंतु त्यांच्यामध्ये मोठी चीडही निर्माण झाली. औरंगाबाद शहर एवढे असुरक्षित व्हावे? अशा घटना सातत्याने घडत आहेत. औरंगाबाद शहरात गेल्या सहा महिन्यांत चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांनीही औरंगाबादवासीय असुरक्षित असल्याची चिंता व्यक्त केली आहे. पहिल्या चार महिन्यांत ४३८ चोऱ्या आणि घरफोडय़ा झाल्या. गुन्हेगारांवर पोलिसांचा जरबच राहिलेला नाही अशी