Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

क्रीडा

समिती सदस्यपदासाठी निवडणुकीत कमालीची चुरस
मुंबई, ८ जुलै / क्री. प्र.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नसली तरीही कोषाध्यक्ष, संयुक्त चिटणीसपदासाठीच्या निवडणुकीमुळे येत्या शुक्रवारी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रंगत आली आहे. त्यापेक्षाही चुरस समिती सदस्यांच्या ११ जागांसाठीच्या लढतीत पाहावयास मिळत आहे. बाळ महाडदळकर यांच्या गटाच्या समर्थकांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील एककल्ली कारभाराविरुद्ध दंड थोपटून स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविण्याचे ठरविले.

रणजी सामने त्रयस्थ ठिकाणी नकोत!
बीसीसीआयच्या तांत्रिक समितीची शिफारस
मुंबई, ८ जुलै / क्री. प्र.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसताना भारतीय क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध असलेल्या सर्व क्रिकेटपटूंनी आपापल्या रणजी संघांसाठी उपलब्ध व्हावे, असे मत बोर्डाच्या तांत्रिक समितीच्या बैठकीत आज मांडण्यात आले. भारताचे माजी कसोटीपटू व कर्णधार सुनील गावसकर यांच्या अध्यक्षतेखालील या तांत्रिक समितीने तीन शिफारशी केल्या. त्यात या शिफारशीचा समावेश होता.

गांगुलीला वेध बोर्डाच्या ‘नेतृत्वा’चे
मुंबई, ८ जुलै / क्री. प्र.

सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या सौरव गांगुलीला आता क्रिकेट प्रशासकाच्या नवीन भूमिकेत शिरण्याची इच्छा आहे. पाच वर्षांनंतर म्हणजे २०१४ मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद पूर्व विभागाला मिळणार असून, त्या वेळी या पदावर गांगुली विराजमान झाल्यास आश्चर्य वाटू नये.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेवर विंडीज खेळाडूंचा बहिष्कार
मंडळासमवेतचे मतभेद विकोपाला
अ‍ॅन्टिगा, ८ जुलै / पीटीआय

क्रिकेट मंडळासमवेत करारासंबधी असलेला तिढा न सुटल्याने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी उद्यापासून मायदेशात सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी व एकदिवसीय मालिकेवर बहिष्कार टाकला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या सामन्यात सहभागी होण्यास खेळाडूंनी नकार दिल्याने क्रिकेट मंडळ व खेळाडूंमधील संबंध ताणले गेले आहेत.

संदीप पाटील टी-१० क्रिकेटमधून बाहेर
मुंबई, ८ जुलै / क्री. प्र.

टी -१० गल्ली क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राची घोषणा काल करण्यात आल्यानंतर आज या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या संदीप पाटील यांनी या जबाबदारीतून माघार घेतली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या क्रिकेट स्पर्धेला मान्यता दिलेली नसल्यामुळे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

द्रविडचा समावेश संघासाठी बोनस - गांगुली
मुंबई, ८ जुलै / क्री. प्र.

भारताच्या एकदिवसीय संघातील राहुल द्रविडचा समावेश हा संघासाठी बोनस ठरेल, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. २४ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी राष्ट्रीय निवड समितीने ३० संभाव्य खेळाडूंमध्ये द्रविडचा समावेश केल्याने ऑक्टोबर २००७ नंतर प्रथमच तो भारताच्या एकदिवसीय संघात आला आहे. खरं तर क्रिकेटच्या सर्व प्रकारांसाठी तो उपयुक्त आहे.

‘ब्रिलियन्ट’ संगकारा विजयाचा शिल्पकार - युनूस खान
कोलंबो, ८ जुलै / एएफपी

श्रीलंकेकडून मानहानीकारकरित्या पराभूत झालेल्या पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याने श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराच्या डावपेचांची स्तुती करून त्याला या विजयाचे सर्वाधिक श्रेय दिले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयासाठी केवळ ९७ धावा हव्या असताना फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तान संघाला ५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

डकवर्थ लुईस नियमावली आता अल्बमरूपात
लंडन, ८ जुलै / पीटीआय

क्रिकेट. अनिश्चिततेचा खेळ. बदलत्या काळासोबत क्रिकेटही बदलले. या बदलत्या स्वरूपामुळे अनेक नियमही बदलले. काही नव्याने करण्यात आले. कुठल्याही कारणास्तव एका संघाचा डाव पूर्ण झाला असेल अन् दुसऱ्या संघाच्या डावात काही अडथळा निर्माण झाल्यास, निकाल देण्यासाठी सद्य:स्थितीत तरी डकवर्थ-लुईस हीच पद्धत अमलात आणली जाते.महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांना या पद्धतीविषयी फारशी माहिती नाही.

युरोप दौऱ्यासाठी भारताचा २३ सदस्यीय हॉकी संघ
नवी दिल्ली, ८ जुलै / पीटीआय

या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या युरोपियन दौऱ्यासाठी २३ खेळाडूंच्या भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे प्रशिक्षक म्हणून जोस बार्सा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

इंग्लंड ७ बाद ३३६
कार्डिफ, ८ जुलै / वृत्तसंस्था
केविन पीटरसन (६९) आणि कॉलिंगवूड (६४) यांच्या चौथ्या विकेटसाठीच्या १३८ धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या कसोटीत दिवसअखेर ७ बाद ३३६ धावसंख्येपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या इंग्लंडचा ३ बाद ९० अशी डळमळीत सुरुवात झाली होती. पण पीटरसन व कॉलिंगवूड यांनी डाव सावरला. प्रायर (५६) आणि फ्लिंन्टॉफ (३७) यांनी धावसंख्या तीनशेपलीकडे नेली. मात्र दिवसअखेर नव्या चेंडूने ऑस्ट्रेलियाला हात दिला. फ्लिन्टॉफ व प्रायर यांचे त्रिफळे सिडलने उडविले. जॉन्सन, सिडल, हिल्फेनहॉस यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

कसोटी मानांकनात महंमद युसुफ अव्वल
दुबई, ८ जुलै/पीटीआय

पाकिस्तानचा ज्येष्ठ फलंदाज महंमद युसुफ याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत शैलीदार शतक टोलवित आंतरराष्ट्रीय कसोटी मानांकनातील फलंदाजीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.इंडियन क्रिकेट लीगमधील सहभागामुळे गेले वर्षभर त्याला पाकिस्तानकडून खेळण्यास बंदी घातली होती. त्याच्यावरील बंदी उठविल्यामुळे पुन्हा त्याला पाकिस्तान संघात संधी देण्यात आली होती. त्याने लंकेविरुद्ध गॅले येथील कसोटीतील पहिल्या डावात ११२ धावा करीत शानदार पुनरागमन केले होते. त्याने आपलाच कर्णधार युनुस खानला मागे टाकले. युनुसला दुसरे स्थान मिळाले आहे. युनुसने या कसोटीतील पहिल्या डावात २५ तर दुसऱ्या डावात ३ धावा केल्या. श्रीलंकेच्या कुमार संगकारा याचीही दुसऱ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली. त्याने या कसोटीत केवळ ९ व १४ धावा केल्या. श्रीलंकेचा थिलान समरवीरा यालाही पहिल्या २० खेळाडूंमधील आपले स्थान गमवावे लागले आहे.