Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वाशीमच्या नगराध्यक्षांचा सत्कार
वाशीम, ८ जुलै/ वार्ताहर

 

येथील वाशीम अर्बन बँकेच्यावतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष माधवराव अंभोरे यांचा सत्कार करण्यात आला.
वाशीम अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्ष शीला राठी होत्या. याप्रसंगी बँकेचे मार्गदर्शक सुभाष राठी, पालिका उपाध्यक्ष माधवराव अंभोरे, बँकेचे संचालक मुरारीलाल खंडेलवाल, विष्णु सोनी, प्रकाश जाजू, रमण अग्रवाल, राजेश सिसोदीया, रत्नमाला राठी, जेहरा जौहर, सरव्यवस्थापक सुरेंद्र आगरकर, कर्मचारी प्रतिनिधी नीलेश सोमाणी, तेजराव वानखेडे, वाशीम बाजार समितीचे उपसभापती भागवत कोल्हे, ज्ञानबा महाले, सहाय्यक सरव्यवस्थापक अ‍ॅड. वसंत मोहर्लीकर, गोपाल खंडेलवाल, शाखाधिकारी गजानन अग्रवाल, बालकिसन बाहेती उपस्थित होते.
यावेळी बँकेचे मार्गदर्शक तथा संचालक सुभाष राठी यांच्याहस्ते नगराध्यक्ष अशोक हेडा यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. उपाध्यक्ष माधवराव अंभोरे यांचा वाशीम शाखेचे सभापती मुरालीलाल खंडेलवाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला, तर बँकेच्या अध्यक्ष शीला राठी यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तीनी भाषणात वाशीम पालिकेचे दिवंगत नगराध्यक्ष अ‍ॅड. रामकृष्ण राठी यांचा विकासाचा वसा आम्ही पुढे चालवू अशी ग्वाही दिली.
यावेळी बँकेच्या अध्यक्ष शीला राठी यांनी शहरातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक सरव्यवस्थापक सुरेंद्र आगरकर यांनी केले. आभार नीलेश सोमाणी यांनी मानले. या कार्यक्रमास बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.