Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
बुलढाणा, ८ जुलै / प्रतिनिधी

 

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना ८० कोटी ९१ लाख रुपयांची मंजूर असून जिल्ह्य़ातील विकास कामांना प्रश्नधान्याने गती देऊन उपलब्ध तरतूद पूर्णत: खर्ची होईल याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला केली.
प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार चैनसुख संचेती, आमदार विजयराज शिंदे, डॉ. संजय कुटे, दिलीपकुमार सानंदा, गोपीकिशन बाजोरीया, रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, कार्यकारी अधिकारी सदानंद कोचे यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा वार्षिक योजना २००८-०९ चा माहे मार्च ०९ अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सर्वसाधारण योजनेंतर्गत ६६ कोटी ८ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला होता. त्यापैकी ६६ कोटी ८ लाख निधी प्रश्नप्त होऊन मार्च अखेर ५९ कोटी ४७ लाख २५ हजार खर्च झाले असून खर्चाची नियतव्यय टक्केवारी ९७ टक्के एवढी आहे. अनुसूचित जाती उपाययोजनेंतर्गत २६ कोटी ८९ लाख ३० हजार नियतव्यय मंजूर झाला होता. त्यापैकी २४ कोटी ५३ लाख ३५ हजार अर्थसंकल्पीय तरतूद झालेली असून २४ कोटी ४५ लाख ४ हजार रुपये प्रश्नप्त झाले. प्रश्नप्त तरतुदीपैकी २१ कोटी ३१ लाख ८४ हजार खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ८७ टक्के आहे.
आदिवासी उपाययोजनांतर्गत ८ कोटी २ लाख १३ हजार नियतव्यय मंजूर झाला असून ६ कोटी ९८ लाख ३८ हजार रुपये अर्थसंकल्पीय तरतूद होती. त्यापैकी ६ कोटी ७३ लाख २ हजार प्रश्नप्त होऊन ६ कोटी ३९ लाख २ हजार रुपये वितरित करण्यात आले. वितरित निधीपैकी ५ कोटी ७० लाख ९ हजार खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ८९.२१ टक्के एवढी आहे.
सन २००९-१० या वर्षासाठी सर्वसाधारण योजना ८० कोटी ९१ लाख ४६ हजार, अनुसूचित जाती उपाययोजना १८ कोटी ६० लाख ६७ हजार तर आदिवासी उपाययोजनेसाठी १ कोटी ७६ लाख ४५ हजार असे एकूण १०१ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असून त्यापैकी मे २००९ अखेर २७ कोटी २६ लाख ९३ हजार तरतूद प्रश्नप्त झाली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.