Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्य योजनेपासून नागरिक वंचित
हिंगणा, ८ जुलै / वार्ताहर

 

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दारिद्रय़रेषेखालील अनुसूचित जातीच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित असल्याची खंत भारतीय शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सच्चिदानंद नत्थूजी लोखंडे यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे.
या योजनेची माहितीच अधिकारी वर्गाकडून दिली जात नाही व अंमलबजावणीस प्रश्नधान्य दिले जात नसल्याचा आरोपही लोखंडे यांनी केला आहे.
या योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहायता देण्याची तरतूद आहे.
ही वैद्यकीय सहायता किडनी, हृदय, लिवर, कॅन्सर आणि मेंदूशी संबंधित गंभीर आजाराच्या उपचारासाठी प्रश्नप्त होणार आहे. हे आजार अत्यंत गंभीर असून यामुळे आजारी व्यक्तीच्या जीवाला धोका असल्याने ही योजना आहे.
यात गुडघ्याचे आणि पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेसाठीही या योजनेतून मदत देम्याची तरतूद करण्यात आली आहे.
डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजना देशातील १० प्रमुख इस्पितळातून तसेच सर्वच केंद्रीय स्वास्थ्य योजनेद्वारा मान्यता प्रश्नप्त इस्पितळातून वैद्यकीय महाविद्यालयातून राबवली जाणार आहे.
नागपूर आणि विदर्भ परिसरात पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ झालेला नाही. या योजनेबाबत नागरिकांमध्ये जागृती होम्याचीगरज असून या साठी भारतीय शेतमजूर संघटनेने पुढाकार घेतला आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी भारतीय शेतमजूर संघटनेने आग्रह धरला असून या संदर्भात भारतीय शेतमजूर संघटना, संघर्ष ५८, मोहगाव, झिलपी, तहसील हिंगणा जिल्हा नागपूर- या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन लोखंडे यांनी केले आहे.