Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

धनोजे कुणबी समाजाच्यावतीने रविवारी गुणवंतांचा सत्कार
चंद्रपूर, ८ जुलै/प्रतिनिधी

 

धनोजे कुणबी समाजाच्यावतीने येत्या १२ जुलैला दुपारी १ वाजता कुणबी समाज सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य दौलत भोंगळे राहणार आहेत. या कार्यक्रमात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनोहर पाऊणकर, राष्ट्रपती पुरस्कारप्रश्नप्त शिक्षक, पर्यावरण व खगोल संशोधक प्रश्न. सुरेश चोपणे व प्रश्नचार्य डॉ. अशोक जीवतोडे, वासुदेव सोमलकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे.
यासाठी दहावी व बारावीत ८० टक्केपेक्षा अधिक गुण प्रश्नप्त विद्यार्थिनी गुणपत्रिकेची झेरॉक्स १० जुलैपर्यंत वडगाव येथील धनोजे कुणबी समाजाच्या कार्यालयात पाठवावे, असे आवाहन कुणबी युवा आघाडीचे उपाध्यक्ष उमाकांत धाडे यांनी केले आहे. कुणबी समाजातील दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या गरजू व होतकरू, किमान ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्रश्नप्त विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मीनगर धनोजे कुणबी समाज वसतिगृह येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी सदर कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.