Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सिटू’ चे धरणे
बुलढाणा, ८ जुलै / प्रतिनिधी

 

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना, ग्राम रोजगार संघटना, महाराष्ट्र प्रेरक संघटना व डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवार १० जुलै ०९ ला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे.देशात ४२ कोटी असंघटित कामगारांच्या रोजगारांची जीवन सुरक्षेची जबाबदारी नाकारून सरकार सातत्याने कामगार व जनविरोधी धोरणे राबवत आहे. केंद्रात व राज्यात स्थिरत्व मिळवलेल्या सरकारनेही असंघटित उपेक्षाच केली आहे.या असंघटित कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिटू च्या वतीने १० जुलै हा मागणी दिवस दरवर्षी राबवल्या जातो. बुलढाणा जिल्ह्यामध्येही सिटूने अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांमध्ये प्रश्नमुख्याने ग्रामरोजगार सेवकांना नियुक्तीपत्र वाटप करावे, नियुक्ती दिवसापासून ५ हजार रुपये दरमहा वेतन द्यावे, टी.ए.डी.ए. मस्टर असिस्टंटचा दर्जा द्यावा, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १५० रुपये मजुरी द्यावी, शेतमजुरांना निवृत्ती वेतन द्यावे, अंगणवाडी सेविकांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी, केंद्राने जाहीर केलेली ५०० रुपये वाढ त्वरित लागू करावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे धरण्यात येणार आहे.या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) संलग्न संघटनांचे पंजाबराव गायकवाड, मंगला देशपांडे, सविता चोपडे, प्रतिभा आटोळ, पार्वती पाटील, जयश्री क्षीरसागर, अलका कुलकर्णी, दुर्गा चव्हाण, महेश वाकदकर, मदन जाधव, गजानन सोनुने, भीमराव धंदर, अशोक लांडगे, दीपाली वळसे, मीरा सुरुशे यांनी केले आहे.