Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राज्य परिवहनची निवडप्रक्रिया रद्द करण्याची मागणी
चंद्रपूर, ८ जुलै/प्रतिनिधी

 

राज्य परिवहन महामंडळातील निवडप्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वामनराव झाडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून १३ नोव्हेंबर २००८ ला लिपिक, मेक्यॉनिक सहाय्यक पदाकरिता जाहिरात दिलेली होती. जाहिरातीच्या नमुन्यात कोणत्याही अटी दिल्या नसून प्रत्येक उमेदवारांकडून शंभर रुपये प्रमाणे डी.डी.सुद्धा मागवण्यात आला होता. जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांना मुलाखतीचे पत्र पाठवणे गरजेचे असतानादेखील चंद्रपूर येथील राज्य परिवहन विभागाने भेदभाव करून जाहीर केलेल्या पात्र यादीमध्ये घोटाळा केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. पात्र व अपात्र या दोन्ही उमेदवार यादी प्रसिद्ध करावयास पाहिजे होत्या. ज्या उमेदवारांना मुलाखतीचे पत्र पाठवलेले नाही त्यांचे डी.डी. शंभर रुपये काय त्यांची रक्कम परत मिळणार की नाही हेसुद्धा सांगावयास पाहिजे. ज्या पदाकरिता आवश्यक पात्रता आहे, अशा उमेदवारांना मुलाखतीचे पत्र न पाठवता जे पात्र नाहीत, अशांचेही नावे यादीमध्ये समाविष्ट आहेत.
१० जुलै २००९ पर्यंत होऊ घातलेल्या मुलाखती रद्द करून पारदर्शक यादी पात्र, अपात्र यादी जाहीर करून त्याच उमेदवारांना मुलाखतीचे पत्र पाठवावे, असे वामनराव झाडे यांनी म्हटले आहे.