Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष रावत अपात्र
चंद्रपूर, ८ जुलै/ प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते संतोष रावत यांना कंत्राटदारीच्या मुद्यावरून विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून अपात्र घोषित केल्याने त्यांचे अध्यक्षपद धोक्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्याने काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मूल तालुक्यातील केळझर मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेले संतोष रावत यांची सव्वादोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊन ही सत्ता प्रश्नप्त झाली.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना ४ महिने मुदतवाढ
यवतमाळ, ८ जुलै / वार्ताहर

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींना चार महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यवतमाळ जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मनोहर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज्यातील अकोला, वाशीम, गोंदिया, भंडारा, धुळे आणि नंदुरबार या सहा जिल्हा परिषद वगळता उर्वरित सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाळ २१ सप्टेंबर ०९ ला संपणार होता.

महापौरांच्या राजीनाम्याच्या मागणीने वातावरण तापले
अकोला, ८ जुलै / प्रतिनिधी

आयुक्तांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेतील विरोधी पक्षगटाच्या सदस्यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अकोला महापालिकेतील आयुक्त आणि महापौरांमधील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. अमरावतीला पार पडलेल्या घरकुल योजनेच्या बैठकीनंतर हे मतभेद विकोपास गेले. घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत आयुक्त अपयशी ठरले, असा आरोप महापौरांचा आहे.

भंडारा जिल्ह्य़ात ३७ टक्के पेरण्या आटोपल्या
भंडारा, ८ जुलै / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ात यावर्षी केवळ ३७ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. पावसाने अद्यापही सरासरी गाठली नसून जिल्ह्य़ात आतापर्यंत केवळ १४१.६ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्य़ात एकूण १ लक्ष ८१ हजार ८३५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यात नर्सरीचे सर्वसाधारण १६ हजार ६९ हेक्टर असून केवळ ५ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ३७ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

तिरुपती सभागृहाचे बांधकाम झाले नियमितह्ण
नगरपालिकेने निर्णय फिरवला

बुलढाणा, ८ जुलै / प्रतिनिधी

पोलीस कवायत मैदान ते जिल्हा न्यायालय या रस्त्यावरील तिरुपती मंगल कार्यालय सभागृहाचे काही बांधकाम अवैध असल्यामुळे ते पाडण्यात यावे, अशी नोटीस बजावणाऱ्या नगरपालिकेत याबाबत घुमजाव करीत अवैध बांधकाम नियमानुकूल केले आहे.

गडचिरोली जिल्ह्य़ात मेंदूज्वराचे थैमान
* ९ जणांचा मृत्यू, ३२ संशयित रुग्ण
* २ रुग्णांच्या रक्तात चंडीपुराचे विषाणू
गडचिरोली, ८ जुलै / वार्ताहर

जिल्ह्य़ात २६ जूनपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत मेंदूज्वराने ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मेंदूज्वराचे संशयित ३२ रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील दोन बालकांचा याच रुग्णालयात मेंदूज्वराने मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ात पावसाचे आगमन होताच आजारांची लागण झाली आहे. तापाच्या रुग्णांची रुग्णालयांमध्ये झपाटय़ाने वाढ झालेली आहे. तापाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रश्नमुख्याने १५ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या जास्त आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ६ जुलैपर्यंत १४८ तापाचे रुग्ण दाखल झाले असून मेंदूज्वराचे संशयित ३२ रुग्ण आढळून आले आहेत.

विदर्भ मोर्चा व मराठवाडा विकास परिषदेचा संयुक्त निर्णय
स्वतंत्र राज्यासाठी जनजागरण मोहीम
यवतमाळ, ८ जुलै / वार्ताहर
सर्वागीण विकासासाठी छोटय़ा राज्यांची आवश्यकता असल्याने विदर्भ आणि मराठवाडा ही स्वतंत्र राज्ये व्हावीत, यासाठी जनजागरण मोहीम उभारण्याचा संकल्प विदर्भ मोर्चा आणि मराठवाडा विकास परिषदेच्या शेगाव येथे झालेल्या संयुक्त परिषदेत करण्यात आला, अशी माहिती परिषदेचे मुख्य प्रवर्तक माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी मंगळवारी येथे दिली. शेगावच्या मुरारका महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी विदर्भ मोर्चा आणि मराठवाडा विकास परिषद यांची संयुक्त परिषद आयोजित करण्यात आली.

धापेवाडय़ात विठ्ठल दर्शनासाठी भक्तांची गर्दी
सुनील केदारांच्या हस्ते महापूजन
कळमेश्वर, ८ जुलै / वार्ताहर
विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे बुधवारी विठ्ठल दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली. सकाळी ७ वाजता आमदार सुनील केदार यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा विठ्ठलनामाच्या गजरात पार पडली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त सचिव विठ्ठल भड (गुरुजी), सरपंच गोविंदा शेटे, पंचायत समिती सभापती अ‍ॅड. प्रकाश टेकाडे, अशोक धोटे, मातीखाये, डॉ. राजीव पोतदार, पंचायत समिती सदस्य दिलीप धोटे, बाबाराव कोठे, अरुण नंदनवार आदी उपस्थित होते.

अमरावतीत बसच्या धडकेने वृद्ध ठार
अमरावती, ८ जुलै / प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकासमोरील पुलावर महापालिकेच्या शहर बसने धडक दिल्याने एक वृद्ध घटनास्थळीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. अचलपूर तालुक्यातील भूगाव येथील उत्तम भीमराव काळे (६५) हे रेल्वे पुलावरून रेल्वे स्थानकाकडे पायी जात असताना शहर बसने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर शहर बसचा चालक फरार झाला. काही ऑटोरिक्षा चालकांनी त्याला खरकाडीपुरा येथे पकडले. उत्तम भीमराव काळे यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. ते एका कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात चालले होते. याप्रकरणी पोलिसांनी शहर बस चालक नरेश सोनटक्के याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून शहर बस ताब्यात घेण्यात आली आहे.

चंद्रपुरात ‘डॉक्टर्स डे’
चंद्रपूर, ८ जुलै/प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉ. बी.सी. राय यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘डॉक्टर्स डे’ पाळण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आयएमएचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, सचिव डॉ. भूपेश भलमे प्रश्नमुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना खासदार अहीर यांनी समाजात डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण स्थान असून सामाजिक कर्तव्याचे पालन करावे व गोरगरीब नागरिकांना सेवा उपलब्ध करू द्यावे, असे आवाहन केले. डॉक्टर परिवारातील दहावी व बारावीत ८० टक्केवर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मानचिन्ह व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. सिव्हिल सर्जन, आदर्श शिक्षक, नर्स, पोस्टमन, समाजसेविका, सफाई कर्मचारी आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. कल्याणी यांनी केले, तर प्रश्नस्ताविक आयएमएचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांनी केले. आभार डॉ. भूपेश भलमे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. प्रकाश रामटेके, डॉ. सुनील सिंघई, प्रश्न. प्रश्नजक्ता अस्वार, डॉ. डोंगरे उपस्थित होते.

बेंबाळात विद्युत उपकेंद्र
चंद्रपूर, ८ जुलै/प्रतिनिधी
मूल तालुक्यातील बेंबाळ येथे ३३ केव्ही उपकेंद्रासाठी सन २००० पासून जमीन मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव झाडे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू केला. या मुळे या उपकेंद्राचा मार्ग सुकर झाला आहे. उपकेंद्राच्या कामाला बेंबाळ येथे नुकताच प्रश्नरंभ करण्यात आल्याबद्दल वामनराव झाडे यांचे दीपक वाढई, पांडुरंग कंकलवार, सुरेश झाडे, बोमनवार, सरपंच बालाजी कोटगले, त्रिमूर्ती माहगमकर, दौलत नरूले आदींनी आभार मानले आहेत.

भारतीय विद्यार्थी सेनेने केला गुणवंतांचा सत्कार
वर्धा, ८ जुलै / प्रतिनिधी
शिवसेनाप्रणीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने बारावीतील गुणवंतांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला.बारावीत यश प्रश्नप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध शिक्षणक्षेत्रात यापुढे शिक्षण घेऊन मोठी पदे भूषवितानाच सेवाभावी वृत्ती जोपासावी, मी, माझे कुटुंब एवढय़ापुरतेच स्वत:चे जीवन मर्यादित न ठेवता समाजातील उपेक्षितांनाही आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा समजावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख रवीकांत बालपांडे यांनी याप्रसंगी केले.दीपक राऊत, आशीष वैरागडे, प्रश्न. वैरागडे यांचीही यावेळी भाषणे झाली. गौरव कार्यक्रमात महेश गव्हाळे, यशवंत सातपुते, अनंता दुधबडे, नमृता चलाख, रूपाली बिजवार, वृषाली लटारे, शिल्पा हाते, संचाली तेलंग, कुमुद उडाण, दीपाली पिंपळे अशा एकूण ३० गुणवंताचा सत्कार यावेळी करण्यात आला.उपतालुका संघटक रमेश चंदेल, येळाकेळी शाखा संघटक बाळू सावरकर, रवींद्र खेबे, हर्षल सहारे, रूपेश भलमे, अभिजित हेडाऊ, समीर बुंदे यावेळी उपस्थित होते.

गोंदियात १४ जुलैला सेनेचा मोर्चा
गोंदिया, ८ जुलै / वार्ताहर

शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, बियाणे, खते, औषधे मोफत द्यावी, पोलीस व इतर शासकीय भरतीत जिल्ह्य़ातील बेरोजगारांना प्रश्नथमिकता द्यावी व अन्य मागण्यांसाठी येत्या १४ जुलैला शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी आमदार रमेश कुथे यांनी सांगितले.गोंदिया जिल्हा अवर्षण घोषित करावा, गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी सेनेची मागणी आहे. येत्या १४ जुलैला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी, बेरोजगारांनी व मजुरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार रमेश कुथे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पालांदुरकर, रवींद्र बहेकार, सावलराम महारवाडे, राजेंद्र चामट, डोमाजी बोपचे, सदाशिव विठ्ठले, राजेश चांदेवार, प्रशांत ठवकर, गजेंद्र फुंडे, अजय बिजेवार, उमेश चतुर्वेदी यांनी केले आहे.

महाराष्ट्र व नंदीग्राम एक्स्प्रेसला सिंदी रेल्वेत थांब्याची मागणी
वर्धा, ८ जुलै / प्रतिनिधी
सिंदी रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि नंदीग्राम एक्स्प्रेसला थांबा मिळवून देण्याचे आश्वासन वर्धेचे खासदार दत्ता मेघे यांनी प्रवासी मित्र मंडळाच्या शिष्टमंडळास दिले.नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रकाशचंद्र डफ यांच्या नागरी सत्कार सोहोळ्याकरता दत्ता मेघे सिंदी शहरात आले असताना प्रवासी मित्र मंडळाने त्यांची भेट घेऊन शहरातील रेल्वेच्या मागण्या व समस्या बाबतचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र एक्स्प्रेस व नंदीग्राम एक्सप्रेसचा सिंदी रेल्वे स्थानकावर थांबा, रेल्वे स्थानकावर संगणक तिकीट विक्री, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, फलाटावर शेड वाढवणे, इत्यादी मागण्यांचा यामध्ये समावेश होता.येत्या सहा महिन्यात सिंदी रेल्वेच्या मागण्या घेऊन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जीशी चर्चा करून पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे मेघे यांनी यावेळी सांगितले. शिष्टमंडळात जनक पालीवाल, आशीष देवतळे, अनिल साखळे, यशवंत बडवाईक, अभिषेक दुधतकर व नरेंद्र सुरकार आदींचा समावेश होता.

बचत गटनिर्मित वस्तूंची आता ‘खविसं’ मार्फत खरेदी
मूर्तीजापूर, ८ जुलै / वार्ताहर
महिला सहकारी संस्था व बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी आता तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या मार्फत करण्यात येईल, असे खविसचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. सुहास तिडके यांनी येथे सांगितले. जिल्हा सहकारी बोर्डाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य सहकारी संघ (पुणे) चे उपाध्यक्ष राजेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक सूर्यकांत तराळ, सविता मानकर, सहायक निबंधक जी.जी. पवार, पदमाकर चौधरी, ए.जे. नाथेकर, अमिता गुरव, राजेश सुरेका आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. प्रश्नस्ताविक पी.एस. बडगुजर यांनी केले तर संचालन शिक्षणाधिकारी नितीन बोर्डे यांनी केले.

राज्य युवक धोरण माहिती परिषद उद्या बुलढाण्यात
बुलढाणा, ८ जुलै / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने युवा धोरण जाहीर करावे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नव महाराष्ट्र युवा अभियानाच्या पुढाकाराने १० जुलैला जिजामाता महाविद्यालयात सकाळी १० वाजता युवा धोरण माहिती परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियान या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील युवकांच्या विकासासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

भारिप-बहुजन महासंघाची बुलढाण्यात रविवारी सभा
बुलढाणा, ८ जुलै / प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघाची बुलढाणा जिल्हा (घाटावरील)ची महत्त्वाची सभा रविवारी १२ जुलै ०९ रोजी दुपारी ११.३० वा. स्थानिक बचत भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा निमंत्रक भीमराव जाधव यांनी दिली.या सभेत बुलढाणा जिल्हा घाटावरील जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे विभागीय निरीक्षक डी.एन. खंडारे हे राहतील. यावेळी दिलीप ताये, राजेंद्र पातोडे उपस्थित राहणार आहेत.

‘जाणूया चंद्रपूरचा इतिहास’ रविवारी अभिनव कार्यक्रम
चंद्रपूर, ८ जुलै/प्रतिनिधी
सृजन तर्फे ‘जाणूया चंद्रपूरचा इतिहास’ हा अभिनव कार्यक्रम येत्या रविवारी १२ जुलैला सायंकाळी ६ वाजता प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपूर व परिसरातील गोंडराजवटीला पाचशे वर्षाहून अधिकचा दैदीप्यमान असा इतिहास आहे. या पंचशताब्दीच्या ऐतिहासिक अशा वारस्यावर प्रश्नचार्य मदन धनकर यांच्या अध्यक्षतेखाली खगोलशास्त्रज्ञ सुरेश चोपणे, इतिहास संशोधक दत्ताजी तन्नीरवार, प्रश्न. डॉ. जी.ए. शंभरकर, नाणे अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रकाश टाकणार आहेत. चंद्रपूरचे इतिहासकार अ.ज. राजूरकर यांच्या कन्या उषा प्रकाश डाखोळे यांच्या हस्ते या ऐतिहासिक सफरीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी मोहीम
नवीन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतच्या विशेष मोहिमेचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस खुशाल बोंडे यांनी केले आहे.

शारदा ज्ञानपीठात वृक्षारोपण
बुलढाणा, ८ जुलै / प्रतिनिधी

बुलढाणा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शारदा ज्ञानपीठात वनमहोत्सव दिनानिमित्त प.ल. देशपांडे, प्रमोद देशपांडे, बाबासाहेब महाजन, अ‍ॅड. कवीमंडन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.