Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

प्रशंसनीय सफलता
लाभात गुरू, दशमांत राहू आणि शुक्र, मंगळ सहयोग वृषभ राशीत. बहुतेक कार्यप्रांतांत मेष व्यक्ती आघाडीवर असल्याचे दृष्टिपथात येईल. व्यावहारिक क्षेत्र आणि बौद्धिक वर्तुळात याची प्रचीती विशेषत्वाने येईल. व्यासपौर्णिमा सत्कारणी, तपश्चर्येचा आनंद देणारी आहे आणि शुक्रवारची गुरू-नेपच्यून युती शोधकार्यातील सफलता प्रशंसनीय ठरेल. पराक्रमी रवी असेपर्यंत छोटे-मोठे प्रवास होत राहतात. आप्तभेटीचा आनंद संभवेल. अनपेक्षित आकर्षक स्वरूपाची खरेदी होईल.
दिनांक : ६ ते १० शुभकाळ.
महिलांना : नवनव्या क्षेत्रात यश मिळवीत राहाल. प्रशंसा वाटय़ाला येईल

चित्र आकर्षक होईल
राशिस्थानी शुक्र, मंगळ भाग्यात राहू, दशमात गुरू आणि मंगळ-हर्षलचा शुभ योग. प्रयत्न, युक्ती-कृती यातून वृषभ व्यक्तींचे व्यवहारचित्र आकर्षक होत राहील. उद्योग, राजकीय समीकरणाचे नवे प्रस्ताव समोर येतील. प्रवास होतील. शेती उपक्रमांची रूपरेखा पक्की करता येईल. आर्थिक प्रश्न सुटतील. आर्थिक उपक्रमातून गुरू-नेपच्यून युती आनंददायी आहे. विज्ञान शोधातही प्रभाव निर्माण करू शकाल. परदेशी प्रवास संभवतात.
दिनांक : ८ ते ११ शुभकाळ.
महिलांना : अपेक्षित यश मिळवता येईल. निर्धाराने पुढे याल.

झगडावे लागेल
गुरू, शनी, सूर्य यांचे सहकार्य मिळूनही अपेक्षित यशासाठी व्ययस्थानी शुक्र, मंगळ असेपर्यंत मिथुन व्यक्तींना झगडावे लागणार आहे. सोमवारचा मंगळ-नेपच्यून केंद्रयोगात. आर्थिक समस्या वाढतात. शासकीय अधिकारी त्रास देतात आणि प्रपंचातही तणाव निर्माण होतो. घाईगर्दीने कृती नको. रवी-शनी शुभयोगामुळे गुरुवारच्या आसपास काही प्रकरणे मार्गी लावता येतील. व्यासपौर्णिमा धर्मकार्यातून आनंद देईल.
दिनांक : ८, ९, १० वादग्रस्त काळ.
महिलांना : आरोग्य, प्रपंच, खर्च यावर लक्ष ठेवा.

संयम, गुप्तता आवश्यक
साडेसातीची प्रखरता गुरूमुळे वाढलेली आहे. व्ययस्थानी सूर्य, बुध असेपर्यंत छोटय़ा-छोटय़ा क्षेत्रांतही त्याचा त्रास होणे शक्य आहे. सप्तमातील राहूचा आधार, लाभात शुक्र-मंगळ सहयोग असेपर्यंत प्रतिष्ठा राखण्यासाठी उपयोगात आणता येईल. काही परिचितांचे अनपेक्षितरीत्या सहकार्य मिळेल आणि वादग्रस्त प्रकरणे नियंत्रणात आणता येतील. अशी संधी दवडू नये. यासाठी संयम, गुप्तता हे अस्त्र महत्त्वाचे ठरणार आहे.
दिनांक : ५, ८, ९, १० शुभकाळ.
महिलांना : संतप्त होऊ नका.

समन्वयातून सफलता
दशमात शुक्र-मंगळ, लाभात सूर्य-बुध, सप्तमात गुरू यांचा समन्वय शिकस्तीचे प्रयत्न आणि व्यवहारातील कुशलता यांच्याशी साधला, तर अनिष्ट राहू-केतू साडेसाती यांतून महत्त्वाची प्रकरणे बाहेर काढता येतील. शेतीच्या कामातही लक्ष देता येईल. आर्थिक अडचणी दूर करू शकाल. राजकीय प्रभाव निर्माण करता येईल. व्यापारात प्रगती होईल. मन:शांतीसाठी श्रीमारुतीची उपासना-आराधना उपयुक्त ठरेल.
दिनांक : ६, ७, ११ शुभकाळ.
महिलांना : रागरंग बघून निर्णय घ्या. कार्यभाग साधता येईल.

योजना वेग घेतील
भाग्यात शुक्र-मंगळ, दशमात सूर्य-बुध, पंचमात राहू, राशी कुंडलीमध्ये अनुकूल ग्रहांची संख्या असल्याने सत्कारणी परिश्रमाचा आनंद लाभणारा आहे. साडेसाती आणि गुरूची नाराजी यांचा विरोध अधिक असल्याने तो सत्य आणि संयम यामधून दूर करता येईल. हवामानाचा फायदा उठवता येईल. संपर्क, संबंध, चर्चा यातून महत्त्वाच्या योजनांना वेग देता येईल. व्यापार, राजकारण, कला, साहित्य, अधिकार यांचा समावेश यात करता येईल. व्यासपौर्णिमा धर्मकार्यातून आनंद देते.
दिनांक : ५, ८, ९, १० शुभकाळ.
महिलांना : अपेक्षित यश संपादन करू शकाल.

खटाटोप सुरू ठेवा
गुरू-शनीचे सहकार्य आणि राहू-मंगळ अनिष्ट यामधून मार्ग शोधत, यश मिळवताना खटाटोप सुरू ठेवावा लागेल. शुक्रवारच्या गुरू-नेपच्यून युतीच्या आसपास चमत्कारासारख्या घटना घडतील आणि संधीतून प्रतिष्ठा सांभाळता येईल. यश हाती येईल. आपण ज्या क्षेत्रात असाल, त्यात याचा प्रत्यय येईल. छोटी-मोठी मंडळी दुखावली जातील, असे काही बोलू नका. कृती करू नका. प्रवास अधिक सोपा होईल. शेतीची कामे मार्गी लागतील. आर्थिक अडचणी दूर होतील.
दिनांक - ५, ६, ७, ११ शुभकाळ.
महिलांना- प्रयत्नांनी कार्यभाग साधता येईल.

योजना वेग घेतील
पराक्रमी शनी, सप्तमांत शुक्र-मंगळ, दशमांत शनी, षष्ठात सूर्य कार्यपथावर यश मिळवील. वृश्चिक व्यक्तींचा प्रयत्नरथ पुढे सरकत राहणार आहे. शेती, विज्ञान, व्यापार, राजकारण ही त्याची प्रमुख केंद्रे असतील. चतुर्थीतला गुरू प्रपंचात तणावाचा असतो, पण तणाव वाढणार नाही. स्थगित योजनांना वेग देता येईल. पैसे मिळतील. कला, साहित्यात जम बसवता येईल. जुनी कागदपत्रं लाभ देतील.
दिनांक - ६ ते १० शुभकाळ.
महिलांना- समीकरणे सुटतील, सफलता मिळेल, प्रसन्न राहाल.

नेत्रदीपक यश मिळेल
धनू व्यक्तींच्या व्यावहारिक उलाढालींना यश देणारी ग्रहस्थिती आहे. गुरूची कृपा, शनीचे सहकार्य, रवी- बुध अनुकूल राहील. गुरू-नेपच्यून युतीमधून कर्तृत्व उजळून निघावे, अशी सफलता मिळवता येईल. विज्ञान, शिक्षण, राजकारण यांचा त्यात समावेश होईल. षष्ठातील मंगळ शत्रूंचा बंदोबस्त चोख ठेवतो. गुरू पौर्णिमा सत्कारणी प्रयत्नातून आनंद देणारी आहे. कृषी प्रश्न झटपट सुटतील. अचानक प्रवास होतील.
दिनांक - ६ ते १० शुभकाळ
महिलांना- निर्धार आणि कृतीतून नेत्रदीपक यश मिळेल.

चक्रे वेगात फिरतील
राशीस्थानी राहू, कुंभ राशीत गुरू, पंचमात शुक्र-मंगळ, मंगळवारच्या मंगळ-हर्षल शुभयोगापासून चक्र वेगाने फिरू लागतील. मकर व्यक्ती पुढे पुढे सरकू लागतील. त्यात शुक्रवारच्या गुरू, नेपच्यून युतीच्या आसपास अविस्मरणीय घटनांचा समावेश होईल. आकर्षक खरेदी, नवीन करार, अभिनव उपक्रमांचा प्रारंभ, नवे परिचय असे विभाग यात असतील. शत्रूंवर सतत लक्ष ठेवावेच लागते. प्रकृती सांभाळा.
दिनांक- ८ ते ११ शुभकाळ.
महिलांना- दैव अनंत हस्ते देणार आहे. त्यासाठी योजना तयार ठेवा.

सप्ताह स्मरणात राहील
राशीस्थानी गुरू, पंचमात सूर्य-बुध, सप्तमांत शनी आणि शुक्रवारची गुरू-नेपच्यून युती चमत्कार आणि यश यांच्यामुळे सप्ताह स्मरणात राहणे शक्य आहे. आर्थिक, व्यावसायिक, राजकीय वर्तुळात नवीन चित्र तयार करता येईल. अवघड समस्या निकालात काढता येतील. शुक्र-मंगळ युती अर्थप्राप्तीला अनुकूल आहे. प्रपंचातील प्रश्नांकडे दुर्लक्ष नको. व्ययस्थानी राहू असल्याने कृतीमार्ग गुप्तच ठेवा.
दिनांक- ५, ६, ७, ११ शुभकाळ.
महिलांना- प्रयत्न- हुशारीने समीकरणे सोडवता येतील.

स्वाभिमान शाबूत राहील
गुरू-शनीच्या नाराजीच्या परिणामांनी काही व्यवहार ठप्प झाले असतील. आश्वासन, कृती, यश यांचा भरवसा नाही. त्यात चतुर्थीतील रवी-बुध यांनी घरातही प्रश्न उभे केले असतील. परंतु याच वेळी शुक्र-मंगळच्या आधाराने प्रतिष्ठेचा बुरुज सावरता येईल. लाभातील राहूमुळे परिचित मंडळी संकटात मदत करतील. गुरू-नेपच्यून युतीमध्ये देवधर्म सत्कारणी लागतो.
दिनांक- ५ ते १० शुभकाळ.
महिलांना- प्रलोभने, स्पर्धा टाळा. संधी साधा, यश मिळेल.