Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

मधुबाला ते माधुरी दीक्षित
‘तिरकिट धा’ या संस्थेने नानाविध विषय, वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम नेहमीच सादर केलेत. ‘संगीत षटकार’ हा क्रिकेटचे किस्से आणि गाणी असा सर्वप्रथम हटके कार्यक्रम सादर केला. मग ब्रॅडमन, सोबर्स, तेंडुलकर यांना सलाम ठोकला. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीकडेही मोर्चा वळवला. सिनेसृष्टीतले दिग्गज यांच्यावर ‘ट्रिब्यूट टू लिजंड’ या मालिकेत देवानंद, मधुबाला, शंकर जयकिशन, आर.डी., एस.डी. बर्मन, शम्मी कपूर, अशोककुमार ते अमिताभ असे कार्यक्रम सादर केले.

पुन्हा एकदा गारवा, पण आता एमपी थ्रीवर
गायक, संगीतकार आणि अभिनेता अशी ओळख असलेला ‘गारवा’फेम मिलिंद इंगळे याचा ‘गारवा’ हा आल्बम आता एमपी थ्री सोनी म्युझिक कंपनीने बाजारात आणला आहे. यासंदर्भात ‘वृत्तान्त’शी बातचीत करताना मिलिंद इंगळे म्हणाला की, आज १० वर्षांनंतरही आजच्या कॉलेज तरुण-तरुणींना ‘गारवा’ हा आल्बम ऐकायला नक्कीच आवडेल. म्हणूनच सोनी म्युझिकने हा आल्बम आता एमपी थ्रीवर आणला असून, त्याचबरोबर ‘सांज गारवा’ हा माझा आणखी एक आल्बम आणि आशा भोसले यांचा ‘नक्षत्राचे देणे’ हा आल्बम असा कॉम्बो पॅक रसिकांना एकत्रितपणे एमपी थ्रीवर ऐकायला मिळणार आहे, असे तो म्हणाला. ‘रिमझिम धून, आभाळ भरून, भारावले मन येणार आहे कोण..’ अशा शब्दांना मिलिंद इंगळेनेच संगीत आणि आवाज दिला.

चॉइस इज युवर्स टॉकिजवाला
कॉमेडी एक्स्प्रेस

‘बधाई हो बधाई’ या विनोदी चित्रपटानंतर ‘माय वाईफ्स मर्डर’, ‘गांधी-माय फादर’ असे विषय हाताळल्यानंतर अनिल कपूर पुन्हा एकदा विनोदी चित्रपटाकडे वळला आहे. ‘शॉर्ट कट - द कॉन इज ऑन’ची कथा अनीझ बझ्मी यांची तर दिग्दर्शन नीरज वोराने केले आहे. बॉलीवूडमध्ये स्ट्रगल करणारा राजू (अरशद वारसी), शेखरने (अक्षय खन्ना) लिहिलेली कथा चोरून सुपरस्टार होतो. दरम्यान, मानसी (अमृता राव) ही नवोदित अभिनेत्री आणि शेखरची पत्नी हीची राजूसोबत चित्रपटाच्या निमित्ताने बोलणी सुरू होतात.

‘जोडी जमली रे’च्या नव्या पर्वात गंभीर चर्चेवर उहापोह
‘स्टार प्रवाह’च्या ‘जोडी जमली रे’ कार्यक्रमाचे नवीन पर्व गुरुवारपासून सुरू झाले. जयेंद्र, भक्ती, रोहित, मीनल, योशिता आणि सोमनाथ अशा सहा स्पर्धकांची तसेच त्यांच्या पालकांचा एकमेकांशी परिचय झाला आहे. ‘हॅमर दी बॉल’ या इंटरॅक्टिव्ह खेळानंतर आता शुक्रवारच्या भागात आणखी एक गमतीदार ‘टास्क’ स्पर्धकांना देण्यात येणार आहे. ती ‘टास्क’ म्हणजे एक हजार रुपयांचे सुट्टे पैसे जमवणे. हा गमतीदार खेळ पाहण्याबरोबरच सर्व स्पर्धक, त्यांचे पालक आणि सूत्रसंचालक मूल दत्तक घेणे, टेस्ट टय़ूब बेबी या विषयांवर गंभीर चर्चा करणार आहेत.


फर्स्ट इंप्रेशन एण्टरटेन्मेंट (सी. एम.) या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वीन ऑफ महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेत राज्यभरातून १८ तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात जिंकलेल्या स्पर्धक दिसत आहेत. ‘क्वीन ऑफ महाराष्ट्र’ हा किताब निहारिका घाडगे हिने पटकाविला, तर शीतल पाठक दुसरी व स्नेहा ठाकूर आणि स्नेहा शेट्टी यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच नेहांकी संखे आणि अपेक्षा पदुकोण यांनी ‘बेस्ट स्माइल’ हा किताब जिंकला. निहारिका घाडगे हिला १ लाख रुपयांचे, शीतल पाठक हिला ५० हजार रुपयांचे तर स्नेहा ठाकूर व स्नेहा शेट्टी या दोघींना अनुक्रमे सोडबारा हजारांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. परीक्षक म्हणून समीर धर्माधिकारी, एम. एम. मिठाईवाला आणि दीपाली सय्यद यांनी काम पाहिले.

पावसाळ्यातील समस्यांवर बिग एफ. एम.ची उपाययोजना
बेस्ट, महानगरपालिका, आरटीओ, टॉप्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बिग ९२.७ एफ. एम.ने पावसाळ्यातील समस्या दूर करण्यासाठी एक योजना आखली आहे. पावसाळ्यात आणीबाणीच्या काळात बिग ९२.७ एफ. एम.वर महानगरपालिका मदतकेंद्र, बेस्ट मदतकेंद्र इत्यादींचे संपर्क, दूरध्वनी, तसेच फायर ब्रिगेडच्या खात्याची माहिती इत्यादी लोकोपयोगी माहिती व शासकीय मदत यंत्रणा इत्यादी बिग एफ. एम.च्या कार्यक्रमात किंवा कार्यक्रमादरम्यान श्रोत्यांसाठी प्रसारित करण्यात येईल, तसेच अडीअडचणीच्या काळात बिग एफ. एम.चे श्रोते बिग एफ. एम.शीदेखील संपर्कात राहू शकतील.
प्रतिनिधी