Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

कक्का स्क्वेअर
सुधीर जोगळेकर
त्या दोघी आणि ते दोघे..

'कक्का स्क्वेअर' हा स्तंभ सुरू होऊन दोनेक र्वष होत आली, पण अजूनही या नावाविषयीचं कुतूहल अनेक वाचकांमध्ये आहे, हे समक्ष भेटींमध्ये आणि पत्रव्यवहारातून जाणवत राहिलं आहे.. हा स्तंभ आहे देशाच्या चार सीमांमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारलेला.. 'कक्का' हे त्या सीमांचं सूचकरूप.. दक्षिणेचं कन्याकुमारी ते उत्तरेचं काश्मीर आणि पश्चिमेचं कच्छ ते पूर्वेचं कामरूप हे अंतर निर्देशित करणारं हे लघुरूप. 'क' ते 'का' आणि 'क' ते 'का' असं दोन वेळा सूचित करावं लागत असल्यानं त्याचं केलेलं 'कक्का स्क्वेअर' हे लघुनामांकन..

इंटरेस्टिंग!
‘त्या’ उडीच्या निमित्ताने..

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ‘मोरिया’ जहाजावरून फ्रान्सच्या सागरी हद्दीत ८ जुलै १९१० रोजी मारलेल्या ऐतिहासिक उडीची शताब्दी साजरी होणार आहे. ब्रिटिशांच्या कैदेत असलेल्या सावरकरांच्या सुटकेसाठी फ्रान्समधील त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार त्यांना घेऊन जाणारे ‘मोरिया’ जहाज जेव्हा मार्सेल्स बंदरालगत आले तेव्हा सावरकरांनी जहाजावरील शौचालयाच्या खिडकीतून ती ऐतिहासिक उडी घेतली.

घडामोडी
नागपूर
नासक्या दह्य़ासह पचवल्या अळ्याही!

ऐन सणावारांचा आरंभकाळ तोंडावर आलेला असतानाच नागपुरात अलीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून एक जळजळीत सत्य उघडकीस आणले आहे. त्यामुळे सणावारांची चाहूल आणि त्यानिमित्ताने घराघरातून पसरणाऱ्या पंचपक्वानांच्या घमघमाटाने आतापासूनच पाणावलेली तोंडे काहीशी शिसारी आल्यागत झाली आहेत.