Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

राज्य


गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्य़ात विशेषत: पश्चिम भागात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. (छाया :- तय्यब अली)


तीन हजार विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळते आहे कोकण रेल्वे
नागोठण्याच्या ओव्हर हेड पुलाखाली खोदकाम

जयंत धुळप, अलिबाग, ९ जुलै

नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटी विद्यासंकुलातील अडीच हजार आणि आनंदीबाई प्रधान महाविद्यालयातील ५०० अशा तीन हजार विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याची अत्यंत धोकादायक परिस्थिती कोकण रेल्वे प्रशासनाने निर्माण केली आहे.़ मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र ़ १७ वर नागोठणे येथे डाव्या बाजूस कोकण एज्युकेशन सोसायटीचे हे विद्यासंकुल आणि महाविद्यालय आह़े

खाण प्रकल्प लादल्यास राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या बाजूने -आर.आर. पाटील
सावंतवाडी, ९ जुलै/वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला मोठी संधी असताना गोव्याने नाकारलेले खाण प्रकल्प लोकांचा विरोध डावलून लादल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्याच बाजूने उभी राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांनी जाहीर सभेत दिली. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना खाण व औष्णिक प्रकल्पाबाबत उच्चस्तरीय समिती शासनाने नेमून लोकांचे मत जाणून घेण्यासाठी सरकारकडे आग्रही राहीन, असे ते म्हणाले.

तीन वर्षांत ‘पेटाफ्लॉप’ची निर्मिती
‘सी-डॅक’ आता पेलतेय सुपर महासंगणकाचे शिवधनुष्य!

पुणे, ९ जुलै/खास प्रतिनिधी

सेकंदाला एक कोटी अब्ज गणिती समीकरणे सोडविण्याची क्षमता असलेला सुपर महासंगणक विकसित करण्याचे शिवधनुष्य प्रगत संगणन केंद्र (सी-डॅक) पेलत आहे. ‘परम’ या पहिल्या भारतीय महासंगणकाच्या सध्या विकसित करण्यात आलेल्या ‘परमयुवा’ या अद्ययावत आवृत्तीची क्षमता ५४ टेराफ्लॉप असून २०१२ पर्यंत विकसित होणारा हा सुपर महासंगणक एक हजार टेराफ्लॉपएवढय़ा विस्मयकारक क्षमतेने कार्यरत राहील.

पुण्यात विद्युत अभियंता महिलेची गळा चिरून हत्या
पिंपरी, ९ जुलै / प्रतिनिधी

सुतारवाडी-सूस रस्त्यावरील चिदानंद सोसायटीजवळ बुधवारी रात्री एका विद्युत अभियंत्या महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या नातेवाइकांनी पतीवर संशय व्यक्त केला आहे. पतीला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी लक्ष्मण ढवळे (वय ३२, रा. स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी, सूस रोड, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

‘जी.एं.’वरील पुस्तकाचे आज प्रकाशन
पुणे, ९ जुलै/प्रतिनिधी

प्रतिभावंताच्या जडणघडणीत अनेक घटक महत्त्वाचे असतात. लेखकाच्या साहित्यनिर्मितीत कुणाचा कसा सहभाग असतो याविषयी साऱ्यांना कुतूहल असते. जी. ए. कुलकर्णी यांच्यासारख्या मराठी साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वाबद्दल साऱ्यांनाच कुतूहल आहे.

जुलै महिन्यातही संगमेश्वर येथे फणसाचे ढीग
संगमेश्वर, ९ जुलै/ वार्ताहर

जानेवारी महिन्यात बाजारपेठेत विक्रीसाठी येणारे फणस या वर्षी जुलै महिना सुरू झाला तरीही सर्वाना उपलब्ध आहेत. मात्र शेकडोंच्या संख्येने उपलब्ध असणाऱ्या या फणसांना आता मागणी नसल्याने त्याचा दर मात्र कोसळला आहे. कोकणात फणसाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात येते. फणसापासून अन्य पदार्थ बनविण्याची प्रक्रिया होत नसल्याने बाजारपेठेत हापूस दाखल झाल्यावर फणसाची मागणी कमी होते. वटपौर्णिमेला असलेले फणसाचे महत्त्व लक्षात घेता कोकणातील फणस हजारोंच्या संख्येने पुणे- मुंबईसारख्या मोठय़ा शहरात विक्रीसाठी नेले जातात. वटपौर्णिमेनंतरही शिल्लक राहणारे फणस जुलै महिन्यात विक्रीसाठी संगमेश्वर येथे दाखल झाले असून पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येणारे पर्यटक याची तुरळक स्वरूपात खरेदी करताना दिसून येतात. फणसाचा दर १० ते २० रुपये नग एवढा खाली आला असला तरी पाऊस पडल्यावर कोकणवासीय फणस खाण्यास राजी नसल्याने फणसाची मागणी आता संपुष्टात आली आहे.

कोल्हापूरमध्ये नद्यांना पूर
कोल्हापूर, ९ जुलै / प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्य़ातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दरम्यान आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद राधानगरी येथे झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाँधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात सरासरी ४२.७७ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.राधानगरीत १७० मि.मी., शाहूवाडी ६८, करवीर १९, कागल ९, पन्हाळा ३०, हातकणंगले ४.४., शिरोळ ७, गगनबावडा ८८, भुदरगड १६, गडिहग्लज १४, आजरा ३१ आणि चंदगड ५६ मि.मी. पाऊस झाला आहे.

पिंटू सिंगला २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
पनवेल, ९ जुलै / प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सतीश मंदाडे, मोहन शुक्ल आणि पिंटू सिंग या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पनवेल न्यायालयाने गुरुवारी २३ जुलैपर्यंत वाढ केली. या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असल्याने या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सीबीआयचे विशेष सरकारी वकील एजाझ खान यांनी केला होता.