Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

क्रीडा

संघर्ष ‘अर्थ’कारणांसाठी!
मुंबई, ९ जुलै / क्री. प्र.

शुक्रवारी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीतील मुख्य लढत रवी सावंत आणि रत्नाकर शेट्टी यांच्यात होणार आहे. कोषाध्यक्षपदासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील हे दोन दिग्गज एकमेकांशी टक्कर देणार आहेत. शरद पवार गटाच्या मनमानी कारभाराचा निषेध करून बाळ महाडदळकर गटातर्फे निवडणुकीत उतरणारे रवी सावंत पेशाने चार्टर्ड अकाऊण्टट आहेत. त्यामुळे २०११ च्या विश्वचषकाच्या आयोजन कालावधीत ते कोषाध्यक्षपदासाठी लढत आहेत.

‘एमसीए’मधील शरद पवारांच्या मनमानीला कोर्टाची चपराक
मुंबई, ९ जुलै/प्रतिनिधी

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयात कोणतेही फेरफार करण्याचा अधिकार संघटनेच्या एकटय़ा अध्यक्षांना नाही, असा निष्कर्ष नोंदवून नगर दिवाणी न्यायालयाने आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने संघटनेत चालविलेल्या कथित मनमानी कारभारास चपराक दिली. ‘एमसीए’चे कार्यकारिणी सदस्य निवडण्यासाठी उद्या शुक्रवारी दुपारी होणाऱ्या निवडणुकीत भायखळ्याच्या ‘केआरपी इलेव्हन’ या क्रिकेट क्लबचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून संदीप विचारे यांना मतदान करू द्यावे, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे.

बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी वेस्ट इंडिजची ‘सेकंड स्ट्रिंग’
सेंट जॉन्स (अँटिगा), ९ जुलै / पीटीआय

वेस्ट इंडिज प्लेयर्स असोसिएशनने बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर बहिष्कार घातल्यामुळे क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी दुय्यम संघ निवडला आहे. विशेष म्हणजे या संघातील नऊ क्रिकेटपटूंनी अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही.
क्रिकेट बोर्डाशी सुरू असलेल्या कराराच्या वादावर तोडगा निघू न शकल्यामुळे वेस्ट इंडिज प्लेयर्स असोसिएशनने बुधवारी मायदेशात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिन महान; पण ट्वेन्टी-२०साठी अनफिट
जॉन बुकॅनन यांची मुक्ताफळे
नवी दिल्ली, ९ जुलै / वृत्तसंस्था
करोडो भारतीयांच्या स्मृितपटलावरून आपण दूर जायचे नाही, असा चंगच जणू ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांनी बांधलेला दिसतो आहे. शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रशिक्षक असणाऱ्या जॉन बुकॅनन यांची स्पर्धेच्या दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या टप्प्यांतील संघाच्या खराब कामगिरीनंतर उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र तरीही वादग्रस्त विधाने करून ते आजही भारतीयांच्या स्मृतीतून हटण्यास तयार नाहीत.

‘वाडा’ नजरबंदी!
विनायक दळवी
मुंबई, ९ जुलै

वर्ल्ड अ‍ॅण्टी डोपिंग एजन्सी (वाडा) यांच्या जाचक नव्या नियमावलींचा भारताच्या चार प्रमुख क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडे निषेध केला आहे. विरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, हरभजनसिंग आणि झहीर खान या चार खेळाडूंनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडे ‘वाडा’च्या जाचक नियमावलीबाबत तक्रार केली आहे.

ऑस्ट्रेलियाचे चोख प्रत्युत्तर
पॉन्टिंग आणि कॅटिच यांची शतके
कार्डिफ, ९ जुलै/ पीटीआय
अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इग्लंडच्या ४३५ धावांना चोख प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर सायमन कॅटिच आणि कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी शतके ठोकून दिले. कर्णधार पॉन्टिंगने आज कसोटी कारकिर्दीतील ३८ वे शतक साजरे केलेच त्याचबरोबर अकरा हजार धावांचा पल्ला गाठणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे. तर कॅटिचनेही आठवे शतक झळकाविले.

सुनील नाबाद ६०..
मुंबई, ९ जुलै/ वृत्तसंस्था

क्रिकेटमधील अनेक विक्रमांची शिखरे पादाक्रांत करणारा सुनील गावसकर उद्या १० जुलै रोजी एकसष्टाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.सुनीलचे विक्रम किती म्हणून सांगावेत? कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा पहिला फलंदाज आणि सर डॉन ब्रॅडमन यांचा कसोटींमधील २९ शतकांचा विक्रम मोडणारा फलंदाज, या दोन विक्रमांतूनच त्याची क्रिकेटमधील थोरवी स्पष्ट होते. पण या पलीकडेही त्याने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अनेक अर्थाने मोठे आहे. त्याची मोजदाद शब्दांत करणे कठीण आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांना आपणही पराभूत करू शकतो, हा विश्वास सुनीलनेच भारतीय क्रिकेटपटूंमध्ये निर्माण केला.

स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅरेथॉन सातव्या पर्वासाठी सज्ज
मुंबई, ९ जुलै/ क्री. प्र.
आशियातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन स्पर्धा अशी बिरूदावली मिळविणाऱ्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅरेथॉनच्या सातव्या पर्वासाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट असून स्पर्धा १७ जानेवारी २०१० रोजी होणार आहे. त्याचबरोबर गेल्यावेळी ‘टाइम चीप’अनिवार्य नसल्यामुळे अनेक समस्यांना आयोजकांना सामोरे जावे लागले होते. त्या चुकांपासून आयाोजकांनी चांगलाच धडा घेतला असून यावेळी ‘टाइम चीप’स्पर्धकांसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे. गेल्यावेळी झालेल्या चुका टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनशी चर्चा करून मॅरेथॉनचा मार्ग वरळी ‘सी लिंक’वरून नेण्याचा विचार करीत आहोत. चर्चेनंतर हा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र सरकारपुढे ठेवू, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.

भारतीय धावपटूंना मिळणार उम्मीद से दुगना
स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅरेथॉन स्पर्धेत जगातील अव्वल धावपटूंबरोबरच भारतातील व्यावयायिक धावपटूही सहभाग घेतात आणि त्यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्याते येते. यावर्षी भारतीय धावपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनात दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम २,५०० अमेरिकन डॉलर्स एवढी होती. तर यावर्षी ही रक्कम सहा हजार अमेरिकन डॉलर्स एवढी करण्यात आली आहे.

संक्षिप्त क्रीडावृत्त
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अख्तर आणि आसिफची वर्णी लागणार?
कराची: दक्षिण आफ्रिकेत २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पध्रेसाठी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ यांची पाकिस्तानच्या ३० खेळाडूंच्या संभाव्य चमूत वर्णी लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आसिफच्या समावेशाबाबत अध्यक्ष इजाझ बट यांनी अंतरिम मुख्य निवड प्रमुख वसिम बारीला हिरवा कंदील दिला आहे.

कार्याध्यक्ष चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा
मुंबई: एक्सलंट कॅरम अ‍ॅकेडमी व शिवसेना शाखा क्र. १९४ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई जिल्हा मानांकन भव्य कॅरम स्पर्धा २७ ते २९ जुलै २००९ या कालावधीत कै. गोपाळ शेट्टीगार सभागृह, म्युनिसिपल मजदूर युनियन कार्यालय, ना. म. जोशी मार्ग, मुंबई-१३ येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी महेंद्र तांबे- ९८१९५६९४८० किंवा शशी कोंडदेव- ९९६९१३४०१५ यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्हा मल्लखांब पंचवर्ग व पंचपरीक्षा
मुंबई: मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालय व मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि कुर्ला तालुका मल्लखांब संघटना, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने ११, १२, १८ व १९ जुलै, दरम्यान जिल्हा पंचवर्ग व पंचपरीक्षा दुपारी १ ते सायंकाळी ७ या वेळात जवाहर विद्याभवन येथे आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी दत्ताराम दुदम ९८६९१२१४१० यांच्याशी संपर्क साधावा.

बुद्धिबळ सराव शिबिर
मुंबई: ‘कॅपाब्लांका’ चेस फाऊंडेशनने शहाजी राजे क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) अंधेरी (प.) येथे ११ जुलै २००९ पासून प्रत्येक शनिवारी दुपारी १ पासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत बुद्धिबळ सराव शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विठ्ठल माधव ९७०२२७३३३० व विश्वनाथ माधव ९८२०१२१२४१ यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबई सिटी ओपन बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा २००९
मुंबई: चेस प्रमोटर्स ऑफ मुंबई (सी. पी. एम.) आयोजित व मुंबई बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धामधील चौथी एकदिवसीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा रविवार, १२ जुलै २००९ रोजी भानुशालीवाडी हॉल, टिळक रोड, घाटकोपर पूर्व येथे पार पडेल. २१ जून ते २६ जुलै या दरम्यान दर रविवारी घाटकोपर, डोंबिवली, ठाणे, पेडर रोड, गोरेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा खेळविल्या जातील. अधिक माहितीसाठी ९९२०१६६८५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.