Leading International Marathi News Daily
शनिवार, ११ जुलै २००९
  सीआरझेडचा फटका - ३
सीआरझेडचा, पर्यावरण सुधारणांचा पुनर्विचारही व्हावा
  ‘‘परिसर-नियोजनाचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन’’
  ‘होय, पार्किंग विकताच येत नाही!’
  ओझरमच्या फौजदारवाडीतील राणे यांचे प्रशस्त घर
  महानगरपालिका कायद्यातील सुधारणा
गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी
  वास्तुरंग
  मेलबॉक्स
  वरदान विजेचे.. २
वीजवाहक वायर, वायरिंग व घ्यावयाची काळजी

 

‘‘परिसर-नियोजनाचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन’’
वास्तुरचनाकार परिसर नियोजनकार या सर्वाना इमारती, मोकळ्या जागा यांचे नियोजन करताना त्या त्या जागांच्या वापर करणाऱ्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक असते. या गरजा भौतिक तशाच मानसिक असतात. उदा. बसायला सुयोग्य उंचीची बैठक ही भौतिक गरज आहे तर बसल्यावर बाहेरील देखावा/ बागबगिचा दिसून आनंद मिळणे ही मानसिक गरज आहे. आपल्या रोजच्या परिसराचा लोक कसा वापर करतात व तो वापर करताना त्यांना आनंद होतो की त्यांच्यावर ताण पडतो याचा विचार आवश्यक असतो.
आपला परिसर वा वास्तु यांच्यामुळेच आपल्या मनोवृत्तीत व वर्तनात बदल घडतो हे मानणे टोकाचे व चुकीचे आहे. परंतु आपल्या मानसिक/ शारिरीक गरजा काही विशिष्ट भौतिक परिसरीय घटकांमुळे भागू शकतात व मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते. उदा. इस्पितळात आधीच लोक ताणात असतात. त्यातून तिथले वासू, कण्हणारे चेहरे इ. मुळे हा

 

ताण वृद्धिंगत होतो. पण अशाच ओ. पी. डी. च्या खिडकीतून सुंदर फुलझाड दिसले वा ओ. पी. डी. मध्ये एखादे आल्हाददायक आवाज करणारे कारंजे असले तर रुग्णांना सुखद अनुभूति येऊ शकते. याचा अर्थ औषधोपचार न घेता बरे वाटेल असा लावणे चुकीचे आहे. ठराविक भौतिक गुणधर्माच्या जागांमध्ये ठराविक भावावस्था येऊ शकण्याची शक्यता अधिक असते. हा शक्यता वादाचा सिद्धांत ‘आमोस रापोपार्ट’ या वास्तूविद् संशोधकाने ‘\एल्ल५्र१ल्लेील्ल३ं’ स्र्१ुं्र’्र२े’ या नावाने मांडला. याला शक्यता अशासाठी त्याने म्हटले कारण माणसांच्या वर्तनावर सामाजिक परिस्थिती व परिसराच्या देखिल परिणाम होत असतो; परंतु शक्यता लक्षात घेता सर्वसाधारण माणसांना काही ठराविक जागा आवडतात व त्यांचे वर्तन वर्तविता येऊ शकते. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून मानव वर्तनाचा अभ्यास करणाऱ्यांचे असे मत आहे की माणसांना काही भौतिक घटकांबद्दल वा परिसरांबद्दल जन्मजात ओढ असते. उदा. निसर्गाविषयी प्रेम ओढ हे माणसांना उपजत असते व त्यामुळे त्यांना वृक्षप्रधान दृष्य/ परिसर हवेसे वाटतात.
वास्तुकला ही वास्तुविदांच्या कल्पनांचा दृष्य अविष्कार असते या संकल्पनेला शास्त्रीय अभ्यासकांनी फोल ठरविले आहे. वास्तुविद् व सामान्य माणसे यांच्यातील संवाद आवश्यक असतो व मानव - परिसर संबंधांचा अभ्यास झाला तर निश्चितच आपला परिसर आपल्याला भौतिक तसे मानसिक समाधान देऊ शकेल. उदा. दाखल ऑस्कर न्यूमन यांनी केलेल्या संशोधनाची माहिती खाली देत आहे.
ऑस्कर न्यूमन या वास्तुविद्संशोधकाने १९७२ मध्ये अमेरिकेतील रहिवासी भागात घडणाऱ्या गुन्ह्य़ांचा अभ्यास केला. तौलनिक अभ्यासासाठी त्यांनी दोन गृहप्रकल्प निवडले जे सामाजिक, आर्थिक दृष्टय़ा समान होत; पण वास्तू व परिसर नियोजनाच्या दृष्टीने भिन्न होते. पोलिस दफ्तरातून गुन्ह्य़ांची माहिती मिळविली. त्यांना असे आढळून आले की घरांच्या खिडक्यांमधून जर मोकळ्या जागा, परिसर यांचे पर्यवेक्षण रहिवासी करू शकत असतील तर तिथे गुन्हे कमी घडतील. ज्या मोकळ्या जागांमध्ये खेळा—याची साधने होती. तिथे मुलांबरोबर आई, आजोबा हे ही येत होते. त्यामुळे आपोआपच गैरवर्तन करणाऱ्या लोकांना मज्जाव होत असे. या उदाहरणावरून निश्चित लक्षात येते की, वास्तूनियोजनाद्वारे रहिवासी परिसरात सुरक्षा देता येऊ शकते. सुरक्षा ही एक महत्त्वाचा प्रश्न सध्या सर्व शहरांना भेडसावत आहे. तरीही आपण पहातो की, रहिवासी भूखंड विकासात बिल्डर्स आर्थिक फायदाच लक्षात घेऊन न विकले जाणारे कोपऱ्यातील विचित्र आकाराचे भूखंड बागेसाठी राखीव ठेवतात. अशा कोपऱ्यातील मोकळ्या जागा कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत व कोणी तिकडे जात नाही. काहीच दिवसात दारुडे, जुगारी इ. लोकांची वर्दळ तिकडे सुरू होते व गुन्हेगारांना पोबारा करण्यास आयतीच जागा सापडते.
वरील उदाहरणात ‘सुरक्षा व परिसर नियोजन’ या संदर्भातील संशोधन आपण पाहिले. मानव-परिसर संशोधनाचे विविध पैलू आहेत व विविध बाबींवर संशोधन व्हायला हवे आहे. अंतर्गत सजावटीचा आपल्या मनावर कार्यकुशलतेवर काय परिणाम होतो हे पहावयास हवे. खिडक्यांची संरचना, उजेड, रंगसंगती इ. भौतिक घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. नगरनियोजनाच्या स्तरावर शहरातील दृष्य प्रदूषण मार्गशोधन सहजता, शहराची प्रतिमानिर्मिती सारख्या महत्वाच्या बाबींवर संशोधन सुरू आहे. रेल्वेस्टेशन मधून बाहेर पडताना उडणारा गोंधळ हा तेथील परिसर नियोजनाने, मार्गदशक फलकांनी कमी करता येऊ शकतो.
शहर, वास्तू मोकळ्या जागा खरे तर सर्वासाठी असतात. परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की, काही ठराविक भौतिक घटकांमुळे पुरुषप्रधान जागा निर्माण होतात. म्हणजेच स्त्रीयांना वापर करावयास कठीण / गैरसोयीचा असा भौतिक परिसर असतो. याचप्रमाणे विकलांग, वृद्ध यांच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक असते. या सर्व विषयात वास्तुविदांनी संशोधन करून उपयोजन करणे गरजेचे झाले आहे. शहरात जगणाऱ्या माणसांच्या गरजा, भावना, यांना पूरक असा परिसर नियोजित करणे आवश्यक आहे.
डॉ. अभिजित नातू