Leading International Marathi News Daily
शनिवार, ११ जुलै २००९
  सीआरझेडचा फटका - ३
सीआरझेडचा, पर्यावरण सुधारणांचा पुनर्विचारही व्हावा
  ‘‘परिसर-नियोजनाचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन’’
  ‘होय, पार्किंग विकताच येत नाही!’
  ओझरमच्या फौजदारवाडीतील राणे यांचे प्रशस्त घर
  महानगरपालिका कायद्यातील सुधारणा
गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी
  वास्तुरंग
  मेलबॉक्स
  वरदान विजेचे.. २
वीजवाहक वायर, वायरिंग व घ्यावयाची काळजी

 

मेलबॉक्स
घरे राहती ठेवली तरच योग्य

विवाहानंतर संसारात पदार्पण करताना आपल्या मालकीच्या स्वतंत्र घरात संसार थाटायला मिळणे तसे दुर्मिळच. एकत्र कुटुंबात जागेच्या अडचणीला तोंड देताना हक्काच्या छपराची नितांत गरज भासते. त्यासाठी पती-पत्नी दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करून घराचे स्वप्न साकार करतात. निर्जीव घर सजीव होऊन आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनते हे समजत नाही. घर सोडून दुसऱ्या घरी जाताना डोळे पाणवतात कारण आपल्या सुखदु:खाच्या मूक साक्षीदाराचा निरोप घेणे जड जात असते.
स्वत:च्या निवाऱ्याची चिंता मिटली की मुलांसाठी आणखी एका घराची तजवीज करावी का, हा विचार मनात येतो. सध्या राहत असलेल्या ठिकाणी दुसरे घर आपल्या बजेटमध्ये बसेल का, हा प्रश्नही पुढे येतो. सध्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून लांबवर

 

कमी बजेटमध्ये दुसरे घर होऊ शकते.
आकर्षक जाहिराती, सुंदर मॉडेल ग्राहकांना भुरळ पाडते यात शंकाच नाही. आपण गुंतवणूक म्हणून घर घेतले असले तरी त्याचा उपभोग आपणच जास्तीत जास्त घेतला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना त्याचा किती उपयोग होईल हे आपण सांगू शकत नाही. मुले जर नोकरी-व्यवसायासाठी परदेशात राहणार असतील तर भारतातल्या स्थावर मालमत्तेचा त्यांना स्वत:ला राहण्यासाठी काडीचा उपयोग नसतो. वेळप्रसंगी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते किंवा ते घर कवडीमोलाने विकले जाते.
सोन्याच्या दागिन्यातली गुंतवणूक डेड इन्व्हेस्टमेंट ठरते. कारण सोन्याचे दागिने, मंगळसूत्र हे स्त्रीधन असते व अगदी शेवटचा उपाय म्हणून विकले जातात, अन्यथा नाही. त्याचप्रमाणे आपल्याला पैशाची गरज असेल तर घर बाजारभावापेक्षा कमी किमतीला विकावे लागते व खरेदीदाराला त्या घराची निकड असेल तरच व्यवहार लवकर पूर्ण होतो नाही तर बराच काळ जावा लागतो. दुसऱ्या घरातून उत्पन्न मिळविण्यासाठी भाडेकरू ठेवायचा म्हटले तरी तो चांगला मिळेल का, की घरच बळकावेल, या भीतीपोटी अनेकजण घर भाडय़ाने देतच नाहीत.
प्रत्येकाने आपण खस्ता खाऊन घेतलेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त उपभोग स्वत: घ्यावा. शहरापासून लांब घेतलेल्या घरात राहायला गेल्यावर सगळ्या रोजच्या वस्तू महाग मिळाल्या, रिक्षा किंवा स्वत:च्या वाहनाच्या पेट्रोलचा खर्च, टोल असले हिशेब करून मन शिणवू नये. दरमहाचा दोन्ही घरांचा मेंटेनन्स आपल्या मुलांना भरणे जमणार आहे का, याचाही विचार करावा. मुलांना दुसरे घर नकोच असेल व आपल्यालाही त्याचा उपभोग घेणे शक्य नसेल तर हयातीतच त्याची विक्री करावी. आपल्यला आवडलेले घर मुलांना आवडेल असे नाही. जर आपण दोन घरे घेतली तर दोन्ही घरे राहती ठेवली तरच आपण खस्ता खाऊन घेतलेल्या घरात राहण्याचा आनंद उपभोगता येईल.
- मंदाकिनी परब, वांद्रे

इमारतीची कमकुवत होण्याची प्रक्रिया; सुरुवातीपासूनच दक्षता घ्यावी
‘‘इमारत कमकुवत होण्याची कारणमीमांसा’’ (वास्तुरंग : १३ जून) व ‘‘घर की छळछावणी’’ हे दोन्ही लेख फ्लॅट संस्कृतीचे दर्शन घडविणारे आहेत. आपल्या वास्तुरंगमधून फ्लॅटधारकाना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन विनामूल्य मिळत असते. फ्लॅटधारकाना इतके मौलिक, कायदेशीरपणाचे व इतर, साहाय्य दिल्याबद्दल वाचक वास्तुरंगचे आभारी राहतील. आपली इमारत कमकुवत का होते ते सर्वच फ्लॅटधारकाना समजत नाही असे म्हणणे धाष्टर्याचे ठरेल, पण ‘‘माझ्या मालकीच्या फ्लॅटमध्ये मी वाटेल ते करीन, मला कोणीही अडथळा आणू शकत नाही,’’ ही भावना फ्लॅटधारकाला असतेच! फ्लॅटमध्ये ‘सुधारणा’ चालू असताना मोडतोडीतून बाहेर आलेला सिमेंट, वाळू इ. टाकाऊ पदार्थ आपल्या ‘खाली’ वा ‘शेजारी’ असणाऱ्या फ्लॅटमध्ये पडतात व त्यांना त्रास होतो ही जाणीव तर नसतेच उलट ‘कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे’ हा अभिनिवेश असतो. थोडक्यात फ्लॅटधारकाची न्यूइसन्स व्हॅल्यू ही ‘अनलिमिटेड’ असते. सर्वाच्याच फ्लॅटसना’ मोडतोडीपासून (आपल्या फ्लॅटमधल्या) ‘धोका’ आहे ही जाणीवच नसते. त्यापेक्षा ‘चाळ बरी’ असेच म्हणावयाची वेळ येते पण कुणी कबूल करायला तयार नसतो.
इमारत कमकुवत होण्यामागची कारणपरंपरा लेखकानी छानपणे, समजदार पद्धतीने मांडली आहे. आपल्या स्वत:पुरता विचार केला तरीही बहुधा इमारत वीस-पंचवीस वर्षांनंतर ‘अशक्त’ व्हायला सुरुवात होते. व तो अशक्तपणा लपत नाही. त्याचवेळी आपलीही सेवानिवृत्ती जवळ आलेली असते. काही कार्येही व्हायची असतात. अशा तऱ्हेने
चार बाजूनी आपल्यावर हल्ले होण्याची भीती असते. तेव्हा आरंभापासूनच जुळवून घेतले तर त्रास कमी होईल.
‘घर की छळछावणी’ मध्येही फ्लॅटमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत वस्तुस्थितीदर्शक वर्णन केले आहे. फ्लॅटमध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आधी, प्रारंभी, आपल्या लक्षात येत नाहीत किंवा आपण लक्ष देत नाही त्या समोर उभ्या राहतात व ‘हा नको नको संसार, शिरावरी भार’ अशी परिस्थिती निर्माण होते. फ्लॅटमध्ये असणाऱ्या भल्या-मोठय़ा- थोरल्या खिडक्या- काचेची तावदाने असणाऱ्या, कशासाठी? हा अनेकांचे पुढे नंतर येणारा प्रश्न आहे. अर्थात बिल्डर तुम्हाला यशस्वीपणे ‘पटवतो’ त्यामुळेच तो बिल्डर होतो. यापुढेही फ्लॅट घेताना सर्व बाजूनी निदान जास्तीत जास्त बाजूनी विचार करावा म्हणजे आपले कमीत कमी नुकसान होईल, फ्लॅटमध्ये राहण्याचा विचार करताना बाशिंग गुडघ्याला बांधू नये.
- धुंडिराज वैद्य, कल्याण.

प्रतीक्षा ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाची
आपला वास्तुरंगमधील ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार करावी कशी, हा लेख वाचला. तो उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
मी ज्येष्ठ नागरिक आहे, माझ्या को-ऑ. हौसिंग सोसायटी कार्यकारिणीने माझ्याकडून बिनभोगवटा (नॉन ऑक्युपेन्सी चार्ज) शासनाच्या नियमापेक्षा अधिक वसूल केला आहे व इतर मानसिक त्रास देत आहेत. याविषयी तक्रार मी जिल्हा ग्राहक मंचाकडे पूर्व उपनगर वांद्रे पूर्व मुंबई- ४०००५१ यांच्याकडे मे, २००८ मध्ये नोंदवली आहे. खटला ग्राहक क्र. २८२/२००८ मंचाकडे कोर्ट क्र. १ मध्ये चालविला गेला. चार तारखा लागल्या, त्या वेळेस विरुद्ध पक्ष, एकाही तारखेस हजर राहिला नाही. मंचाच्या अध्यक्षांनी २० नोव्हेंबर २००८ व ता. २० फेब्रुवारी ०९ रोजी ए-ढअफळए घोषित केले व मला अंतिम निकाल पत्राद्वारे कळवू असा आदेश दिला. १८ मार्च ०९ रोजी वरील मंचाकडे निकालाबाबत मी चौकशी केली, तेव्हा मला निबंधकाकडून सांगण्यात आले की, ग्राहक मंचाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे व नवीन अध्यक्षांची निवड होत नाही तोपर्यंत काहीच हालचाल होणार नाही व तक्रारीचा निकाल मिळणार नाही. अशा स्थितीत मला ग्राहक मंचाकडून न्याय कधी मिळेल, हाच प्रश्न पडतो.
एन. व्ही. तावडे, मुंबई