Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

तमिम इक्बालचे शतक; बांगलादेश सुस्थितीत
किंग्सटाऊन, १२ जुलै / एएफपी

 

तमिम इक्बालने केलेल्या नाबाद शतकामुळे बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपली बाजू मजबूत केली. वेस्ट इंडिजने ६९ धावांची आघाडी घेतली होती. ती मागे टाकत बांगलादेशने तमिमच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात उपाहारानंतर १८९ धावांपर्यंत मजल मारली होती. तमिम तेव्हा १०४ धावांवर नाबाद होता.त्याआधी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने चिवट झुंज देत यजमानांना ३०७ धावांत गुंडाळले आणि आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद २६ अशी मजल मारली. बांगलादेशला आता पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यासाठी आणखी ४३ धावांची आवश्यकता आहे.
बांगलादेशच्या तमिम इक्बाल व कायेस यांनी सात षटके खेळून काढत २६ धावा केल्या. इक्बालने नाबाद १४ तर कायेसने ११ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजच्या फिलिप्सने केलेल्या ९४ धावांनंतर तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार केल्यानंतरही बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्यांना रोखण्यात यश मिळविले. महमुदुल्ला व रुबेल हुसेन या दोघांनीही प्रत्येकी ३ बळी घेत वेस्ट इंडिजला रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिब हसन यानेही सातत्यपूर्ण कामगिरी करताना ३५ षटकांत केवळ ७६ धावा देत दोन बळी घेतले. बांगलादेशला त्यांचा कर्णधार मशर्रफ मोर्तझा याची उणीव मात्र प्रकर्षांने जाणवली.
गुडघा दुखावल्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते.
धावफलक
बांगलादेश (पहिला डाव) सर्व बाद २३८

वेस्ट इंडिज (पहिला डाव) - डेल रिचर्ड्स पायचीत शाकिब १३, फिलिप्स झे. रकिबुल गो. रुबेल हुसेन ९४, ऑस्टिन झे. इमरुल गो. रुबेल हुसेन १७, डाऊलिन पायचीत शाकिब २२, रिफर झे. शाकिब गो. महमुदुल्ला २५, बर्नार्ड झे. मेहराब हुसेन ज्युनियर गो. शहादत हुसेन ५३, वॉल्टन झे. शाकिब गो. महमुदुल्ला ०, सॅमी त्रि. महमुदुल्ला ४८, मिलर झे. मुशफिकर रेहमान गो. रुबेल हुसेन ०, रोच झे. मेहराब हुसेन गो. मोहम्मद अश्रफुल ६, बेस्ट नाबाद १, अवांतर (बाईज ४, लेगबाईज ३, वाईड २, नोबॉल १९) २८, एकूण ९५.१ षटकांत सर्व बाद ३०७, बाद क्रम : १-१५, २-९४, ३-१४२, ४-१७६, ५-२२७, ६-२२७, ७-२६७, ८-२६७, ९-३०६, १०-३०७,
गोलंदाजी : मोर्तझा ६.३-०-२६-०, हुसेन १३-२-४८-१, शाकिब हसन ३५-१०-७६-२, रुबेल १५-१-७६-३, महमुदुल्ला १९.४-२-५९-३, अश्रफुल ६-०-१५-१.
बांगलादेश (दुसरा डाव) - तमिम इक्बाल खेळत आहे १०४, इमरुल कायेस झे. रोच गो. ऑस्टिन २४, जुनेद सिद्दीक खेळत आहे ४९ एकूण ७१ षटकांत १ बाद १८९.
धावफलक अपूर्ण.