Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गोरेगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
गोंदिया, १२ जुलै / वार्ताहर

सामान्य कार्यकर्त्यांच्या शक्तीमुळेच काँग्रेस शक्तिशाली झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी व

 

पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोरेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित तालुका कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या सत्कार सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी पुरुषोत्तम कटरे यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रत्येक गावात जास्तीत जास्त संख्येने काँग्रेसचे सदस्य नोंदवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले होते. याप्रसंगी डॉ. योगेंद्र भगत, पी.जी. कटरे, जिल्हा परिषद सदस्य जगदीश येरोला, प्रेम रहांगडाले, खेमराज मसराम, जिल्हा परिषद सभापती राजेश नंदागवळी, सी.टी. चौधरी, हिरालाल चौहान, दिलीप गभने, जाकीर पटेल, महजबीन राजानी, आशा अगडे, आरती चवारे, माया कटरे, डॉ. गिरधर बिसेन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र कटरे यांनी केले. प्रश्नस्ताविक गोरेगाव काँग्रेस तालुका अध्यक्ष अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. आभार सुरेश चन्न्ो यांनी मानले.