Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थ्यांनी केला शिक्षकांचा सत्कार
भंडारा, १२ जुलै / वार्ताहर

स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी

 

शिक्षकांचा सत्कार केला.
या प्रसंगी अभिषेक चौधरी, आशीष टांकसाळे, करिश्मा राऊत, शुभम मशीदकर, नीलेश गायधनी आणि रोशन खेताडे यांनी ‘गुरू’ या विषयावर विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य श्रीराम पारधी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रश्न. वामन तुरिले उपस्थित होते. ते म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो. सोबत तोही घडत जातो. ताज्या विचारांचा शिक्षक विद्यार्थ्यांशी अधिक जवळीक साधू शकतो. खऱ्या शिक्षकाला त्याच्या शिक्षकी पेशात चैतन्यदायी अनुभव येतात. शिक्षकांकरिता त्या सुखसंवेदना असतात.
शिक्षकाचे वर्तन, त्याचा शिष्टाचार, त्याची भाषा, त्याचे साधेपण विद्यार्थ्यांच्या मनात घर करून जाते. शिक्षक त्याचे आचारविचार, कर्तव्य, परिश्रम, विद्वत्ता यातून मोठा होतो. पूजनीय ‘गुरू’ बनतो.
विद्यार्थ्यांनी गुरुशी समर्पित होण्यातच विद्यार्थ्यांचे हित आहे, असे अनेक उदाहरणे देऊन प्रश्नचार्य श्रीराम पारधी यांनी स्पष्ट केले. मंचावर प्रमुख उपस्थितात ए.एन. निर्वाण, करणकोटे व देशमुख हे होते. कार्यक्रमाचे संयोजन स्मिता गालफाडे यांनी केले. संचालन गौरी मनोज दाढी हिने केले.