Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

विधानसभेच्या ३ जागांसाठी काँग्रेसमध्ये ३० इच्छुक
भंडारा, १२ जुलै / वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्ष निरीक्षक म्हणून येथे आलेल्या कृषीमंत्री बाळासाहेब

 

थोरात आणि ठाकूरदास मालवानी यांच्या समक्ष जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाच्या ३० इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केली.
भंडारा जिल्ह्य़ात पूर्वी पाच विधानसभा मतदारसंघ होते परंतु, आता मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भंडारा, साकोली आणि तुमसर असे तीनच मतदारसंघ राहिले आहेत. भंडारा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. निरीक्षकांनी उमेदवारांच्या घेतलेल्या मुलाखती भंडारा विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुमेध श्यामकुवर, विकास राऊत, प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे, युवराज वासनिक, राजकुमार मेश्राम या सहा जणांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे.
तुमसर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार आनंदराव वंजारी यांचे चिरंजीव अ‍ॅड. शशीर वंजारी, अनिल बावनकर, शिवकुमार भेलावे, आशीष पात्रे, प्रमोद तितिरमारे, चंदू तुटकर, सीमा भुरे, पल्लवी कटरे, रामभाऊ कडव, भाऊराव तुमसरे, राजू बालपांडे, विठ्ठल कहालकर या १२ जणांनी आपण कसे सक्षम उमेदवार आहोत, हे निरीक्षकांना मुलाखतीदरम्यान पटवून देण्याचा प्रयत्न केला.
साकोलीत १२ जणांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये माजी आमदार आनंदराव वंजारी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर लिचडे, प्रमिला कुटे, शफी शद्दानी, गोपाल सावरबांधे, प्रभाकर सपाटे, पद्माकर गहाणे, विजय खोब्रागडे, सुधीर रणदिवे, सदाशिव वलथरे यांचा समावेश आहे.आमदार सेवक वाघाये यांच्या समर्थकांनी त्यांना उमेदवारी द्यावी यासाठी दावा केला, तर आमदार बंडू सावरबांधे यांचा अडय़ाळ (पवनी) मतदारसंघ विसर्जित झाल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांना साकोलीतून उमेदवारी देण्याची मागणी केली.