Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोल वॉशरीजमधून कोळशाची चोरी; आठ कर्मचारी निलंबित
भद्रावती, १२ जुलै / वार्ताहर
येथील देऊळवाडा गुप्ता कोल वॉशरीजमधील काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चालवलेल्या

 

कोळसा चोरीचा कंपनीच्या खाजगी सुरक्षांनी उघडकीस आणल्याने या चोरीत सहभागी आठ कर्मचाऱ्यांना कंपनीने तात्काळ निलंबित केले आहे. ही चोरी लाखो रुपयांच्या घरात जात असल्याची चर्चा कामगार वर्गात आहे परंतु, कंपनीने पोलिसात तक्रार न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
देऊरवाडा येथील गुप्ता कोल वॉशरीजमधून कंपनीच्या उसगाव येथील वॉशरीजमध्ये कोळसा साफ करण्याकरता ट्रकांद्वारे नेल्या जातो. या दरम्यान कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून कोळशांचे ट्रकचे ट्रक पडोळी जवळील कोल डेपोमध्ये विकण्याचा आरोप अ़ाहे. ही बाब कंपनीच्या प्रबंधकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खाजगी सुरक्षा व्यवस्थेला लक्ष देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, तीन ट्रक कोळसा खाजगी काटे चालकांना विकला जाण्यासाठी आणला जात असताना चंद्रपूर येथील हॉटेल जयराम जवळ पकडण्यात आले. यावेळी ट्रक चालकांनी सांगितलेल्या आठ कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशीच तात्काळ निलंबित करण्यात आले.
बरांज (मो.) येथील कर्नाटका-एम्टा कोळसा खाणीमधून निघणारा कोळसा धुऊन (वॉश) तजरीजवळील रेल्वे सायडींगवर पोहोचवण्याचे कंत्राट गुप्ता कोल वॉशरीला दिला आहे. सुरुवातीला एम्टामधून आणलेला कोळसा देऊरवाडा येथील वॉशरीमध्ये पोहोचवला जातो. या वॉशरीची क्षमता कमी असल्याने कंपनीच्या घुग्गूस उसगाव येथील वॉशरीमध्ये ट्रकांद्वारे तो पोहोचवला जातो.
पडोली जवळील खाजगी कोळसा काटय़ावर विक्रीसाठी पाठवून याद्वारे लाखो रुपयांची चोरी केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.