Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘हर बोला हर हर महादेव’चा जल्लोष
तुमसर, १२ जुलै / वार्ताहर

काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती प्रसंगी तरुणांच्या ‘हर बोल हर हर महादेव’च्या घोषणांनी दणाणून

 

सोडणाऱ्या जल्लोषाने पर्यवेक्षक व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात अवाक् झाले. तुमसर येथे शकुंतला सभागृहात कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तुमसरसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती सुरू असताना कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. बाळासाहेब थोरातांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही. त्यामुळेच की काय? त्यांच्या नजिकच्या सहकाऱ्याने येथील काँग्रेसचे दृश्य हेच काय? असा सवाल केला. समर्थकांना न आणता सुद्धा इच्छुकांना मुलाखती देता आल्या असत्या. थोरातांसोबत यावेळी प्रेदश काँग्रेसचे पदाधिकारी ठाकूरदास मालानी व जिया पटेल सोबत होते.प्रश्नरंभी तुमसर, मोहाडी व शहर काँग्रेस समितीच्या वतीने मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. अ‍ॅड. भेलावे, विठ्ठलराव कहालकर, आशीष पातरे व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मधुकर लिचडे यांनी आपल्या व्यथा मांडल्या. थोरात या वेळी म्हणाले, उमेदवारीसाठी इच्छा ठेवा, उमेदवारी मागा परंतु, सोनिया गांधी यांचा निर्णय अंतिम राहील. तो पाळला गेला पाहिजे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या त्यागातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.