Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राजकीय कार्यक्रमासाठी मठाच्या वापरास विरोध
कुही, १२ जुलै / वार्ताहर

येथील ऋख्खडाश्रम मठ या धार्मिक स्थळाचा राजकीय कार्यक्रमासाठी उपयोग करण्यात येत

 

असल्यामुळे ऋख्खडांचे हजारो शिष्य, भाविक संतप्त झाले आहेत.
जिल्हा परिषद सदस्य आनंद खडस, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव लेंडे, रमेश रेहपाडे, देवाजी ठवकर, सु.य. भगत, लखनसिंग चौहाण, रेखा येळणे, गीता मस्के, ग्रामपंचायत सदस्य विवेक खराबे यांनी अध्यक्षाची भेट घेऊन याविरोधात निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, आश्रमातील देवळे, ऋख्खड महाराजांची गादी व समाधी भाविकांसाठी भक्तीचे, विश्वासाचे पवित्र स्थळ आहे.
गेल्या २९ जून ०९ रोजी केंद्रिय मंत्री मुकुल वासनिक यांचा अभिनंदन सोहोळा आश्रमाच्या सभागृहात झाला. ‘चपला-जोडे मुख्य गेटच्या बाहेर ठेवावे’ हा आश्रमाचा लिखित नियम सर्रास तोडल्या गेला.
शिवसेना-भाजप युतीच्या सभेसाठी आश्रमाबाहेरील पटांगणाची जागा दिली गेली नाही. मग नियम असताना काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी सभागृह कसे काय देण्यात आले? असा संतप्त सवाल निवेदनातून करण्यात आला आहे.