Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कृषी उद्योजकता विकास चर्चासत्र
वर्धा, १२ जुलै / प्रतिनिधी

कृषी क्षेत्रातील उत्पन्नावर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी ‘एमगिरी’ संस्था सदैव तयार

 

असून युवकांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन उद्योजकता विकास चर्चासत्रात करण्यात आले.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था (एमगिरी)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात संस्थेच्या विविध प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विविध कृषी उद्योग साकारल्या जाऊ शकतात. सोयाबीन, आवळा, सीताफळ, संत्रा, सरकी आदी प्रक्रिया उद्योगासाठी वर्धेत पोषक वातावरण आहे. अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात ‘बिक्रेटींग’ उत्पादनाचे कारखाने उभारता येतात. घरोघरी गृहोपयोगी वस्तू तयार करण्यासाठी डिझायनर सेवा देता येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
याप्रसंगी एक हजार व्ॉटच्या हॅलोजन बल्बशी शक्ती केवळ ३६ व्ॉट ‘एलईडी’ बल्बमध्ये निर्माण करण्याचे तसेच तीन तासाऐवजी ४५ मिनिटात संपूर्ण भोजन तयार करणाऱ्या सौरकुकरचे प्रश्नत्यक्षिक प्रश्न. डॉ. डाहाके व प्रश्न. छाजेड यांनी सादर केले. एमगिरीचे डॉ. करुणाकरण यांनी अशा उद्योगांना प्रश्नेत्साहित करण्याचे सूत्र सांगितले. याप्रसंगी डॉ. विभा गुप्ता, सूर्यकांत बोबडे, सुनील देशमुख, प्रकल्प अधिकारी मिश्रा उपस्थित होते.