Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

विविध गटांना सोबत घेऊन पीरिपा निवडणूक लढणार -जोगेंद्र कवाडे
मेहकर, १२ जुलै / वार्ताहर

इतर राजकीय पक्षाने सन्मान जनक युती केल्यास त्यांच्याबरोबर युती करू, अन्यथा युती न

 

झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रश्न. जोगेंद्र कवाडे यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.
मेहकर विधानसभा मतदारसंघात पीरिपा लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मेहकर कृषी उत्पन्न समितीच्या सभागृहात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा विदर्भ प्रदेशाध्यक्ष नामदेव खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी पक्षाचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष गणेश पडघन, चरणदास इंगोले उपस्थित होते. प्रश्नस्ताविक बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सोपान देबाजे यांनी केले. सोपान देबाजे यावेळी म्हणाले की, मेहकर विधानसभेचा उमेदवार अनुसूचित जाती अंतर्गत कोणत्याही जातीचा असू शकतो. कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळून त्याचे काम केले पाहिजे. या मेळाव्यात प्रश्न. जोगेंद्र कवाडे यांच्यासह गणेश पडघान, नामदेव खोब्रागडे, चरणदास इंगोले, राजाभाऊ साळवे यांची भाषणे झाली. मेळाव्यात मिलिंद दाभाडे, सुवर्णा वानखेडे, विजय गवई, शिवाजी सोनुने यांनी विचार व्यक्त केले. संचालन राजू डोंगरदिवे यांनी केले.