Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आर्वी पालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नागोराव लोडे
आर्वी, १२ जुलै / वार्ताहर

आर्वी नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नागोराव लोडे तर उपाध्यक्षपदी कांचन लोहे यांची

 

निवड झाली.
ही निवडणूक गेल्या १६ जून रोजीच होणार होती परंतु, भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवल्याने ही निवडणूक आजपर्यंत लांबली होती. विरोधकांचे सर्व आक्षेप फेटाळल्याने भाजपच्या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने २७ जुलैला सुनावणी निश्चित केली असून तत्पूर्वी न्यायालयाच्या निर्णयाला आधिन राहून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची परवानगी दिली. आर्वी पालिकेच्या सभागृहात शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी राऊत यांच्या समक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. २३ सदस्यसंख्या असलेल्या पालिकेत यावेळी भाजप व मित्र पक्षांचे ८ सदस्य गैरहजर होते. उर्वरित १५ सदस्यांनी अध्यक्षपदी लोडे व उपाध्यक्षपदी लोहे यांची निवड केली.