Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

तीन हजारावर मुले शिक्षणापासून वंचित ; बुलढाणा जिल्ह्य़ात सर्वशिक्षा अभियानाचा बोजवारा
बुलढाणा, १२ जुलै / प्रतिनिधी

प्रश्नथमिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लहान मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

 

शासनाने शहरासह ग्रामीण भागात वातावरण निर्मिती करून सर्वशिक्षा अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत या अभियानावर लाखो रुपये खर्च करण्यात आला परंतु, आजही जिल्ह्य़ातील ३ हजारावर मुले प्रश्नथमिक शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यामुळे सर्वशिक्षा अभियान उद्दिष्टपूर्ती करण्यास सपशेल अपयशी ठरले असून, या अभियानाचा जिल्ह्य़ात बोजवारा उडाला आहे.
शहरासह ग्रामीण भागातील गोरगरीब घटकातील मुलांना प्रश्नथमिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत मुलांना मोफत पाठय़पुस्तके देण्यात येतात. एवढेच नव्हे तर मागास घटकातील मुलांना शिष्यवृत्तीची उपाययोजनादेखील करण्यात आली आहे. या अभियानावर शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत असते. या योजनेचा उद्देश चांगला असला तरी हे अभियान राबवण्यास अधिकारी व कर्मचारी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजही हॉटेल, किराणा दुकान, विटभट्टय़ा, बिअरबार व शेती कामासाठी अनेक लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येते.
राज्य व केंद्र शासनाचे प्रश्नथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यासाठी सर्वशिक्षा अभियान कालबद्धरीत्या जाहीर करण्यात आल्यानंतर आतापावेतो या अभियानावर दहा लाखांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. तरीही अपेक्षित यश न मिळाल्यामुळे जिल्ह्य़ातील ३ हजार ३२५ विद्यार्थी अद्यापही शाळेबाहेरच असल्याची माहिती प्रश्नप्त झाली आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत २०१० पर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार १० लाखांहून अधिक निधी खर्चसुद्धा करण्यात आला आहे परंतु, अद्यापही या अभियानाला उपेक्षित यश प्रश्नप्ती झाली नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
मागास असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ात सर्वशिक्षा अभियानाच्या अपयशाकडे अद्याप कोणत्याच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने एक उमलती पिढीच शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्य़ातील साडेतीन हजार विद्यार्थी प्रश्नथमिक शिक्षणापासून वंचित असतानादेखील शिक्षण क्षेत्रातील संघटना मूग गिळून गप्प आहे.