Leading International Marathi News Daily
रविवार, १२ जुलै २००९

दिशा, मार्ग निश्चित करा
गुरु, शनीची अनुकूलता, शुक्र- मंगळ सहयोग साथ देईल. परिणामी मेष व्यक्ती पुढे सरकत राहतील. त्यामध्ये व्यापाराची नवी रूपरेखा तयार करता येईल. अर्थप्रश्नप्तीचे मार्ग पक्के होतील. बौद्धिक शक्तीचा प्रभाव वाढेल. त्यातून नवे संपर्क, नवे प्रस्ताव यांना आकार देता येईल. चतुर्थात प्रवेश करीत असलेल्या रवी, बुधामुळे प्रपंचातले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. हवामानाचा अंदाज घेऊन कृषी कार्ये, प्रवास, दिशा ठरवणे योग्य ठरेल.
दिनांक : १२, १६, १७, १८ शुभकाळ.
महिलांना : प्रपंच, प्रकृती सांभाळा.

परिणाम व्यापक होतील
राशीस्थानी शुक्र, मंगळ व प्रवेश करीत असलेला बुध यांच्यामुळे गुरू, राहूमधील शुभ परिणाम पक्के होऊन व्यापक बनतील. त्याचा अनेक क्षेत्रातल्या वृषभ व्यक्तींना लाभ उठवता येईल. कृषी उत्पादन, राजकीय प्रभाव, व्यापार पैसा, शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान यांमध्ये होत राहणारी प्रशंसा यामधून प्रत्यय घेता येईल. चतुर्थात शनी असल्याने प्रपंचात मात्र लक्ष ठेवा.
दिनांक : १२ ते १५ शुभकाळ.
महिलांना : उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करता येतील.

झकास जम बसेल
भाग्यांत गुरू, बुध, रवीची राश्यांतरं, शनीचं सहकार्य याच ग्रहांमधून कार्यभाग साधता येईल. अनेक क्षेत्रात झकास जम बसवता येईल. गुरुवारच्या बुध-हर्षल नवपंचम योगाच्या आसपास संकल्प सिद्धीत नवे दुवे जोडले जाण्याचा संभव आहे. अष्टमांत राहू, व्ययस्थानी शुक्र, मंगळ यांचे व्यत्यय, संयम, काटकसर, गुप्तता यातून दूर करता येतील. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळणार आहे.
दिनांक : १३ ते १७ शुभकाळ.
महिलांना : गाडी वेगानं पुढे घेऊन जाता येईल.

प्रवास सुरूच राहील
राहूचं सहकार्य, अनुकूल शुक्र, मंगळ, बुध, रवीची राश्यांतरं नवा प्रकाश दाखवतील आणि कर्क व्यक्तींचा प्रवास साडेसाती, आठवा गुरू यांच्या अडचणींवर विजय मिळवून पुढे सुरू होईल. गुरुवारच्या बुध-हर्षल नवपंचम योगाच्या आसपास काही घटना दीर्घकाळ स्मरणात राहाव्यात अशा प्रबळ यशाच्या असतील. अर्थप्रश्नप्ती, सामाजिक प्रतिष्ठा, कृषी उत्पन्न, नवे शोध, साहित्याचे विषय यांचा समावेश त्यात असेल. संयम सोडू नका.
दिनांक : १४ ते १८ शुभकाळ.
महिलांना : घेतलेले निर्णय, केलेली कृती कर्तृत्व उजळून काढणारे यश देतील.
महिलांना : झगडून यश मिळवावे लागणार आहे.

पराभव नाही
साडेसाती, अनिष्ट राहू, केतू आणि बुध, रवीची वादळ उठवणारी राश्यांतरं अशा ग्रहांशी सिंह व्यक्तींना सामना करावा लागणार आहे. त्यात गुरूची कृपा, शुक्र- मंगळाचं सहकार्य उपयुक्त ठरणारी शक्ती असल्याने सामन्याचं रूपांतर निश्चितच पराभवात होणार नाही. अपेक्षित यशाची खात्री मात्र नाही. व्यापार, राजकारणत, कला, साहित्य यांना मिळणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा आधारांचा उपयोग प्रतिष्ठा सांभाळण्यास निश्चित होईल.
दिनांक : १२, १६, १७, १८ शुभकाळ.
महिलांना : संयम ठेवा, यश मिळवता येईल.

प्रकरणे मार्गी लागतील
साडेसाती, गुरूची नाराजी, यांच्या सुरू असलेल्या पर्वामध्ये आपणास बुध, रवीची राश्यांतरं शुक्र, मंगळ सहयोगाचं सहकार्य आणि पंचमातील राहूची अनुकूलता यांचा उपयोग करून घेता येईल. त्यामुळे इभ्रतीच्या प्रभावाने प्रकरणं मार्गी लावता येतील. अचानक बडी मंडळी मदतीला येतील. पैसा उभा करून देतील आणि पुढे घेऊन जातील. अशी मंडळी दुखावली जाणार नाहीत, याची मात्र शनिवापर्यंत सतत खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रश्नर्थना आनंद देईल.
दिनांक : १३, १४, १५, १८ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा, मार्ग सापडतील, यश मिळवता येईल.

प्रवास निर्वेध होईल
पंचमात गुरू, लाभात शनी, भाग्य दशमातून भ्रमण करीत असलेले सूर्य-बुध, तुला व्यक्तीचा प्रवास निर्वेध करणारी ग्रहस्थिती आहे. निर्णय घेऊन कृती करा. गुरुवारच्या बुध-हर्षल नवपंचम योगाच्या आसपास प्रगतीचा नवा टप्पा यातून गाठता येईल. सामाजिक, व्यावसायिक, बौद्धिक क्षेत्रात त्यामुळे प्रशंसा होईल. चतुर्थात राहू, अष्टमात शुक्र-मंगळ यांच्यामुळे संभ्रमात टाकणाऱ्या समस्यांशी हुशारीने सामना करता येईल. संधी आणि वेळ यांचा कल्पकतेने लाभ उठवा.
दिनांक : १२, १६, १७ शुभ दिवस.
महिलांना : अपेक्षित यश मिळवून देणारी ग्रहस्थिती सप्ताहात आहे.

प्रपंचात लक्ष ठेवा
दशमात शनी, पराक्रमी राहू, सप्तमात शुक्र-मंगळ आणि बुध-सूर्य अनुकूल होत आहेत. गुरुवारच्या बुध-हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अनेक समस्या सुटतील. त्यामुळे दडपण कमी होतील. पुढील रूपरेखा निश्चित करता येईल. चतुर्थात गुरू असेपर्यंत प्रपंचातील घडामोडींवर मात्र सतत लक्ष ठेवावे लागणार आहे. व्यवहारामध्ये सफल संधीतून बाजी मारून जाता येईल. त्यात राजकारण गाजवाल. कलाप्रश्नंतात चमकाल. अवास्तव साहस कटाक्षाने टाळा.
दिनांक : १३, १४, १५, १८ शुभकाळ.
महिलांना : कराल ती पूर्व असा काळ.

ग्रहांचे सहकार्य मिळेल
गुरू, शनी, राहू अशा ग्रहांचे सहकार्य घेऊन सुरू असलेल्या प्रवासात शुक्र- मंगळ अडचणी आणित आहेत. आणि बुध-रवीची राश्यांतरं सरळ मार्गास नवी वळणं लावणार आहेत. सावध राहा, संयम ठेवा. प्रश्नर्थना सुरू असू द्या. यातूनच अनुकूल ग्रहांचे सहकार्य कारणी लागेल. नोकरी-धंदा-शेती-सामाजिक उपक्रम यामध्ये प्रतिष्ठा सांभाळणारं यश मिळेल. दुसऱ्यांवर विश्वासून साहसी निर्णय घेऊ नका. सावधतेने निर्णय घ्या. आर्थिक देवघेव प्रकृतीचे उपचार यात चुका नको. यामुळे यश सोपे होईल.
दिनांक : १२, १६, १७, १८ शुभकाळ.
महिलांना : प्रश्नपंचिक प्रश्न सुटतील, सामाजिक सन्मान मिळतील.

प्रगती होईल, पुढे चला
पंचमात शुक्र, मंगळ, कुंभ, गुरू आणि राशिस्थानी राहू-बुध-रवीची राश्यांतरं याचे प्रतिसाद उलाढालींच्या वेगावर, अर्थप्रश्नप्तीवर, शेती कार्यावर फारच चांगले होतील. अचानक नवीन व्यक्ती, संस्था, कार्ये यांच्याशी संबंध येतील आणि प्रतिमा उजळून निघेल. रजकारण, व्यापार यात जम बसवता येईल. अष्टमात शनी असल्याने शत्रू आणि प्रकृती यांच्या संबंधात संशय येताच त्वरित बंदोबस्त करणे योग्य ठरेल. बुध- हर्षल नवपंचम योगातून प्रगतीचे नवे मार्ग दृष्टिपथात येतील. प्रगतीचा वेग वाढेल.
दिनांक : १२ ते १५ शुभकाळ.
महिलांना : आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करता येईल.

आधार उपयुक्त ठरतील
राशिस्थानी गुरू, सप्तमात शनी यांचाच आधार उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे चतुर्थातील शुक्र, मंगळातील प्रश्नपंचिक प्रश्न बुध- रवी राश्यांतरातून निर्माण होणारे व्यापारी आणि अधिकाराचे प्रश्न इभ्रतीपासून दूरच्या अंतरावर सहज रोखून धरता येतील. यात सूर्य राश्यांतर शत्रूंच्या बंदोबस्तासाठी उपयोगात येईल. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल. मनाला मन:शांती लाभेल. बुध- हर्षल नवपंचम योग कागदपत्र, लॉटरीची तिकीट यातून लाभ देऊ शकतो. साहस कटाक्षानं टाळा.
दिनांक : १३ ते १६ शुभकाळ.
महिलांना : संसारात संयम ठेवा, समाजकार्यात स्पर्धा नको.

उत्तरे मिळतील
पराक्रमी शुक्र, मंगळ लाभात, राहू आणि बुध, रवी पंचमात प्रवेश करणार आहेत. गुरू, शनीमधील अनिष्टता बरीच कमी होईल. प्रश्नांची उत्तरं मिळू लागतील. व्यवहाराची गाडी कमी-अधिक वेगात पुढे सरकू लागेल. गुरुवारच्या बुध- हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित संधीतून व्यावसायिक, सामाजिक, बौद्धिक क्षेत्रात स्वत:चा प्रभाव प्रस्थापित करू शकाल; परंतु मस्ती, धुंदी, आपत्तींना निमंत्रण देतील, याचं शनिवापर्यंत विस्मरण नको.
दिनांक : १३ ते १७ शुभकाळ.
महिलांना : निर्धार, निष्ठा, यश निश्चित देणार आहेत.